नवीन विहीर अनुदान योजना २०२१ ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जुनी विहीर दुरुस्ती अनुदान योजना, इनवेल बोरिंग, तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, पंप संच या सर्वांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

मित्रांनो महाडीबीटी पोर्टल वरती सर्व योजनांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. आणि या अर्जामध्ये आता महत्त्वाचे असे अर्ज सुरू झाले, ते म्हणजेच नवीन विहिरीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यानंतर जुन्या विहीर ची दुरुस्ती सुद्धा करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.

तिसरा येतो अस्तरीकरण म्हणजे तळ्याचे अस्तरीकरण असत त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच इनवेल बोअरिंग असेल त्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. तरी यामध्ये संपूर्ण योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? हे आपण जाणून घेणार आहोत.

यामध्ये या सर्व योजना साठी अनुदान किती आहे? हे सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य माहिती सुद्धा तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. तर ही सगळी माहिती घेतानाच पात्रता काय आहे? कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत? अशा प्रकारची संपूर्ण माहिती आणि शेवट ऑनलाइन अर्ज कसा करायचा असतो?

कशाप्रकारे तुम्हाला बाबी निवडायचे असतात? संपूर्ण माहिती आपण घेणार आह. मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला महाडीबीटी च्या वेबसाईटवर यायचं आणि महाडीबीटी वर्ती आल्यानंतर तुम्हाला कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला त्या योजनेची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

त्यासाठी तुम्हाला शेतकरी योजना या टॅबवर क्लिक करायचे आहे. आणि त्यामागे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही नक्की काय आहे? कशा कशामध्ये याच्यामध्ये अनुदान आहे? काय पात्रता आहेत? काय कागदपत्रे लागतात?

त्याची संपूर्ण माहिती अगोदर तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर इथे थोडक्यात मी आज तुम्हाला अनुदान पात्रता कागदपत्रे यांची संपूर्ण माहिती मी अगोदर तुम्हाला देतो. त्याच्यानंतर तुम्ही अर्ज करा. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा येतो अनुदान.

अनुदान म्हणजेच या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी जर पाहिले तर अडीच लाख रुपये अनुदान आहे. जुनी विहीर दुरुस्ती करायची असेल तर पन्नास हजार रुपये इतके अनुदान आहे. त्यानंतर येतं इनवेल बोअरिंग. इनवेल बोअरिंग साठी वीस हजार रुपये अनुदान तुम्हाला दिसत आहे.

त्यानंतर येतं पंप संच. तसंच पंप संच साठी सुद्धा वीस हजार रुपये वीज जोडणी आकार, इथं दहा हजार रुपये आहे. आता इथे महत्त्वाच्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे. आता इथे पाहिले तर शेत तळाचे प्लॉस्टीक अस्तीकरण इथे एक लाख रुपये अनुदान आहे. व सुक्ष्म सिंचन संच, ठिबक सिंचन संच रुपये पंन्नास हजार किंवा जर तुषार सिंचन संचन केले तर इथे पंचवीस हजार असं अनुदान आहे.

पि वी सी पाईप करता तीस हजार रुपये अनुदान आहे. तर इथे पाहिलं तर या बाबी साठी अनुदान देय राहील पण सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, व कोल्हापूर हे सहा जिल्हे सोडून तुम्ही अर्ज करायचा आहे. या सहा जिल्ह्यातील तुम्ही असाल तर या गोष्टी साठी तुम्ही अर्ज करु शकणार नाही. त्यानंतर येतं पत्रता. लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणं बंधनकारक आहे.

त्यानंतर लाभार्थीने जातीचा वैद्य दाखला सादर करणे बंधनकारक आहे. जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट असनं गरजेचं आहे. सात बारा आठ-अ असणे गरजेचे आहे. त्यानंतर लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा दीड लाखाच्या आत असली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा.

उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे तहसीलदाराचा द्यावा लागणार आहे. डॉक्युमेंट अपलोड करताना, डॉक्युमेंट अपलोड कधी करायचे असतात? तर लॉटरी लागल्यानंतर. त्यानंतर लाभार्थ्याची जमीनधारणा हि झिरो पॉईंट वीस(०.२०) हेक्टर ते सहा(६) हेक्टर पर्यंत असावी. यामध्ये नवीन विहिरीसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल, तर किमान झिरो पॉईंट चाळीस (०.४०) हेक्टर असणे बंधनकारक आहे.

हि सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात? तर संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही इथं येऊन नवीन विहिरी बांधण्याकरिता कशाप्रकारे कागदपत्र लागतात? जुनी विहीर दुरुस्ती साठी किंवा इनवेल बोअरिंग साठी कुठली कुठली कागदपत्रे लागणार आहेत? तुम्ही सगळी माहिती पहिल्यांदा इथे पाहु शकता.

शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी वीज जोडणी आकार असेल, सगळी माहिती त्यात दिलेली आहे. एकदा फक्त सगळी माहिती एक व्यवस्थित शांत डोक्याने वाचून घ्यावे. लक्षात ठेवा ही माहिती वाचणे गरजेचे आहे. आपण नवीन अर्जदार नोंदणी ही कशी करायची? तर नवीन अर्जदार नोंदनि या ट्याब वर क्लिक करून तुम्हाला तुमचा अकाउंट क्रिएट करायचा आहे.

अकाउंट क्रिएट करून तुम्हाला आधार कार्ड नंबर, सगळी माहिती टाकून प्रोफाइल जी आहे ती प्रोफाइल शंभर टक्के पूर्ण करायचे असते. ही नवीन नोंदणी तुमच्या नावाची अगोदर करायची, यांचा सातबारा आठ-अ असेल, त्याचीच नोंदणी करायचे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा लॉगिन करायचे आहे.

अर्जदार शेतकरी आहे तर तुमच्या घरातील कोण असेल किंवा तुम्ही कस्टमरचा लगीन करत असाल, तर त्या व्यक्तीच अर्जदार नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन करायचे आहे. तर अर्जदाराची नोंदणी झाली आपली. समजा इथे आपण समजूया अर्जदाराची नोंद आपण अगोदरच करून घेतलेली आहे.

अर्जदार लोगिन या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इथं वापरकर्ता आयडीने किंवा आधार क्रमांकाने तुम्ही लॉग इन करू शकता. त्यामध्ये तुमचा आयडी पासवर्ड टाकायचा आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर लिंक असेल तर तिथे डायरेक्ट तुम्ही लॉग इन करू शकता. आपण आता आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घेणार आहोत. बनवलेल्या आय डी आणि पासवर्डने तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे.

आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इंन्टरफेस् दिसेल. ज्यामध्ये तुम्हाला प्रोफाइल भरायची असते. शंभर टक्के भरायची असते. वैयक्तिक तपशील मध्ये माहिती भरावी लागते. त्यानंतर पिकांचा‌ तपशील सुद्धा भरावा लागतो. त्यानंतर अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे एक नवीन ऑप्शन आहे अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकर्यांसाठी विशेष योजना.

म्हणजे या मधे कोण येणार आहे? तर एस सी, एन टी जे कैटेगरी आहे. त्यांनी हा अर्ज इथे करायचा आहे. हा ऑप्शन त्यांनाच दिसेल ज्यांची कैटेगरी एस टी, एन टी आहे. बाकिच्यांना हा ऑप्शन इथे दिसणार नाही. त्यानंतर आहे बाबी निवडा. या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यावर एक होम पेज येईल.

या मधे अर्ज करायसाठी बाबि निवडायचे आहे. तर बाबि निवडाय साठी काय करायचे आहे? यासाठी प्रत्येक घटक टाकत जायचं आहे, आपण कोण कोणत्या गोष्टी साठी अर्ज करणार आहात. तर यामध्ये तालुका दिसेल, गाव दिसेल, गट नंबर दिसेल, अनुसुचित जाती व जमाती शेतकरी यांच्या साठी विशेष योजना आहे. तर यामध्ये फक्त सगळि माहिती भरायची आहे. त्यामध्ये एक घटक निवडा हा ऑप्शन आहे.

