नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
प्र१. एकदा दाव्या मध्ये तात्पुरत्या मनाई हुकूमाचा अर्ज जर फेटाळला तर, त्या दावा मिळकतीची विक्री करता येते का? उत्तर: इथे आपल्याला दोन मुख्य गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. एक म्हणजे मनाई हुकूम आणि दुसरं लिस पेंडंंन्सी. तात्पुरता मनाई हुकुम म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या मिळकती संदर्भात एखादा दावा दाखल केला जातो. तेव्हा तो दावा प्रलंबित असताना तो दावा मिळकतीमध्ये बदल किंवा हस्तांतरण वगैरे होऊ नये म्हणून, तात्पुरता मनाई हुकुम मिळण्याकरता अर्ज केला जातो.
आता हा अर्ज एकतर मंजूर होईल किंवा फेटाळला तर जाईल. कोणत्याही परिस्थितीत तात्पुरता मनाई हुकुमाचा अर्ज आहे तो त्या दाव्याच्या निकालापर्यंतच कायम असतो. जर तात्पुरता मनाईहुकूम तो मंजूर झाला, आणि दावा फेटाळला तर तात्पुरता मनाई हुकुम सुद्धा दाव्याच्या निकाला सोबत संपुष्टात येतो त्याचबरोबर जर समजा तात्पुरता अर्ज फेटाळला आणि दावा मंजूर केला तरीसुद्धा तो अर्ज आणि त्याचा निकाल हा दाव्याच्या निकाला बरोबर संपुष्टात येतो.
आता तात्पुरता मनाई हुकुमाचा अर्जाचा आदेश आणि मालमत्तेची विक्री याचा विचार करताना आपल्याला लीस पेंडेंसचा सुद्धा विचार करायला लागतो. आता हे कधी शक्य आहे? जर तात्पुरता मनाईहुकूमचा अर्ज मंजूर झाला तर मालमत्तेची विक्री करताच येत नाही. मात्र जर तात्पुरता मनाई हुकुमाचा अर्ज फेटाळला तर आपल्याला त्या मालमत्तेची विक्री करता येऊ शकते.
मात्र ती विक्री करताना लिस पेंडन्स हे तत्त्व त्या व्यवहाराला किंवा त्या विक्रीला लागू होतो. म्हणजे हे फेटाळल्यानंतर समजा तुम्ही विक्री केली, तर त्या विक्रीला लिस पेंडन्स हेच तत्त्व लागू होत. लीस पेंडन्सीच तत्व म्हणजे, एखादा दावा प्रलंबित असताना त्यांच्या मिळकतीची जर खरेदी विक्री किंवा हस्तांतरण होत असेल तर असा खरेदी विक्री किंवा हस्तांतरण हे त्या दाव्याच्या अंतिम निकालावर अवलंबून असतो.
म्हणजेच अंतिम निकाल त्या कराराच्या बाजूने लागला, तर त्या कराराला काही धोका होत नाही. मात्र जर तो कराराच्या विरोधात गेला, तर तो करार कायदेशीर संकटांमध्ये येऊ शकतो म्हणून, एखाद्या दाव्याची विषय असलेल्या मिळकतीची खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी फक्त तात्पुरत्या मनाईहुकूमचा विचार न करता लीस पेंन्डस याचासुद्धा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ तात्पुरता मनाई हुकुम मध्ये काय ऑर्डर झाले याच्यावर आपण खरेदी विक्री किंवा हस्तांतरणाचा अंतिम निर्णय घेणे हे निश्चितपणे काहीस धोकादायक आहे.
प्र२. एखाद्या व्यक्तीचा फसवणूक करून हक्क सोडपत्र झालेले आहे मात्र, त्या मालमत्तेचा सातबारा अजून आहे तसाच आहे. उत्तर: इथे दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे महसूल अभिलेख आणि दुसरा करार तोही नोंदणीकृत. एखादा रीतसर नोंदणीकृत हक्क सोड पत्र झालं असेल तर ज्या क्षणी ते हक्कसोडपत्र अस्तित्वात आला असेल त्या क्षणी त्या हक्कसोडपत्रानुसार एखाद्या व्यक्तीचे हक्क दुसऱ्या व्यक्तीच्या लाभात हस्तांतरित झालेले असतील.
तर ते फसवणूक करून केले आहे की योग्यरीत्या केले हा त्यांच्या पुढचा मुद्दा आहे. पण एकदा का हक्कसोडपत्र झालं की महसुली अभिलेखामध्ये काहीही असले तरी त्यांची त्या मालमत्तेची एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरण झालं हे निश्चित. केवळ महसूल अभिलेख बदलले नाही म्हणून हक्क सोड पत्रानुसार हस्तांतरण झालं नाही असं अजिबात नाही. महसुली अभिलेखावर आपलं नाव आहे म्हणून आपण निर्धास्त अजिबात राहू नये.
