जमिनीच्या सातबार्‍यावर आपलं नाव आहे पण त्या जमिनीवर प्रत्यक्ष ताबा आपला नसेल तर मोजणी करता येते का? ।। प्रलंबित फेरफार मागे घेता येतो का? ।। नोटरी कुलमुखत्यार पत्राद्वारे विक्री आणि फसवणूक झाली असेल तर काय करावे? ।। दावा सुरू असताना बांधकाम करता येते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

Uncategorized

प्रश्न 1: एखाद्या जमिनीच्या सातबार्‍यावर समजा आपलं नाव आहे पण त्या जमिनीवर प्रत्यक्ष ताबा आपला नसेल तर मोजणी करता येते का? उत्तर: मोजणी करता येते का या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अनेक अंगांनी विचार करून द्यायला लागेल. मोजणी करता अर्ज करण्याकरता आपल्या नावावर सातबारा असणं किंवा सातबारावर आपलं नाव असणं एवढे पुरेसे असते.

सहाजिकच जर सातबारा आपल्या नावे असेल तर आपल्याला त्या जागेच्या मोजणी करता अर्ज निश्चितपणे करता येईल. पण मोजणी प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर ते लोक जेव्हा प्रत्यक्ष मोजणी करता येतील तेव्हा जर त्यांना मोजणी करताना कोणी आडकाठी केली किंवा काही विरोध केला तर ती मोजणी होणारच नाही.

समजा विरोध केला नाही मोजणी करून दिली मात्र अशा मोजणी दरम्यान एखाद्या मिळकती पैकी किती क्षेत्रावर कोणाचा कब्जा आहे हे जर त्या मोजणे परत एकदा रेकॉर्डर आलं तर त्याचा आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो. कारण जोवर मोजणी होत नाही तोवर एखाद्या जागेवर नक्की बाबा कोणाचा आहे याचा रेकॉर्ड किंवा अभिलेख उपलब्ध नसतात.

पण समजा आपण आपल्या अतिक्रमित जागेची मोजणी करून घेतली आणि त्या मोजणी मध्ये आपल्या जागेवर अमुक अमुक क्षेत्रावर अमुक अमुक व्यक्तीचे अतिक्रमण आहे असं जर रेकॉर्डवर आलं तर ते अतिक्रमण रेकॉर्डवर आल्यामुळे त्या विरोधात आपल्याला कायदेशीर कार्यवाही करता येईल. मात्र कोणत्याही व्यक्तीकडून ताबा मिळवणे तेसुद्धा कायदेशीर कारवाई द्वारा ताबा मिळवणं हे आपल्याकडे खर्चिक आणि वेळखाऊ काम आहे.

बरं आपणच मोजणी करून त्याचा ताबा रेकॉर्डर आणल्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या ताब्याचा आयता पुरावा सहजपणे उपलब्ध होईल त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपली जागा आपल्या ताब्यात नसताना मोजणी करावी का? ती केली तर काय होऊ शकेल? त्याचे परिणाम काय आहेत? या सगळ्याचा विचार करावा आणि मगच त्या जागेची मोजणी आपण करावी.

प्रश्न 2: प्रलंबित फेरफार मागे घेता येतो का? उत्तर: आता प्रलंबित फेरफार म्हणजे नक्की काय तर जेव्हा एखाद्या फेरफार करता अर्ज किंवा वर्दी देण्यात येते तिथपासून मंडळ अधिकाऱ्याने तो फेरफार नोंद मंजूर करेपर्यंत एखादा फेरफार हा प्रलंबित फेरफार असतो. सहाजिकच प्रलंबित फेरफार यांचा सातबारा वरती अंमल देण्यात येत नाही. आणि जोवर एखादा फेरफार प्रलंबित आहे तोवर त्याला पूर्णतः कायदेशीर फेरफार नोंदी चा दर्जा प्राप्त होत नाही.

आता प्रलंबित फेरफार असल्यामुळे तो मागे जर घ्यायचा असेल तर ते काहीसं सोपं असत. ज्या व्यक्तीने तो फेरफार होण्याकरता अर्ज केला असेल तो अर्ज जर त्या व्यक्तीने मागे घेतला तर सहाजिकच तो प्रलंबित फेरफार सुद्धा आपोआप मागे घेतला जाईल. पण अर्ज मागे घेण्याकरता जो अर्ज देणार त्याच्या अगोदर समजा त्या प्रलंबित फेरफार यावर कार्यवाही सुरू झाली ते विवादित प्रकरण म्हणून तहसिलदारा कडे गेलो तर आपल्याला त्या विवादीत प्रकरणांमध्ये हजर राहावे लागेल आणि तिथे आपल्याला आपलं म्हणणं मांडायला लागेल.

तिथपर्यंत जर प्रकरण गेलं नसेल एखादा फेरफार हा केवळ प्रलंबित असेल त्याच्या नुसत्या नोटीस निघाले असतील अजून त्याचा रूपांतरण विवादित प्रकरणांमध्ये झालेलं नसेल तर असा प्रलंबित फेरफार आणि तो फेरफार करण्याकरता दिलेला अर्ज आपण निश्चितपणे मागे घेऊ शकतो. आणि ते काहीसं सोपं सुद्धा आहे.

