कॅन्सल चेक म्हणजे काय?।। कॅन्सल चेक कसा बनवायचा?।। कॅन्सल चेक चा उपयोग काय? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, बँक चेक हा प्रत्येकाच्या आर्थिक, व्यवहारिक जीवनातील अभिन्न भाग आहे. आर्थिक देवाण घेवाणीसाठी किंवा आर्थिक व्यवहारासाठी ऑनलाईन व्यवहाराबरोबरच मोठ मोठ्या व्यवहारांमध्ये चेकचा हमखास वापर केला जातो. चेकचे बरेच प्रकार आहेत.

त्यापैकी कॅन्सल चेक बद्दल तुम्ही ऐकले असेल किंवा यापूर्वी तुम्ही कुणाला कॅन्सल चेक दिला ही असेल. परंतु बर्‍याच लोकांना हे माहिती नाही आहे की हा कॅन्सल चेक काय असतो? त्याचे उपयोग काय आहे? कॅन्सल चेक हा का दिला जातो? व तो कसा बनवतात? चला तर मग आज आपण याबद्दलची सविस्तर माहिती बघूया.

कॅन्सल चेक म्हणजे काय?: कॅन्सल चेक हा एक सामान्य चेक असतो. आपल्याकडे असलेल्या चेक वर दोन मोठ्या आडव्या रेषा माराव्या लागतात आणि त्यावर कॅन्सल (Cancelled) असे लिहावे लागते. त्याला आपण कॅन्सल चेक असे म्हणतो. यावर Cancelled शिवाय काहीच लागत नाही. सहीसुद्धा करण्याची गरज नसते.

यावर Cancelled लिहिण्याचे एकच कारण असते, ते म्हणजे याच चेकचा कोणीही गैरवापर करू नये. आपण कोणत्याही बँकेच्या चेक ला कॅन्सल चेक म्हणून सादर करू शकतो. या कॅन्सर चेकच्या आधारे एखादी वित्तीय संस्था किंवा बँक आपल्या खात्याची संपूर्ण माहिती मिळवू शकते.

जसे की खाते क्रमांक, आयएफएससी कोड, ग्राहक क्रमांक, शाखेचा पत्ता, एम सी आय आर इत्यादी माहिती मिळू शकते. थोडक्यात काय तर ग्राहकाचा बँकेचा खाते क्रमांक, आयएफसी कोड अशाप्रकारची प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी कॅन्सल चेक चा वापर होतो.

कॅन्सल चेक कसा बनवायचा?: तर मित्रांनो, कोणत्याही बँकेचा चेक असो त्यावरती दोन आडव्या रेषा मारून त्यावरती साध्या पद्धतीने Cancelled असे लिहिलेले असते. मित्रांनो, त्याचे वर कुठेही सही केलेली नसते व कॅन्सल व्यतिरिक्त काहीही लिहिलेले नसते.

अशा पद्धतीने मित्रांनो कॅन्सल चेक हा बनवला जातो. मित्रांनो चेकच्या सर्वात खाली जो नंबर दिलेला असतो त्याचा एक अर्थ असतो. याची माहितीही आपण पुढे बघू.

कॅन्सल चेक चा उपयोग काय?: गुंतवणुकीसाठी: जर आपल्याला मार्केट मध्ये काही गुंतवणूक करायची असेल जसे की मॅच्युअल फंड, शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला केवायसी (KYC) करावे लागते. यासाठी आपल्याला कॅन्सल चेक ची गरज भासते.

बँकेत खाते सुरू करण्यासाठी : जर आपल्याला अन्य शाखेत नवीन खाते सुरू करायचे असेल तर आपल्याला कॅन्सल चेक ची मागणी केली जाऊ शकते. पुरावा म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो.

कर्जासाठी: जर आपण एखाद्या बँकेतून कर्ज घेत असाल तर आपल्याला बँकेत कॅन्सल चेक जमा करावा लागतो. केवायसी साठी आणि कर्जाचा ईएमआय इसीएम द्वारे सुरु करण्यासाठी कॅन्सल चेक बँकेला द्यावा लागतो.

पेमेंटसाठी: अनेकदा कंपनीकडून आपल्याला अनेक प्रकारचे पेमेंट घ्यावी लागते अशावेळी ऑनलाइन पेमेंट करायचं असेल तर कंपनी आपल्याला कॅन्सल चेक ची मागणी करू शकते.

विमा पॉलिसी (Insurance policy) : अनेकदा विमा कंपनीकडून विमा उतरवत असताना आपल्याला कॅन्सल चेक जमा करावा लागतो. पीएफ (PF) ची रक्कम काढण्यासाठी : सरकारी आणि खाजगी नोकरी करणाऱ्या नोकरदारांच्या पगारातील काही भाग हा प्रॉव्हिडंट फंडात जमा होतो.

जर तुम्हाला हा प्रॉव्हिडंट फंड काढायचा असल्यास तुम्ही कॅन्सल चेक चा वापर करून त्या अकाउंट (Account) मध्ये पैसे मागू शकता. तर मित्रांनो, ही होती कॅन्सल चेक बद्दल ची थोडक्यात माहिती. धन्यवाद.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.