तुम्ही विकत घेत असलेली वस्तू ओरिजिनल आहे की बनावट? जाणून घ्या

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

कल्पना करा की तुम्ही तुमच्या स्थानिक किराणा दुकानात गेला आहात आणि तिथे दुधाच्या एकसारख्या दिसणाऱ्या पिशव्या एकमेकांच्या शेजारी ठेवलेल्या आहेत. तशा त्या नेहेमीच असतात, आणि अनेक सारख्या दिसणाऱ्या पिशव्यांमधून तुम्ही कोणतीही एक पिशवी सहजच उचलता, पैसे देता आणि काहीही विचार न करता घरी परत येता. फक्त आज तुम्हांला त्यातील काही पिशव्या बनावट आहेत, आणि कदाचित तुम्ही आणलेली दुधाची पिशवी बनावट असू शकते हे लक्षात आलेलं नाही.

ही परिस्थिती ई-कॉमर्स क्षेत्रात आणि विशेषतः किरकोळ विक्रेत्यांच्या किंवा थर्ड-पार्टी विक्रेत्यांच्या बाबतीत येत्या काही वर्षांत घडण्याची शक्यता आहे.

इंटरनेटवर विकल्या जाणार्‍या बनावट वस्तू आणि इतर बनावट उत्पादनांची वाढ झपाट्याने झाली आहे आणि त्याकडे अनेक खरेदीदारांचे लक्ष गेलेले नाही. बर्‍याच लोकांना हे कळत नाही, परंतु ई-काॅमर्स वरील विकल्या जाणार्‍या बऱ्याचशा वस्तू मूळ उत्पादक कंपन्या स्वतः विकत नाहीत, तर त्या थर्ड-पार्टी विक्रेत्यांद्वारे विकल्या जातात. आणि जरी त्यातील अनेक विक्रेते प्रथितयश व्यापारी असले, तरी त्यांच्यापैकी बरेच बनावट वस्तूंची विक्री करत आहेत.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणार्‍या प्रत्येक पाच उत्पादनांपैकी एक उत्पादन बनावट आहे हे वाचून तुम्हांला आश्चर्य वाटेल. सौंदर्यप्रसाधने आणि पर्फ्यूम बनवणारे ह्यात आघाडीवर आहेत असे एका खाजगी नागरिक जागरूकता गटाने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे.

अलिबाबा आणि ॲमेझॉन सारख्या ऑनलाइन क्षेत्रातील दिग्गजांसाठी तर हे एक मोठे आव्हान आहे. अमेरिकन सरकारने अलिबाबा ग्रुपच्या संलग्न कंपन्यांना अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या बनावट वस्तूंच्या वाढीला अटकाव करण्याचा इशारा दिला होता.

बनावट उत्पादने जवळपास प्रत्येक उद्योग क्षेत्रात अस्तित्वात आहेत, ज्यात अन्न, पेये, परिधान, उपकरणे, पादत्राणे, फार्मास्युटिकल्स, सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटो पार्ट्स, खेळणी यांचा समावेश आहे. बनावट वस्तूंचा प्रसार जगभरात आहे आणि अमेरिका, इटली आणि फ्रान्ससह अनेक देशांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे, कारण जगातील आघाडीचे उत्पादक त्या देशातील आहेत.

महानगरांपासून दूर असलेल्या छोट्या गावांमध्ये, जिथे ई-कॉमर्स ही संकल्पना नवीन आहे आणि अनेक खरेदीदारांना ते खरेदी करत असलेले उत्पादन खरे आहे की बनावट हे ओळखणे कठीण जाते, तिथे बनावट वस्तू अगदी सहजपणे खपवल्या जाऊ शकतात.

नकली, निकृष्ट आणि अनधिकृत वस्तू बाजारात विकल्या जातात त्यामुळे खऱ्या विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो हे सत्य आहे पण त्याबद्दल सर्वसामान्य खरेदीदारांना कळणार कसे? काही ठिकाणी चांगली प्री-स्क्रीनिंग सिस्टिम आहे ज्यामुळे अशा विक्रेत्यांना उत्पादने विकण्यास परवानगी दिली जात नाही, परंतु जर स्वतः उत्पादक आपलेच उत्पादन बनावट बनवत असेल आणि सरसकट सगळ्यांची विक्री करत असेल तर? होय, असं घडलं आहे. एका प्रसिद्ध स्पोर्ट्स वेअर कंपनीने असं केलं होतं.

ग्राहक व्यवहार विभाग या समस्येकडे लक्ष देत आहे आणि ई-कॉमर्स कंपन्यांकडून अधिक उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याचा विचार करत आहे. परंतु केवळ इतकंच करून बनावट वस्तूंना आळा बसेल कां? नाही. त्यासाठी गरज आहे व्यापक जनजागृती करण्याची.

बनावट वस्तू कशी ओळखायची ते आतां पाहूया.

अवास्तव सूट
सहज विश्वास बसणार नाही इतका मोठा डिस्काउंट असेल तर.

क्षुल्लक पॅकेजिंग
वेष्टनाकडे लक्षपूर्वक बघा. वापरलेला कागद, पुठ्ठा, प्लास्टिक हलक्या दर्जाचे असेल तर.

व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चुका
मजकूर नीट वाचा. व्यवस्थित लिहिलेला नसेल तर.

उत्पादनांची खराब गुणवत्ता
उत्पादनाचा दर्जा चांगला नसेल तर.

सदोष फॉन्ट, लोगो
ओळखीचा फाॅन्ट नसेल तर आणि कंपनीचा लोगो नीट नसेल तर.

संपर्क तपशील नाही
तक्रार करण्यासाठी पत्ता आणि फोन नंबर नसेल तर.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा