केंद्र सरकारने UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा लागू करावी, यासाठी काही राज्यांमध्ये आंदोलनं झाली तर काही राज्यांनी ही ओल्ड पेन्शन स्कीम लागू देखील केली आणि अचानक ही नवीन पेन्शन योजना जाहीर झाली. तर UPS आणि OPS यामध्ये फरक काय आहे? चला तर जाणून घेऊया..
2004 सालापर्यंत जी पेन्शन योजना लागू होती तिला म्हटलं जातं ओल्ड पेन्शन योजना म्हंटल जात. 2004 साली वाजपेयी सरकारने योजनेच्या जागी आणलेली नवीन योजना म्हणजे न्यू पेन्शन स्कीम. सुरुवातीला ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना होती आणि नंतर ती खासगी क्षेत्रातल्या कर्मचारी देखील खुली करण्यात आली होती.
NPS म्हणजे न्यू पेन्शन योजनामध्ये म्हणजे ठराविक पेन्शन मिळण्याची हमी नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे एमपीएस कॉन्ट्रीब्युशन योजना आहे. तर यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा हिस्सा भरायला आणि सरकारकडून त्यांच्या पेन्शनसाठी काही हिस्सा दिला जातो. ओल्ड पेन्शन स्कीम ही बिना फंड पेन्शन योजना होती आणि यामध्ये पेन्शनसाठीचे सगळे पैसे सरकारकडून दिले जात होते. त्यामुळे सहाजिकच सरकारवर याचा भार जास्त होता.
शिवाय NPS शेअर बाजाराची जोडलेली असल्याने मार्केटमधल्या परतावं वरती पेन्शन प्रमाण अवलंबून होतं. नवीन यु पी एस आणि ओ पी एस यामध्ये फरक काय आहे? तर ओल्ड पेन्शन स्कीम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम यांचा पेन्शन मोजण्याचे गणित हे वेगवेगळे आहे. म्हणजे तर ओ पी एसमध्ये कर्मचाऱ्याचा शेवटच्या पगार म्हणजे बेसिक्स पगाराच्या 50% आणि महागाई भत्ता हे मिळून एक ठराविक रक्कम ही पेन्शन म्हणून मिळत होती.
तर यु पी एस पेन्शन योजनेमध्ये काय मिळणार आहे? तर समजा तुम्ही सरकारी कर्मचारी आहात आणि तुमची किमान पंचवीस वर्षांची नोकरी झाले तर आता तुमच्या रिटायरमेंटच्या आधीच्या शेवटच्या वर्षात या बारा महिन्यात मिळालेला पगार येथे धरला जाईल. त्याच्या बेसिस एलरीच 50 टक्के रक्कम अधिक महागाई भत्ता अशी रक्कम तुम्हाला पेन्शन मिळेल. ज्यांची सर्विस यापेक्षा कमी झाले आहेत त्यांच्यासाठी हे प्रमाणे त्यांच्या कार्यकाळानुसार ठरवले जाईल.
किमान दहा वर्षांचे नोकरी असणे आवश्यक आहे. ओ पी एस आणि यूपीएस मधला एक महत्त्वाचा फरक म्हणजे यूपीएस मध्ये एम्प्लॉयी कॉन्ट्रीब्युशन लागणार आहे. बेसिक पगाराच्या 10 टक्के आणि महागाई भत्ता असा कर्मचाऱ्यांचा वाटा असेल. यामध्ये सरकारकडं 18.5 % यांचे योगदान दिले जाईल. जुन्या पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या निवृत्तीवेतनासाठी काही पैसे भरावे लागत नव्हते. टॅक्स बेनिफिटच्या या बाबतीत बोलायचं झालं तर जुन्या पेन्शन योजनेत कर्मचारी पैसे भरत नव्हते त्यामुळे करसवलत मिळण्याचा मुद्दाच नव्हता.
एनपीएस मधले कॉन्ट्रीब्युशनसाठी कर्मचाऱ्यांना बेनिफिट मिळतो. जुन्या आणि नवीन अशा दोन्ही कर प्रणालीमध्ये हा असाच त्यांना फायदा मिळतोय. युनिफाईड आणि जुन्या पेन्शन योजनेमधील आणखी एक फरक म्हणजे निवृत्तीनंतर तुम्हाला ग्रेच्युटी शिवाय एकरकमी पैसे मिळू शकत होती. यूपीएसमध्ये तुम्ही निवृत्त होताना काही पैसे एक रकमी घेतले तर त्याचा दर पेन्शनवर त्याचा परिणाम होणार नाहीये. ओल्ड पेन्शन स्कीम नुसार एकूण पेन्शनच्या 40 टक्के पैसे एक रक्कमी घेता यायचे. पण त्यानंतर तुमच्या महा पेन्शनची रक्कम ही कमी होत होती.
याचबरोबर, जुनी पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन स्कीम या दोन्हीमध्ये वाढती महागाई हा मुद्दा हे लक्षात घेण्यात आलेल्या आहे. सरकारने महागाई भत्ता वाढवला की, जुन्या पेन्शन योजने खालच्या पेन्शनमध्ये बदल होतो.