प्रश्न 3: नोटरी कुलमुखत्यार पत्राद्वारे विक्री आणि फसवणूक झाली असेल तर काय करावे? उत्तर : सगळ्यात पहिला पण एक लक्षात घेतले पाहिजे की आपल्याकडे नोटरी आणि कुलमुखत्यारपत्र याचे दोन स्वतंत्र कायदे आहेत. आता या दोन्ही कायद्यांमध्ये पॉवर ऑफ पॅटर्नी किंवा कुलमुखत्यार पत्र नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.

अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही म्हणून जेव्हा आपण कुलमुखत्यार पत्र देतो पण ते नोंदणीकृत असो अनोंदणीकृत असो किंवा नोटरी केलेला असो ते देताना आपण शंभर टक्के काळजी आणि दहादा विचार करून मगच असा कुलमुखत्यार पत्र देणं गरजेच आहे. जर आपण निष्काळजीपणे एखादं कुलमुखत्यारपत्र दिलं आणि त्याचा वापर किंवा गैरवापर झाला तर त्याचा नाहक त्रास आपल्यालाच भोगायला लागते.

आता या परिस्थितीत समजा आपण दिलेल्या कुलमुखत्यार पत्राचा चुकीचा किंवा गैरवापर करून मालमत्तेची विक्री झाली असेल तर त्या विरोधात आपण दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारच्या कारवाया करू शकतो. आपली फसवणूक झाल्यामुळे आपण IPC नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता आणि आपल्या मालमत्तेची विक्री झालेली आहे तो विक्रीचा करार किंवा व्यवहार किंवा हस्तांतरण झालेले आहे ते रद्द करण्या करता आपण दिवाणी न्यायालयात सुद्धा दाद मागू शकता.

मात्र दिवाणी न्यायालय असो किंवा फौजदारी तक्रार असो या दोन्हीचा निपटारा होण्याकरता बर्‍यापैकी कालावधी जातो त्यामध्ये आपला वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी खर्च होतात म्हणून शक्यतोवर असं नोटरी कुलमुखत्यारपत्र सहजासहजी कोणासही देऊ नये. जोवर आपला शंभर टक्के विश्वास बसत नाही तोवर अस नोटरी कुलमुखत्यार पत्र न देणं हे निश्चितपणे श्रेयस्कर आणि आपल्या दीर्घकालीन फायदा करता अत्यंत महत्त्वाच आहे.

प्रश्न 4: दावा सुरू असताना बांधकाम करता येते का? उत्तर: आता एखाद्या मालमत्ते संदर्भात दावा सुरु असेल तर त्या मालमत्ते संदर्भात काय करता येतं आणि काय करता येत नाही हे त्या दाव्याची एकंदर परिस्थिती आणि त्या दाव्यात दरम्यान केलेले आदेश याच्यावर अवलंबून आहे. समजा दावा प्रलंबित असताना त्या मालमत्तेचे हस्तांतरण किंवा विक्री करण्यास किंवा बांधकाम करण्यास स्टे दिलेला असेल

किंवा दावा प्रलंबित असेपर्यंत किंवा अर्ज प्रलंबित असेपर्यंत स्टेटस को अर्थात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिलेला असेल तर आपल्याला अशा या मिळकतीवर दावा प्रलंबित असेपर्यंत किंवा तो स्टेटस को किंवा सत्तेचा आदेश कायम असेपर्यंत बांधकाम करता येणार नाही. तसं केल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरू शकतो.

त्या दरम्यान कोणताही मनाईहुकूम स्टे ऑर्डर किंवा स्टेटस को ऑर्डर दिलेली नसेल तर अशा मालमत्तेवर बांधकाम करण्यास कोणतीही मनाई नसल्याने त्या बांधकामाला कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही. मात्र हे आपण जेव्हा म्हणतो की एखादा दावा प्रलंबित आहे तर तो दावा प्रलंबित असताना त्या दाव्याचा जो विषय आहे तिची दावा मिळकत आहे

त्यासंदर्भात आपण जे काही करू मग ते बांधकाम असेल खरेदी विक्री असेल किंवा हस्तांतरण असेल ते सगळं किंवा आपली ती सगळी कृत्य दाव्याच्या अंतिम निकालाच्या आधीन असते हे आपण पक्कं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे जर दाव्याचा निकाल आपल्या विरोधात गेला तर आपली कृत्या गैर ठरू शकतात. आणि दाव्याचा निकाल जर आपल्या बाजूने लागला तर आपल्याकडून त्यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही.

म्हणून दावा केवळ प्रलंबित आहे याच्यावर काय करावं किंवा काय करू नये याचा निर्णय घेऊ नये. दाव्यामध्ये आदेश झाला आहे का? दाव्याचा संभाव्य निकाल कधी येणार आहे? काय स्वरूपाचा येणार आहे? याच्यावर आपण साधकबाधक विचार करावा आणि त्याच्या नंतरच एखादी गोष्ट करण्याचा किंवा न करण्याचा अंतिम निर्णय आपण घ्यावा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

2 thoughts on “जमिनीच्या सातबार्‍यावर आपलं नाव आहे पण त्या जमिनीवर प्रत्यक्ष ताबा आपला नसेल तर मोजणी करता येते का? ।। प्रलंबित फेरफार मागे घेता येतो का? ।। नोटरी कुलमुखत्यार पत्राद्वारे विक्री आणि फसवणूक झाली असेल तर काय करावे? ।। दावा सुरू असताना बांधकाम करता येते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

  1. माझ्या जमिनीवर सात बारा उतारा नाव आहे पण मला जमिनीवर मोजून देण्यात येत नाही ती जमीन विकसित करीत आहे तरी मला उपाय सांगावे

Comments are closed.