प्लास्टरिंग या कामाबद्दल महत्वाची माहिती ।। एक ब्रास म्हणजे किती प्लास्टर काम असतं? ब्रास मध्ये प्लास्टर च मोजमाप कसं घ्यायचं? किंवा मोजमाप कसं कॅल्क्युलेट करायचं? एक ब्रास प्लास्टर काम करण्यासाठी साहित्य किती लागतं? या संबंधित माहिती जाणून घेऊया !

लोकप्रिय शैक्षणिक

या पूर्वी आपण कन्स्ट्रक्शन मधील वेग वेगळ्या टॉपीक ची माहिती घेतली होती. आज या लेखामध्ये आपण गिलावा काम, म्हणजेच प्लास्टरींग. या कामा संबंधित माहिती आपण घेणार आहोत. ज्यामध्ये एक ब्रास म्हणजे किती प्लास्टर काम असतं? ब्रास मध्ये प्लास्टर च मोजमाप कसं घ्यायचं? किंवा मोजमाप कसं कॅल्क्युलेट करायचं? एक ब्रास प्लास्टर काम करण्यासाठी साहित्य किती लागतं? या संबंधित माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये आपला पहिला पॉईंट आहे.

एक ब्रास म्हणजे किती?: ज्या वेळी आपल्याला गिलावा काम म्हणजे प्लास्टरींग च काम करायचं असतं. त्यावेळी एक ब्रास बरोबर शंभर चौरस फूट. या मोजमापाणी आपण काम करतो. शंभर चौरस फूट म्हणजे शंभर स्क्वेअर फुट. मराठी मध्ये आपल्याला चौरस फूट म्हणतो. इंग्रजीमध्ये स्क्वेअर फूट म्हणतो.

आता आपल्याला जर ब्रास मध्ये म़जमाप कॅल्क्युलेट करायचं झालं. म्हणजे समजा आपल्याकडे भिंती ची साईज आहे. लांबी आणि उंची, हे दोन मोजमाप आहे. तर त्याच ब्रांच मध्ये कन्व्हर्ट कसे करायचे? जेवढे चौरस फूट असेल, स्क्वेअर फूट असेल, आपल्याला सुरुवातीला भिंतीच्या लांबी आणि उंची या दोन्ही मोजमापाचा गुणाकार करायचा असतो.

हे मोजमाप आपण घेणार ते फुटा मध्ये घ्यायचं. म्हणजेच भिंतीची लांबी आणि भिंतीची उंची, हे दोन मोजमाप फूट मध्ये घ्यायची. आणि या दोन्हीचा गुणाकार करायचे. गुणाकार केल्यानंतर आपल्याला चौरस फूट मध्ये उत्तर मिळून जातं. जे काय चौरस फूट मध्ये, स्क्वेअर फूट मध्ये उत्तर आपल्याला मिळालेला आहे त्याला भागिले शंभर करायचे. आपल्याला ब्रास मध्ये उत्तर मिळून जाईल. फॅरम्युला फक्त लक्षात ठेवा. ब्रास बरोबर चौरस फूट. म्हणजेच स्क्वेअर फूट भागिले शंभर. हा मुद्दा लक्षात ठेवा.

यानंतर आपला दुसरा टॉपीक आहे एक ब्रास गिलावा काम करण्यासाठी साहित्य किती लागेल: आपण पाहिले की एक ब्रास बरोबर शंभर चौरस फूट. आपल्याला ज्यावेळी गिलावा काम करायचं असतं. त्यावेळी त्या कामाचा आकारमान माहिती पाहिजे. आता आपण एक ब्रास गिलावा काम करण्यासाठी साहित्य किती लागेल? हे पाहणार आहोत.

मग आपल्याला इथं गिलावा कामाचं आकारमान मिळाले आहे. एक ब्रास म्हणजे शंभर चौरस फूट. पण जर आपण गिलावा काम पाहिले. तर आपल्याला चौरस फूट मध्ये गिलावा कामाची लांबी. आणि गिलावा कामाची उंची. या दोन बाजू मिळून जातात. जर आपण गिलावा काम पाहिले.

तर त्यामध्ये आपल्याला गिलावा कामाची लांबी, गिलावा कामाची उंची आणि गिलावा कामाची जाडी. म्हणजेच रूंदी. या तीनही बाजू पहायला लागतात. ज्यावेळी आपल्याला साहित्य कॅल्क्युलेट करायचं असतं. त्यावेळी कोणते ही कंस्ट्र्क्शन च काम असू दे, त्या कंस्ट्र्क्शन कामासाठी जर आपल्याला साहित्याची कॅल्क्युलेशन करायचं झालं.

तर त्याचा आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावा लागतो. म्हणजेच आकारमान कॅल्क्युलेट करावा लागतो. ज्याला आपण घनफळ किंवा घनफुटामध्ये आपण काढू शकतो. मग आपल्याला एक ब्रासच आपण जर विचार केला. तर एक ब्रास मध्ये आपल्याला शंभर चौरस फुटाचा सरफेस असतो. पृष्ठभागा असतो.

त्या गिलावा कामाची जाडी. आपण गिलावा काम हे दोन थरांमध्ये करत असतो. म्हणजे जर वीट बांधकाम असेल तर बारा एम एम चा गिलावा केला जातो. पण समजा जर दगडी बांधकाम असेल. तर वीस एम एम जाडी पर्यंत गिलावा काम होतं. शक्यतो जास्त करून बारा एमएम जाडीचा गिलावा जास्त करून केला जातो.

आणि यामध्ये बारा एम एम चा पहिला थर असतो. अंडर कोट आणि तिन एम एम चा दुसरा थर म्हणजे फिनिशिंग कोट असतो. जर आपण दोन्ही थराचा जर विचार केला. तर आपल्याला बारा एम एम प्लस् तीन एम एम. असा जवळपास पंधरा एम एम जाडीचा गिलावा काम मिळून जातो. जवळपास अर्धा इंच चा गिलावा काम होतो.

जर आपण या गिलावा कामाची व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला. म्हणजे घनफळ काढलं. तरी गिलावा काम आपल्याला पाच घनफूट मिळुन जातो. एक ब्रास गिलावा काम हे पाच घनफूट असतं. आता आपण पाहतो की एक ब्रास गिलावा काम करायचं झालं. तर आपल्याला पाच क.फू. किंवा घनफूट याप्रमाणे मिळून जाते. जर आपण पाच क.फू. गिलावा काम करायचं असेल. तर आता आपण क.फू. मध्ये हिशोब करुया.

करणा आपल्याला साहित्याचा कॅल्क्युलेशन करायचा आहे. आता आपण जर पाच क. फू. आपल्याला गिलावा काम करायचं झालं. तर आपल्याला काय करावे लागेल? पाच क. फू. इतकं सिमेंट आणि वाळू यांचं मिश्रण घ्यावे लागेल. पण हे साहित्य कसं असणार आहे? कोरडे साहित्य असणार आहे. म्हणजे सिमेँट आणि वाळु. हे नुसतं कोरडा साहित्य असणार आहे. आपण त्यामध्ये पाणी मिक्स करणार.

आणि मॉरटर तयार करणार. पण ज्यावेळी आपण सिमेँट आणि वाळु त्यामध्ये पाणी मिक्स करतो, त्याचा मॉरटर तयार करतो. त्यावेळी सिमेंट च आकारमान हे तीस टक्क्यांनी कमी होतं. हा सिमेंट चा गुणधर्मच आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं? कोरडे साहित्य हे तीस टक्के जास्त घ्यावे लागतं. आणि दुसरा मुद्दा आहे. की गिलावा काम करताना वेस्टेज जास्त जातं. म्हणजे सिमेंट आणि वाळू यांचं जे काही मॉरटर असतो. तो वेस्ट खूप जातो.

त्यामुळे आपल्याला वीस टक्के साहित्य हे जास्त घ्यावे लागतं. त्यामुळे आपण काय करुया? कोरडे साहित्य घेताना म्हणजे सिमेंट आणि वाळू हे कोरडे घेताना काय करायचं? पन्नास टक्के जास्त घ्यायचं. म्हणजे आता आपल्याला इथं गिलावा काम किती करायचा आहे? पाच क.फू. च करायचं आहे. म्हणून आपण काय करणार? पाच क.फू. प्लस पन्नास टक्के. म्हणजे जर आपलं साहित्य वेस्ट गेलं किंवा सिमेंट आकारमान जरी कमी झाले.

