🌀 मानसिक दृष्ट्या मजबूत बनण्याचे रहस्य ।। जाणून घ्या अशी 13 लक्षणे कि ज्याद्वारे तुम्ही अशा लोकांना सहज ओळखू शकतात !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपले NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

तुमची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली, तरी जीवनाचा खरा आनंद मिळवण्यासाठी तुमची मानसिक स्थिती चांगली असणे खूप गरजेचे आहे. मानसिक दृष्ट्या मजबूत असणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आपण योग्य मार्गाची निवड करू शकतो. जर तुम्ही मानसिक दृष्ट्या मजबूत असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात खूप प्रगती करू शकतात. असे लोक शरीर, व बुद्धी दोन्हीने सामर्थ्यवान असतात. या प्रकारच्या व्यक्ती यश मिळविण्यासाठी कोणताही शॉर्टकट शोधत नाहीत. ते नेहमी प्रेरित असतात व आपल्या ध्येया बद्दल खूप गंभीर असतात. जर तुम्ही स्वतःला तुमच्या प्रोब्लेम पेक्षा कमी लेखत असाल तर तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम खूप गंभीर वाटतात. पण जर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम पेक्षा स्वतःला मोठे समजाल, तर कितीही मोठी समस्या तुम्हाला खूप लहान वाटेल. जर तुम्ही पण अशा सिच्युएशनमध्ये अडकला असाल ज्याचा सामना करणे खूप कठीण वाटत असेल, तर डोन्ट वरी. इथे तुम्हाला मानसिक दृष्ट्या मजबूत असलेल्या लोकांच्या काही सवय सांगणार आहे. त्या जर तुम्ही आत्मसात केल्या, तर कितीही कठीण परिस्थितीला तुम्ही सामान्य स्थितीत बदलू शकता. चला तर मग बघुया त्या सवयी नक्की कोणत्या आहेत?

1. मानसिक दृष्ट्या मजबूत व्यक्ती आपली एनर्जी संभाळून ठेवतात : आपल्या भावनांवर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. मेंटली स्ट्रॉंग लोकांना हे चांगले माहीत असते. त्यांच्याकडून तुम्ही हे कधीच ऐकणार नाही की, एखाद्या मित्राने माझे मन दुखी किंवा उदास केल. जेव्हा तुमचे स्वतःवर नियंत्रण असते, तेव्हा नकारात्मक परिस्थितीला कसे सामोरे जावे हे तुम्हाला कळते.

2. स्वतः बद्दल वाईट वाटून घेत नाही : मानसिक दृष्ट्या मजबूत लोकांकडे एवढा वेळ नसतो की भूतकाळाबद्दल किंवा होऊन गेलेल्या गोष्टीवर दुःख करत बसतील. त्यांना माहीत आहे की असे केल्याने केवळ वाया जाईल. ते आपला सर्व वेळी यशस्वी कसे होता येईल? यामध्ये लक्ष देण्यासाठी घालवतात.

3. वेळेनुसार स्वतःला बदलतात : बरेच लोकांना त्यांच्या जीवनात बदल झालेला आवडत नाही. खूप लोकांना आयुष्यात बदल करणे खूप कठीण आणि अशक्य वाटते. मेंटली स्ट्रॉंग लोकांमध्ये वेळेनुसार बदलण्याची क्षमता असते.

4. जा गोष्टी ते बदलू शकत नाही, त्याबद्दल काळजी करत बसत नाही : मानसिक दृष्ट्या बळकट लोक ट्राफिक जाम, सामान हरवल्यासारखा गोष्टींबद्दल चिंता करत नाहीत. कारण त्यांना माहित आहे की, या परिस्थितीला ते बदलू शकत नाही.

5. असे व्यक्ती प्रत्येकासमोर झुकत नाही : जर आपण मानसिक दृष्ट्या मजबूत असेल, तर आपण बऱ्याच लोकांना निराश करू शकता. मानसिकदृष्ट्या खंबीर लोक सर्वांसमोर हांजी हांजी करत नाहीत. ते आपल्या मनाचा आणि डोक्याचा विचार करून नाही म्हणायला अजिबात संकोच करत नाही.

6. विचारपूर्वक रिस्क घेतात : या लोकांना माहीत असते की, रीस्क कुठे घ्यायची? आणि कुठे नाही? ते प्रथम प्रत्येक परिस्थिती चे फायदे आणि तोटे याबद्दल विचार करतात. आणि मग रिस्क घेतात.

7. आपल्या भूतकाळाबद्दल विचार करत बसत नाही : असे व्यक्ती आपल्या भूतकाळाबद्दल विचार करण्यात आपला वेळ वाया घालवत नाहीत. ते वर्तमानात जगतात आणि भविष्य काळासाठी प्लॅनिंग करतात.

8. मानसिक दृष्ट्या मजबूत व्यक्ती त्यांच्या चुकांमधून शिकतात : मेंटली स्ट्रॉंग व्यक्ती त्यांच्या चुकांची जबाबदारी घेतात आणि त्यांच्यातून शिकतात व भविष्यात त्या चुका परत करत नाही. चुकांमधून शिकून पुढे चांगले निर्णय घेतात.

9. असे व्यक्ती दुसऱ्याचा यशाचा हेवा करत नाहीत : मानसिक दृष्ट्या बळकट लोक पूर्ण आत्मविश्वासाने इतरांच्या यशाचा आनंद साजरा करतात. जेव्हा कोणी त्यांची फसवणूक करतो, तेव्हा ते वाईट मानून त्याचा पश्चाताप करत बसत नाहीत. ते व्यक्ती आपल्या कठोर परिश्रम आणि यश मिळवल्यावर विश्वास ठेवतात.

10. मानसिक दृष्ट्या मजबूत लोक आपले लक्ष्य सोडत नाहीत : वाटेतील अडचणी मुळे अयशस्वी होऊन ते आपल्या मार्ग बदलत नाहीत. परंतु संधी म्हणून त्या अपयशातून शिकतात. अडचणींवर मात करेपर्यंत वारंवार ते अडचणींचा सामना करतात.

11. एकटेपणा पण एन्जॉय करतात : असे लोक स्वतः सोबत आनंदी असतात. त्यांना कोणत्याही समर्थनाची आवश्यकता नसते. त्यांना एकटे राहण्यातही मजा येते.

12. यशाची स्वतःची व्याख्या तयार करतात : मानसिक दृष्ट्या मजबूत व्यक्ती स्वतःच्या आयुष्याची व्याख्या तयार करतात. हे व्यक्ती असा विचार करतात की प्रत्येकाकडे यश मिळवण्याचा स्वतःचा मार्ग असतो. अशा लोकांना कोणालाही पराभूत करण्यासाठी जिंकण्याची इच्छा नसते. परंतु स्वतासाठी जिंकण्याची इच्छा असते आणि त्यांना स्वतःची कोणाशी तुलना करणे आवडत नाही.

13. ते ताबडतोब निकाल जाणून घेण्यास उतावळे नसतात : एखाद्या नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा जिम जॉईन केली असेल, तर ते लगेच त्याचे परिणाम कडे नाही बघत. त्यांना माहीत आहे की चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागतो.