ना’र्को टे’स्ट म्हणजे काय? ।। पॉ’लिग्राफ टे’स्ट म्हणजे काय? ।। या दोन्हीमध्ये फरक काय असतो? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शैक्षणिक

आज आपण बघणार आहोत, ना’र्को टेस्ट बद्दल. हे ना’र्को टेस्ट म्हणजे नक्की काय?:अशा अजून कोणत्या टेस्ट आहेत का? तसेच थोड्याशा कायदेशीर बाबी देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघू हे नार्को टेस्ट ही अशी एकटीच आहे का? तर नाही.

नार्को टेस्ट सोबत ईतर अनेक टेस्ट आहेत. त्याच एक गट आहे. आणि ज्याला साधारणपणे आपण लाई डिटेक्टर टेस्ट मानतो. लाई म्हणजे खोटं आणि डिटेक्टर म्हणजे तपासणी. तर खोटं तपासणारे या सगळ्या तपासण्या आहेत. म्हणजे माणुस खरे बोलतो की खोटे. अशा या लाई डिटेक्टर टेस्ट आहेत. त्याचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. नंबर एक म्हणजे पॉलिग्राफ टेस्ट. आणि नंबर दोन म्हणजे नार्को अनालिसिस.

तर पॉ’लिग्राफ टेस्ट म्हणजे काय?: तर यामध्ये व्यक्ति ला काही विशिष्ट गोष्टी तिच्या मोजले जातात ते कोणते? तर हृदयाची गती, नाडीचे ठोके, त्यानंतर श्वास घेण्याची गती, माणसाच्या घामाच्या ग्रंथी असतात, त्यांची ऍक्टिव्हिटी या टेस्ट मध्ये मोजली जाते. या सगळ्यासाठी चे मॉनिटर त्या व्यक्तीला लावली जातात.

आणि मग त्याला काही प्रश्न विचारले जातात. जर ती व्यक्ती खोटे बोलत असेल,तर हृदयाची गती वाढते, श्‍वासाची गती वाढते, ठोके वाढतात. तसेच घाम देखील फुटतो. चोराच्या मनात चांदणे, या म्हणी चा अर्थ जर काय असेल? तर ते या टेस्टमध्ये आपल्याला दिसून येतो. तुम्ही देखील जर कधी खोटं बोलला असेल, तर तुम्ही देखील हे अनुभवलं असेल, की खोटे बोलताना थोडी मनातून भीती वाटते. त्यामुळे आपल्या हृदयाची गती वगैरे वाढलेली असते.

ही टेस्ट कोणा द्वारे केली जाते?: तर जे ह्याच्या मध्ये ट्रेन्ड तज्ञ असतात, किंवा मानसोपचार तज्ज्ञ असतात. त्यांच्या दारे ही टेस्ट केली जाते. त्याच्या मधे लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचा औषध दिले जात नाही. ना कोणत्या प्रकारचे त्याला, झोपवलं जाते. किंवा कोणत्या प्रकारचे गुंगीची किंवा नशेची औषध दिले जात नाही. तर हे होते पॉलिग्राफ टेस्ट बद्दल.

आता आपण बोलू ना’र्को टेस्ट बद्दल: जसं मी सांगितले नार्को टेस्ट म्हणजे नार्को अनॅलिसिस हे त्याचं पुर्ण नाव आहे. यामध्ये काय करतात? त्या व्यक्तीला एका स्पेशल लॉब मध्ये नेले जाते. कुठेही ही टेस्ट होऊ शकत नाही. तिथे भुल तज्ञ आणि न्यायवैद्यक शास्त्र तज्ञ, हे डॉक्टर उपस्थित असतात.

त्या व्यक्तीला आधी सर्व मॉनिटर म्हणजे त्याच्या हृदयाची गती, ईसीजी, श्वास घेण्याची गती. तसेच मेंदूच्या ॲक्टिविटी देखील मोजमाप करणारे म्हणजे आलेखावर मांडणारी एक यंत्रणा जोडली जाते. आणि मग त्या व्यक्तीच्या नसेद्वारे सोडियम थायोपेंटॉल नावाचं इन्जेक्शन दिलं जातं. वास्तविक पाहता हे सोडियम थायोपेंटॉल इंजेक्शन ऑपरेशन थेटर मध्ये, व्यक्तीला भूल देण्यासाठी वापरल्या जातात.