तर आपल्याला पाच फुटाचा जे आपलं गिलावा काम असणार आहे. म्हणजेच एक ब्रास चार गिलावा काम असणार आहे. तो परफेक्ट होऊन जाईल. म्हणजे जर आपण पाच क. फू. ला पाच ट. फू. च साहित्य घेतले. म्हणजे सिमेंट आणि वाळू हे तेवढेच जर घेतलं. तर आपला गिलावा काम हे अर्धवट होणार. पूर्ण होणार नाही.

त्यामुळे आपल्याला साहित्य घेताना, जे काही आकारमान कमी होणार आहे. किंवा जे काही वेस्ट होणार आहे. ते ऍड करूनच घ्याव लागेल. मग आपण काय करायचं. एक ब्रास चा आपल्याला पंधरा एम एम जाडी चा गिलावा करायचं आहे. आणि त्यामध्ये बारा एम एम चा पहिला कोट. आणि तीन एम एम चा फिनिशिंग कोट. अशा दोन्ही कोट चा आपण हिशोब इथे धरलेला आहे.

पण आपण काय करणार? एक ब्रास साठी पाच क. फू. प्लस पन्नास टक्के, असे टोटल सात पॉईंट पाच क. फूट इतकं साहित्य घेतले. आता इथे आपल्याला साहित्याचा आकारमान मिळालेला आहे. एक ब्रास गिलावा काम पंधरा एम एम जाडीमध्ये करण्यासाठी आपल्याला कोरड्या साहित्याचा आकारमान मिळालेला आहे.

सात पॉईंट पाच क. फूट. किंवा घनफूट. हे आपल्याला मिळालं आहे. यानंतर आपण साहित्याचा कॅल्क्युलेशन कसे करायचं? या संबंधित माहिती घेऊ. जर आपल्याला गिलावा काम करायचं असेल. तर आपल्याला साहित्य लागतं सिमेंट आणि वाळु. या दोन्ही च आपण काय करतो? मिश्रण तयार करतो. जर आपल्याला गिलावा काम करायचं झालं. तर आपण एकास तीन, एकास चार, एकास पाच किंवा एका सहा या प्रमाणाचा जास्त करून वापर करतो.

सर्वात जास्त एकास तीन आणि एकास चार या प्रमाणाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. यामध्ये पहिला अंक असतो, हा सिमेंटचा असतो. आणि दुसरा अंक असतो हा वाळू चा असतो. म्हणजे जर समजा आपण एकास तीन हे प्रमाण धरलं. तर पहिला अंक काय आहे? एक आहे. म्हणजे जेवढं आपण सिमेंट घेणार आहोत. दुसरा अंक आपल्याला काय मिळून जातो तीन. जेवढे सिमेंट घेणार आहोत त्याच्या तीन पटीने जास्त काय करायचं, वाळू घ्यायची असते.

समजा जर एक पोते सिमेंट असेल, तर तीन पोती वाळू आपल्याला मॉरटर मध्ये वापरावे लागेल. या पद्धतीने विश्लेषण करायचं असतं. तर आपण सर्वात पहिल्यांदा सिमेंट ची कॉन्टिटी काढू. म्हणजे आपल्याला सिमेंट किती लागेल? हे आपण चेक करू. आपल्याला सिमेंट किती लागणार, हे जर कॅल्क्युलेट करायचं झालं.

तर काय करायचं आहे? जे कोरर्डे मॉरटर चे आकारमान आहे, आपण एक ब्रास साठी किती घेतलेला आहे? सात पॉईंट पाच क्युबिक फूट. तर त्याला भागिले काय करायचं? जे काही प्रमाण आहे. आता एकास तीन या प्रमाणात आपण काय करतो? साहित्य कॉलक्यूलेट करतो.

म्हणून कोरडे मॉरटर चे आकारमान भागिले प्रमाण यांची बेरीज. मग आपण काय करणार? ७.५/ ४ तर आपल्याला उत्तर मिळतं १.८८ क.फू. पण सिमेंट हे आपण कशामध्ये घेतो? बॅग मध्ये घेतो. पोत्यांमध्ये घेतो. मग जर बॅगमध्ये कॅल्क्युलेट करायचं झालं तर काय करावे लागेल? एक क.फू. मध्ये ०.८ पोती असतात. मग आपण काय करणार? १.८८ क.फू x ०.८=१.५ पोती. म्हणजे दीड पोती सिमेंट आपल्याला लागणार.