तिथं ज्यासाठी अर्ज करायचा आहे तो घटक निवडायचे आहे. तर इथे आपण पाहू शकता, इनवेल बोरींग, जुनी विहीर दुरुस्ती, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, नवीन विहीरचे बांधकाम, पंप संच, विज जोडणी आकार, शेत तळयासाठि अस्तरीकरण. तर अशा प्रकारे तुम्ही कोणते घटक तुम्हाला पाहिजे आहे, ति बाबि तुम्हाला निवडायचे आहे.

तर सर्व प्रथम आपण जुनी विहीर दुरुस्ती साठी अर्ज करु. जुनी विहीर दुरुस्ती साठी नंतर जतन करा या ऑपष्न वर क्लिक करायचे आहे. नंतर संम्मति स्विकारण्याची आहे. आता यात तुमच्या बाबी एड झाल्या नंतर आपण यात दुसरा घटक निवडुया. आता इनवेल बोरिंग आपण निवडूया.

त्यानंतर जतन करायचे आहे. त्यानंतर जी संमती येईल ती संमती घ्यायची आहे. इथे कधी कधी प्रोब्लेम येऊ शकतो. तर पुन्हा पुन्हा क्लिक करून अशा प्रकारे पुर्व संमती शिवाय कोणत्याही खरेदी करणार नाही. अशी जी संमती आहे ति स्विकारण्याची आहे. यानंतर आपण पाहू शकता खाली दोन घटक आपण टाकले आहे, एक जुनी विहीर दुरुस्ती साठी आणि एक इनवेल बोरी साठी. तर इथे दोन्ही घटक हे ऎड आहे.

आता सर्वात महत्त्वाचे पॅइंट आहे. आता आपण नवीन विहीरचे बांधकाम, जुन्या विहीरची दुरुस्ती व शेततळ्यास अस्तिकरण या पैकी कोणत्याही एकाच बाबिचा लाभ घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचे आहे, या तिन्ही गोष्टी पैकी एकाच गोष्टि साठी अर्ज करु शकता. या पैकी एकच लाभ घेऊ शकता. बाबि निवडल्या नंतर आता आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी पुन्हा अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करा.

क्लिक केल्या नंतर ओ के करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका दिसेल. नंतर पहा या निळ्या रंगाच्या बटन वर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्ही ज्या बाबी निवडल्या आहेत ते इथे दिसतील.या अगोदर अर्ज केले ते पण दिसतील. त्यानंतर इथे तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे. प्राधान्य देताना जो क्रम आहे, त्यात अत्यंत आवश्यक गोष्टीला आधी प्राधान्य द्यायचं आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती माण्य करायचे आहे.

नंतर अर्ज सादर करा या हिरव्या बटन वर क्लिक करायचे आहे. आता आपलं अर्ज सबमिट झाले आहे. तर आता इनवेल बोरिंग आणि जुनी विहीर साठी अर्ज झाला आहे. तुम्ही आता छाननी अंतर्गत अर्ज या मधे येणार आहे. इथे इलिजीबल् फॅर लॉटरी असे दिसेल. इथे डाउनलोड रिसीप्ट वर जाऊन पावती बघू शकता. तुम्ही अशा प्रकारे ओनलाइन अर्ज करु शकता. अर्ज झाल्यानंतर तुम्हाला लॉटरी लागेल.

हि लॉटरी दोन ते तीन महिन्यांत सुद्धा लागू शकते. नंतर तुमचं नाव येईल आणि तुमचं नाव जर आलं तर तुम्हाला कागदपत्रेही अपलोड करावी लागतात. तिथे एक ऑप्शन आहे डाव्या साईडला तुम्हाला माहीत असेल तिथे जाऊन कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अगोदर अपलोड करायची गरज नाहीये लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे ही अपलोड करावी लागतात.

हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. दुसरा पॉईंट म्हणजे जर तुम्हाला लॉटरी लागली नाही तर काय करणार? तर तुम्ही पुढच्या वेळी तोच अर्ज पुढच्या गोष्टींसाठी, पुढच्या लॉटरीसाठी ग्राह्य धरला जातो. त्यामुळे तुम्हाला या वेळेस लॉटरी नाही लागली, तर तो चार्ज तुम्ही तसाच ठेवायचा आहे.

तो रिनीवल करायची गरज नाही. तोच अर्ज तुमचा पुढचा लॉटरी साठी गरजेचा आहे. तर यामध्ये झाले हे दोन मुद्दे- कागदपत्र कधी अपलोड करायची तर लॉटरी झाल्यानंतर. लॉटरी मध्ये नाव लागल्या नंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतात. आता कागदपत्रे जेव्हा तुम्ही अपलोड करता, तर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमची कागदपत्रे कृषी अधिकारी कडे जातात. आणि ती चेक केली जातात.

आता या कागदपत्रांमधे तुम्ही काय अपलोड करु शकता? तर कागदपत्रांमध्ये तुचा सातबारा, आठ-अ, बॅंक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, या गोष्टी द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे कोटेशन हे देन गरजेचे आहे. आणि त्या कोटेशन वर सही आणि शिक्का हे त्या, जिथुन तुम्ही कोटेशन घेणार आहात. कोणत्याही दुकानातुन घेणार असाल, त्या दुकानातून तुम्हाला ते सही – शिक्का असलेले कोटेशन घ्यायचं आहे.

समजा तुम्हाला पाईप लागले असतील, तर त्या दुकानातून तुम्हाला सही शिक्का असलेले कोटेशन घ्यायचं आहे. आणि त्या दुकानातून घेतांना एक विचारायचं आहे, ते म्हणजे जीएसटी बिलिंग आहे का? कारण की नंतर पुढे जाऊन तुम्हाला जीएसटी बिलिंग अपलोड करावे लागते. तिथे विसरायचं जीएसटी बिलिंग आहे का? हा तिसरा पॉइंट.

हा पॉइंट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आता येतो, तुमचा अर्ज हा, सगळी तुमचे डॉक्युमेंट दिले असतात, ते सगळे चेक केली जातात. आणि डॉक्यूमेंट चेक केल्यानंतर तुम्हाला इथे एक पूर्व संमती पत्र मिळतं. पूर्व संमती पत्र जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हाच तुम्ही ती वस्तू घ्यायची आहे, जी वस्तू तुम्हाला या योजनेअंतर्गत लागलेली आहे.

समजा तुम्हाला पाईप लागला असेल, तर तुम्हाला आता पूर्वसंमती पत्राचं, एक पूर्व संमती पत्र मिळेल. त्याच्या मध्ये किती अनुदान आहे? सगळी माहिती त्याच्यावरती डिटेल्स मध्ये लिहिलेले असते. आणि त्याच्या नंतरच तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करून तिथे ती वस्तू घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. तर ही वस्तू घेत असताना, तिथे ते अधिकारी जे आहेत, ते अधिकारी येणार आहेत आणि तुमच्या सोबत फोटो सुद्धा काढणार आहेत.

आणि तो फोटो आणि जीएसटी बिल, हे तुम्हाला बिल मध्ये अपलोड करायचा आहे. जिथे कागदपत्रे अपलोड करा, तिथे जायचा आहे. आणि तिथे जाऊन तुम्हाला बिल ऑप्शन आहे कागदपत्र शेजारी त्याच्या वरती क्लिक करून तुम्हाला तो फोटो आणि त्याचा सोबत तुम्हाला जीएसटी भेटलं होतं ते बिल अपलोड करायचा आहे.

आणि हे संपूर्ण बिल अपलोड केल्यानंतर तुमचा परत एकदा ते संपूर्ण बिल आणि तो फोटो चेक केला जाईल. अधिकाऱ्यांशी तपासणी केली जाईल. अधिकारी सगळे पाहून त्यानंतर तुम्हाला तुमचा अनुदान हे जे ठरवल्याप्रमाणे जे अनुदान असेल, दोन लाख, अडीच लाख, किती असेल ते सगळं तुमच्या कडे जे बँक खाता तुम्ही दिलं होतं, त्या बँक खात्यावर तिथं येणार आहे.