अलमट्टी भारतातील एक महत्त्वाचे धरण. मित्रांनो आपल्यापैकी बर्याच जणांना अलमट्टी धरण माहिती असेल. जे भारतातील एक महत्त्वाची आणि प्रमुख धरण म्हणून ओळखले जाते. अलमट्टी धरणाची उंची पाच फूट आणि वाढवावी यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. ज्यामुळे या धरणाची उंची वाढवल्याने त्याचा फटका धरणाच्या मागे असलेल्या अनेक गावांत बरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे सुद्धा बसणार आहे. खास करून महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर तसेच सांगली हे दोन जिल्हे 2019 आणि 2021 साली महापुराने पाण्याखाली गेल्यामुळे मोठे नुकसान झाले होते.
कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये महापूर आला की या अलमट्टी धरनाला जबाबदार धरले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का आहे? तर भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे आणि त्याची पाणी साठवण्याची क्षमता किती आहे? याची उंची आणि लांबी किती आहे? अशी सर्व प्रकारची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
अलमट्टी धरण भारताच्या कर्नाटक या राज्यांमध्ये आहे. कर्नाटक राज्यातील विजापूर आणि बागलकोट या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आलमट्टी धरण बांधलेले आहे. विजापुर जिल्ह्यातील बागेवाडी तालुक्यामधील निडगुंडी या गावाजवळ हे धरण आहे. अलमट्टी धरणाची भिंत विजापूर जिल्ह्यात तर पाण्याचा साठा बागळकोट जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. या धरणाला लालबहादूर शास्त्री धरण म्हणून ओळखले जाते. ज्यावर लालबहादूर शास्त्री सागर या नावाचा जगातील सर्वात लांब धातूचा फलक तयार करून बसवण्यात आलेला आहे.
भारतातील सर्वात प्रसिद्ध धरणांपैकी एक असलेल्या अलमट्टी हे धरण कृष्णा या नदीवर उभारलेले आहे. कृष्णा ही नदी भारतातील सर्वात मोठे नद्यांपैकी एक आहे. अलमट्टी धरण 2000 ते जुलै 2005 दरम्यान बांधून पूर्ण करण्यात आले. साधारणता हे धरण बांधून पूर्ण करण्यासाठी 5 वर्षाचा कालावधी लागला होता. मात्र या धरणाच्या मुख्य कार्याची सुरुवात 1997 मध्ये झाली असे सांगण्यात येते. कर्नाटक राज्यातील सर्वात मोठे जलाशय पैकी एक असलेले अलमट्टी धरण जल विदूत, जल व्यवस्थापन आणि जवळपासच्या परिसरात सिंचन करण्यासाठी उभारण्यात आले होती.
अलमट्टी धरण कोयना, वारणा, पंचगंगा दुधगंगा आणि घटप्रभा या प्रमुख नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा येत असतो. अलमट्टी धरण अप्पर कृष्णा पाटबंधारे प्रकल्पाचा मुख्य जलाशय आहे. अलमट्टी धरणाच्या तांत्रिक माहिती बद्दल जाणून घ्यायचे झाल्यास अलमट्टी धरणाची उंची ही 52.24 मीटर म्हणजे 171.39 फूट इतकी आहे. यांनी या धरणाची लांबी 1564.83 मीटर म्हणजे 5133.96 फूट इतकी आहे. आलमट्टी धरणाचे बांधकाम इसवी सन 2000 ते 2005 दरम्यान पूर्ण करण्यात आले. या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 123 TMC म्हणजेच 1 लाख 23 हजार 900 दशलक्ष घनफूट इतकी आहे.
या धरणाचा उपयुक्त जलसाठा 105.44 टीएमसी म्हणजे 1 लाख 5 हजार 440 दशलक्ष घनफूट इतका आहे. अलमट्टी धरणाला एकूण 26 दरवाजे आहेत. पावसाळ्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यावर या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. ज्यामधून 631.5 दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली जाते. तसेच या धरणाच्या जवळपास असणाऱ्या शेतजमिनींना सिंचनासाठी या धरणाचा खूप मोठा फायदा होतो. त्याचबरोबर अलमट्टी धरण निसर्ग सौंदर्यासाठी खूपच प्रिय आहे. या ठिकाणी असणाऱ्या शांत आणि स्वच्छ वातावरणाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील बरेच पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या धरणाला भेट देत असतात.
एक लोकप्रिय स्पॉट म्हणून त्यांची ओळख आहे. अलमट्टी धरणाच्या जवळ अनेक सुंदर आणि आकर्षक अशी पर्यटनस्थळे आहेत. यांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. अलमट्टी धरण परिसरात सुमारे 7 टेरेस गार्डन आहे. ज्या ठिकाणी म्युझिकल कारंजे, स्वच्छ कारंजे आणि बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर या धरणाच्या एका बाजूला रॉक हिल नावाची एक भाग आहे. ज्यामध्ये सिरॅमिक वन्यजीव प्राणी कृत्रिम जंगल देखील पाहायला मिळते. तसेच धार्मिक पर्यटन स्थळांमध्ये या धरणाच्या जवळपास मशीद आणि मंदिरे देखील आहेत. तिथे आपल्याला इब्राहिम रोजा, मोठी टेकड्या, बागेवाडी, विजापूर पुरातत्व संग्रहालय, भैरमगड वन्यजीव अभयारण्य अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते.
या धरणाला भेट देण्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर हा कालावधी अतिशय योग्य समजला जातो. कारण या वेळेस धरण पूर्ण भरले असते. अलमट्टी धरण कोल्हापूर या शहरापासून 240 किलोमीटर असून बागळकोटपासून 41 किलोमीटर अंतर, विजापूर पासून 70 किलोमीटर अंतरावर आहे.