म्हणजे त्या व्यक्तीला काही आठवत नाही. तसंच वेदना देखील होत नाही. आणि ती व्यक्ती झोपून राहते. परंतु हेच इंजेक्शन जर अगदी कमी प्रमाणात, कमी डोस मध्ये जर दिलं, तर माणूस अर्धवट बेशुद्ध मध्ये जातो. आणि तो आपल्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो. परंतु त्यांची विचार करण्याची क्षमता ही खुंटलेली असते. म्हणजेच तो कोणताही नवा विचार करू शकत नाही.

उदाहरणार्थ जर मला खोटं बोलायचं असेल, तर एखादी घटना मनात बनवावी लागते. आणि मग ते समोरच्याला खोटं सांगावं लागतं. परंतु या इन्जेक्शन मुळं काय होतं? की त्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता जवळपास संपून जाते. आणि तो खोटं बोलत नाही. त्यामुळे तुम्ही त्याला जे विचारल ते तो खरं खरं सांगतो. तर अशी आहे ही नार्को टेस्ट.

आता आपण त्याच्या थोडं कायदेशीर बाबींविषयी बोलूया. तर कायदेशीर बाजू म्हणजे काय? तर सर्वप्रथम ही टेस्ट कोणत्याही प्रकारची लाई डिटेक्टर टेस्ट. मग ती नको असुदे, किंवा पॉलिग्राफ असुदे. त्यासाठी कोर्टाची अनुमती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीशी ज्याची नार्को आणि पॉलिग्राफ टेस्ट करायचे आहे. त्या व्यक्ती ने स्वतः या साठी स्वखुषीने, स्वच्छेने अनुमती देणे आवश्यक आहे.

आणि त्याच्या शिवाय नार्को किंवा पॉलिग्राफ यापैकी कोणतीही टेस्ट करता येत नाही. हे आधी लक्षात घ्या. त्याच बरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण जरी म्हणत असलो की व्यक्ती ह्याच्या मध्ये खरं बोलते. तरी सुद्धा ह्या टेस्ट दरम्यान, व्यक्ति जर काही जवाब देत असेल. तर तो पुरावा म्हणून ग्राह्य घरण्यात येत नाही. ते खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती सांगत असेल, की मी अमुक अमुक व्यक्तीचा खून केला.

तर तो त्याला शिक्षा देण्यासाठी पुरावा म्हणून मान्य करण्यात येत नाही. पण त्याच्यामध्ये जर ती व्यक्ती सांगत असेल, की मी इथं हे हे केलं, या ठिकाणी जाऊन असा गुन्हा केला. तिथे इतर लोकांनी ते बघितलं. आणि त्या लोकांची नावं जर त्याच्यामध्ये आली. तर त्या दुसऱ्या लोकांची चौकशी करून, तो गुन्हा सिद्ध करता येतो. जर समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्याचं खून केला. आणि ते खून केलेलं बंदूक किंवा पिस्तूल त्याने एखाद्या ठिकाणी गाढून ठेवलं.

आणि नार्को टेस्ट मध्ये तो म्हणाला, की मी माझं पिस्तूल इथे इथे ठेवले आहे. तर पोलिस त्या ठिकाणी त्याची पडताळणी करतात. आणि जर ते खरंच तिथं असेल. तर त्या पिस्तूल चा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो. पण त्या टेस्टमध्ये त्यांनी दिलेल्या जवाबदार पुरावा म्हणून वापर करता येत नाही. हे समजून घेणे महत्वाच आहे.

त्याच बरोबर या टेस्ट वर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जातात. की याची रिलायबेलिटी आणि व्हॅलिडिटी नाही. कोणत्याच टेस्ट ची नसतं शंभर टक्के त्यामुळे या वर देखील काही ऑब्जेक्शन्स किंवा काही आरोप केले जातात. काही अंशी ते खरे देखील असतात. परंतु तरीदेखील तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या टेस्ट आहेत.

अशी मागणी केली जाते की आरोपीच्या टेस्ट बरोबर कुटुंबीय आहेत त्यांची देखील टेस्ट केली जावी तर हे शक्य आहे का? तर जर कोर्टाने आदेश दिले आणि जर त्या पिडीत लोकांनी, आणि त्या आरोपींनी त्यासाठी अनुमती दर्शविली तर हे शक्य आहे. त्यांचं नार्को टेस्ट देखील करता येऊ शकते. तर हे होते मित्रांनो नार्को टेस्ट बद्दल आणि पॉलिग्राफ टेस्ट बद्दल म्हणजे लाई डिटेक्टर टेस्ट बद्दल.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.