कधी काळी श्रीमंत असलेले हे 8 देश आज झाले आहेत अत्यंत गरीब.
नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
कोणत्याही देशाला आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. त्यालाही बरीच वर्षे लागतात. परंतु जर परिस्थिती आपल्यास अनुकूल नसेल तर एक चांगला, विशेषतः समृद्ध देश देखील कमकुवत होतो. अशा परिस्थितीत आपण त्या 10 देशांबद्दल जाणून घेऊया जे पूर्वी खूप श्रीमंत होते पण आता गरीब झाले आहेत.
1) थायलंड : हा देश पूर्णपणे गरीब नसला तरी , त्याचा GDP जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. थायलंड देशाचा ईशान्य आणि दक्षिण भागा हा खूपच गरीब म्हणता येईल. 16व्या आणि 17व्या शतकांबद्दल बोलायचे झाल्यास, थायलंडचे अयुथ्या साम्राज्ज हे एकेकाळी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मुख्य केंद्र होते. त्यांचा मुख्य व्यवसाय चीन आणि जपानशी होता. त्याकाळी थायलंडचे फ्रान्स आणि पोर्तुगालशी यांच्याशी देखील चांगले संबंध होते. परंतु, 18 व्या शतकापर्यंत त्याची अर्थव्यवस्था हळू-हळू ढासळू लागली. 1765 मध्ये, बर्मा या देशाने हल्ला चढवत थायलंड उद्ध्वस्त करून टाकले आणि थोनबुरी साम्राज्य तेथे आले.
2) माली : आजच्या घडीला हा देश जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत येतो. येथील लोक उदरनिर्वाहासाठी शेती करतात, त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जगतात. पूर्वी इथे खूप मोठे साम्राज्य होते. 1312-1317 पर्यंत, मोझेस नावाच्या शासकाचे इथे राज्य होते, जो त्या काळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील होता. मालीमध्ये सोने बनवले जात असे आणि ते पुढे इजिप्त, पर्शिया, जिनिव्हा आणि व्हेनिसमध्ये विकले जात असे. 16 व्या शतकापर्यंत हा एक अतिशय श्रीमंत देश राहिला, परंतु नंतर त्याची स्थिती खराब होत गेली.
3) तुर्की : या देशाला गरीब म्हणता येणार नाही, पण त्याचा GDP इतर युरोपीय देशांपेक्षा खूप कमी आहे. 16 व्या शतकाबद्दल बोलायचे झाले तर तुर्की हा पश्चिम युरोपमधील देशांपेक्षा एक श्रीमंत देश होता. 1520-1566 च्या दरम्यान, सुलतान सुलेमानचे इथे शासन होता, ज्याच्या राजवटीत देशाची संपत्ती खूप वाढली. नंतर 1700 मध्ये युरोपने ते राज्य आपल्या ताब्यात घेतले. पहिल्या महायुद्धानंतर टर्की खूप कमकुवत झाला. त्या काळात तुर्की हेऑट्टोमन साम्राज्य म्हणून ओळखले जात होते जे 1922 मध्ये तुर्की बनले.
4) लॅटव्हिया: 1918 मध्ये स्वातंत्र्यानंतर लॅटव्हियाने 1922 मध्ये संविधान स्वीकारले. शेती, लाकूड, मांस, दूध, लोणी यासारख्या व्यवसायामुळे हा देश खूप श्रीमंत होता, परंतु दुसऱ्या महायुद्धापासून त्याची स्थिती कमकुवत झाली आहे. आज हा देश गरीब देशांच्या यादीमध्ये गणला जातो. अगदी काही दशकांमध्ये या देशाचे होत्याचे नव्हते झाले. रीगा ही लॅटव्हियाची राजधानी, सर्वात मोठे शहर व बाल्टिक समुद्रातील एक महत्त्वाचे रशियन बंदर म्हणून विख्यात आहे. ते लॅटव्हियाचे प्रमुख सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय व प्रशासकीय केंद्र आहे.
5) क्युबा : 28 ऑक्टोबर 1492 रोजी ख्रिस्तोफर कोलंबसने क्युबाच्या भूमीवर पाऊल ठेवले आणि जगाला एका नवीन देशाची ओळख करून दिली. 1959 मध्ये हा देश अमेरिकेपेक्षा अधिक GDP असलेला देश होता. येथे लोकांकडे सर्वाधिक कार आणि टेलिफोन असायचे. पण नंतर ते वाढत्या जुगाराचे अड्डे, गुन्हेगारी, ड्रग्ज आणि वेश्याव्यवसायामुळे कमकुवत झाले. कम्युनिस्ट राजवट आणि ट्रंप काळात अमेरिकन निर्बंधांमुळे क्युबाची स्थिती कमकुवत झाली आहे. हा देश सध्या आर्थिक स्थिति सुधारण्यासाठी झगडत आहे.
6) इराक : 60 आणि 70 च्या दशकात इराक हा विकसित देशांपैकी एक होता. त्याच्या तेल आणि वायूच्या साठ्याने 1950 पर्यंत GDP चांगला राखला. पण त्यानंतर १९७९ मध्ये सद्दाम हुसेन सत्तेवर आल्यानंतर आणि शेजारच्या इराणशी आठ वर्षांच्या युद्धानंतर देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली. यानंतर कुवेत आणि आखाती युद्धाचाही वाईट परिणाम झाला.
7) झिम्बाब्वे : झिम्बाब्वे 1980 च्या दशकात अधिक नैसर्गिक संसाधने आणि शेतीमुळे चांगल्या स्थितीत होते, परंतु 1990 नंतर त्याची स्थिती बिघडू लागली. एकीकडे अंतर्गत वाद, युद्ध, सरकारी भ्रष्टाचार, बेरोजगारी, औद्योगीकरणाकडे दुर्लक्ष अशी परिस्थिति असताना दुसरीकडे, 2000 मध्ये, राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांनी देशाच्या शेतजमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि देशात गरिबी वाढत गेली. अगदीच काही वर्षांपूर्वी गरीबीवर नियंत्रण आनण्यासाठी तेथील सरकारने देशात भरमसाठ नोटा छापून त्या नागरिकांना वाटल्या. याचा काहीच फायदा झाला नाही. तिथे एक किलो साखर घेण्यासाठी पोते भरून पैसे घेऊन जावे लागत असे अशी परिस्थिति निर्माण झाली होती.
8) वेनेजुएला : तेलावर अवलंबून असलेल्या या देशाची एकेकाळी मोठी अर्थव्यवस्था होती. दक्षिण अमेरिका खंडात असलेला हा देश कधी काळी खूप श्रीमंत होता. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला या देशातील लोक हात पंपाच्या सहाय्याने जमिनीतून तेल काढत असे. जसजसे या देशातील तेलाच्या साठयाबाबत इतर प्रगत देशांना समजू लागले, तसे मोठ मोठ्या कंपन्यांनी या देशात कारभार करण्यास सुरुवात केली. भ्रष्ट राजकरणि लोकांना हाताशी धरून गरिबांवर अन्याय, अत्याचार करून या देशाचे आणि तिथल्या नागरिकांचे शोषण करण्यास सुरुवात झाली.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.