लक्षात ठेवा एक क्युबिक फूट बरोबर झिरो पॉईंट आठ पोते. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे जेवढं क.फू आलेला आहे. त्याला गुणुले ०.८ पोती करायचं. आपल्याला पोत्यामध्ये उत्तर मिळून जाईल. जर आपल्याला पाटी मध्ये सिमेंट मोजायचं असेल. म्हणजे आपण मॉरटर तयार करण्यासाठी जी बुटी वापरतो स्टील ची. त्याला आपण पाटी म्हणले जाते जास्त करून.

त्या पाटी मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं झालं. तर जेवढं सिमेंट आलेलं आहे. जे पोत्यात आपण काढलेले आहे. त्याला गुणिले पाच करायचं. आपल्याला पाठीमध्ये उत्तर मिळून जाईल. कारण का एका पोत्यात जास्तीत जास्त पाच पाटी सिमेंट असतं. जेवढं पोती सिमेंट आलेला आहे. त्याला गुणिले पाच करायचं.

त्यानंतर आपण वाळू किती लागेल? किंवा वाळू चि कॉन्टिटी कशी काढायची? ते आपण पाहूया. आपल्याला जे वाळू चं प्रमाण दिलेलं आहे. ते किती आहे? तीन आहे. म्हणजे एकास तीन. सिमेंटच्या तीन पट जास्त आपल्याला काय करायच आहे? वाळू घ्यायचे आहे. आपल्याला सिमेंट मिळालेला आहे. १.८८ क्युबिक फुट. किंवा घन फुट. त्याला गुनिले काय करणार आपण? तीन करणार. त्याला उत्तर मिळून जातं ५.६४ क्युबिक फूट.

म्हणजे इतके वाळू आपल्याला लागणार आहे. आता ही वाळू चाललेली बारीक वाळू असणार आहे. आपण जी अखंड वाळू आणतो. ती चाळून घेतल्यानंतर आपल्याला ५.६४ क.फू इतकी वाळू घ्यायची आहे. एक ब्रास गिलावा काम करायचं झालं, पंधरा एम एम जाडीमध्ये. तर ७.५ पाटी सिमेंट. आणि तेवीस पाटी वाळू. हे साहित्य लागेल. आपण जर वाळू ब्रास मध्ये कॉलक्यूलेट करायचे असेल. तर वाळूची कॉन्टिटी आपण ५.६४ क.फू घेतलेली होती. त्याला भागिले शंभर करायचं. आपल्याला ब्रास मध्ये उत्तर मिळून जाईल.

यानंतर आपण एक ब्रास गिलावा काम करण्यासाठी खर्च किती येतो? किंवा हा खर्च कसा कॅल्क्युलेट करायचा? या संबंधित माहिती घेऊयात. महत्वाचे जे मुद्दे आहेत. म्हणजे गिलावा काम करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य. तर साहित्य चं खर्च आपल्याला ऍड करावं लागेल. त्या मध्ये सिमेंट, वाळू, पाणी या तिन्ही गोष्टीचा खर्च आपल्याला ऍड करावे लागेल. त्यानंतर महत्वाचं म्हणजे की कामगार.

आता आपल्याला गिलावा काम करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे कामगार लागतील? मिस्त्री किती लागेल? लेबर किती लागतील? त्या सर्वांचा पगार आपल्याला ऍड करावे लागले. आणि हे किती दिवस आपलं काम चालू आहे? त्यानुसार त्यांचा पगार आपण ॲड करायचं. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो तो. कॉन्ट्रॅक्टर चा फायदा.

जर समजा तुम्ही काम कॉन्टॅक्ट ने देनार असाल कोणाला. किंवा तुम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टर असाल. काम घेणार असाल. तर तुम्हाला तुमची परसेंटेज या कामांमध्ये ॲड करावे लागतील. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. इतर खर्च. कारण बर्याच ठिकाणी कामाच्या बाबतीत इतर खर्च जास्त होत असतो. त्यामुळे आपल्याला इतर खर्च सुद्धा त्या कामा मध्ये ऍड करावा लागतो. या पद्धतीने आपण एक ब्रास गिलावा कामासाठी लागणारा खर्च काढू शकतो.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.