जर आपली फसवणूक करून असा एखादा हक्क सोड पत्र किंवा एखादा करार झाला असेल आणि त्या करारानुसार महसुली अभिलेख आजपर्यंत बनले नसतील, तरी सुद्धा ज्या कराराने आपली फसवणूक झालेली आहे, त्याला आव्हान देण, तो रद्द करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि कोणत्याही कराराला आव्हान देण्याची एक ठराविक मुदत असते, त्या मुदतीत जर आपण त्याला आव्हान नाही,
तर असं आव्हान देणं आणि त्याला यश येण, अशक्य नाही पण काहीतरी कठीण होऊन जात. म्हणून केवळ सातबारा किंवा महसुली अभिलेखावर आपलं नाव आहे म्हणून आपल्याला फसवून केलेल्या कराराला विरोधात काही करायचं नाही हा अत्यंत चुकीचा आणि आत्मघातकी निर्णय ठरू शकतो. त्यामुळे असा कोणताही करार ज्यायोगे आपली फसवणूक झाली किंवा आपल्या हक्क आणि अधिकारांवर गदा आली अशा कराराची माहिती मिळाल्यावर लवकरात लवकर त्याच्याविरोधात योग्य त्या न्यायालयामध्ये दावा दाखल करण, दाद मागण हे अत्यंत महत्वाचा आहे.
प्र३. भावंडांमध्ये खरेदीखत होऊ शकता का? उत्तर: तर हे निश्चितपणे होऊ शकत. भावंडांना जर एकत्रित मालमत्ता असेल, तर आपसात हस्तांतरित करायचे अनेक पर्याय आहेत. त्यातलाच एक आहे खरेदीखत, दुसरा आहे बक्षीस पत्र, आणि तिसरा हक्कसोड. आता मालमत्तेचे एकंदर स्वरूप कसा आहे, त्यानुसार आपण योग्य तो करार निवडून रीतसर नोंदणीकृत करार करून आपण आपल्या भावनांचा हक्क किंवा हिस्सा निश्चितपणे संपादित करू शकतो.
जर त्या विनामोबदला असेल तर त्याच्याकरता हक्क सोड पत्र किंवा बक्षीस पत्र केल तरी सुद्धा चालेल. मात्र जर त्याचा मोबदला अंतर्भूत असेल तर मात्र बक्षीस पत्र करता येणार नाही. खरेदी खत आणि हक्क सोड पत्र करता येईल. कारण बक्षीस पत्र हे विना मोबदला असतो. हक्क सोड पत्र हे विनामोबदला आणि मोबदला सह दोन्ही प्रकारे असू शकतो.
आणि खरेदी खत हे सुद्धा फक्त आणि फक्त मोबदला सही तच असतात त्यामुळे आपल्या भावंडांमध्ये नक्की काय करायचं आहे ? ती मालमत्ता काय स्वरूपाची आहे ? हे समजून घेतलं तर मग या खरेदी खत बक्षीस पत्र आणि हक्क सोड पत्र यापैकी योग्य त्या कराराची निवड करून आपण तो व्यवहार पूर्ण करू शकतो.
प्र.४ लेखी जबाबाने हक्क सोड. उत्तर: आता हक्कसोड झाल म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हक्क आणि अधिकार, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या लाभात हस्तांतरित झाले आणि अशी मालमत्ता किंवा असे हक्क किंवा अधिकार हस्तांतरित करायचे, तर ते नोंदणीकृत कराराने करणं हे अत्यंत आवश्यक आणि कायद्याने बंधनकारक आहे. लेखी जबाब, सत्य प्रतिज्ञापत्र, अर्ज, तोंडी वर्दी असे कुठलेही प्रकार नोंदणीकृत करारा ऐवजी वापरले जाऊ शकत नाही.
जर आपण आपला हक्क लेखी जबाब ने सोडला असेल आणि आपल्याला तो परत मिळवायचा असेल तर आपण निश्चितपणे मिळू शकतात त्याच प्रमाणे कोणी जर आपल्याला लाभात हक्क सोडणार असेल तर असा हक्क सोड पत्र रीतसर करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. केवळ काही लोक करतात किंवा महसूल अधिकारी नोंद करतात, तोंडी जबाबदारीसुद्धा सातबारा फेरफार होतो या कारणांकडे लक्ष देऊ नका.
कारण जर भविष्यात तुमच्या हक्कसोडपत्र ला विशेषतः लेखी जबाब, सत्य प्रतिज्ञापत्र, तोंडी वर्दी थोडक्यात नोंदणीकृत करार सोडून कोणत्याही प्रकारच्या हक्कसोडपत्राला जर आव्हान मिळालं तर, त्या आव्हानांवर आपला टिकाव लागण्याची शक्यता अत्यंत कमी असते. परिणामी आपला व्यवहार किंवा आपल्या लाभात झालेलं हस्तांतरण हे कायदेशीर कचाटयात सापडुन रद्द सुद्धा होऊ शकतो. हे जर टाळायचं तर असे सगळे व्यवहार पूर्णतः आणि नेहमी नोंदणीकृत कराराद्वारे केले पाहिजेत इतर कोणतेही शॉर्टकट त्यांच्याकरता वापरू नयेत.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा