वर्ग २ जमिनीचे मृत्यूपत्र करता येते का?।। वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीसपत्र केलं असेल तर ते रद्द करता येते का?।। मृत्यूपत्रामध्ये एकाच वारसाला सगळी मालमत्ता दिली असेल तर बाकीच्यांना त्या विरोधात दाद मागता येते का?।। स्वकष्टार्जित जमीन असेल तर ती आपल्या मुलांच्या नावे कशी करावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो आज आपण खालील काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत पहिला प्रश्न : वर्ग २ जमिनीचे मृत्यूपत्र करता येते का?: आता हे लक्षात घेतले पाहिजे की वर्ग २ जमीन किंवा नियंत्रित सत्ता प्रकाराची जमीन म्हणजे नककी काय तर वर्ग २ किवा नियंत्रित सत्ता प्रकार असे धारणा असलेल्या जमिनीच्या हस्तांतरण, व्यवहार किंवा करार इत्यादी करण्यावर काही र्निबंध असतात.

वर्ग २ जमिनीचं हस्तांतरण, व्यवहार किंवा करार करण्यासाठी सक्षम अधिकारी किंवा सक्षम कार्यालय यांची पूर्व परवानगी आवश्यक असते. अशा पूर्व परवानगी शिवाय अशा जमिनींचे हस्तांतरण किंवा व्यवहार आणि करार करण्याला कायद्याने मनाई आहे. मात्र जेव्हा आपण मृत्यूपत्राचे विचार करतो तेव्हा मृत्यूपत्र ज्या दिवशी करण्यात येते त्याच दिवशी ते आमलात येत नाही किंवा त्याची अंमलबजावणी होत नाही.

एखादी व्यक्ती जेव्हा मृत्यूपत्र करत असते, त्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी हे त्या व्यक्तीच्या निधनानंतर होत असते. सहाजिकच ज्या दिवशी मृत्यूपत्र करण्यात आलं त्यादिवशी त्या मालमत्यांचं हस्तांतरण होत नाही. त्याचमुळे समजा एखाद्या वर्ग २ जमिनीचं मृत्यूपत्र करायचं असेल तर त्याला कोणत्याही कायद्याची कोणतीही बाधा येणार नाही.

कारण मृत्यूपत्रानी कोणताही हस्तांतरण किंवा व्यवहार किंवा करार होत नसतो. मृत्यूपत्रअस्तित्वात आलं म्हणजे मालमत्तेचं हस्तांतरण झाले असे नाही. मात्र या मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीची जेव्हा वेळ येईल म्हणजे त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्या मृत्यूपत्रानुसार जेव्हा प्रत्यक्ष ती मालमत्ता हस्तांतरण करण्याची वेळ येईल, तेव्हा एखाद्या वेळेस त्या वर्ग २ जमिनीकरता सक्षम अधिकारी किंवा कार्यालय यांची पूर्व परवानगी घ्यावी लागू शकते. मात्र मृत्यूपत्र करण्याकरिता अशा कोणाच्याही कोणत्याही पूर्वपरवानगीची अजिबात आवश्यकता नाही.

पुढचा प्रश्न आहे समजा वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीसपत्र केलं असेल तर ते रद्द करता येते का?: आता हे लक्षात घेतले पाहिजे म्हणजे वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीस आहे म्हणून ते रद्द करता येणारच नाही किंवा ते रद्द करता येईल असा कोणताही निश्कर्ष आपल्याला काढता येत नाही.

कोणताही बक्षीसपत्र किंवा कोणताही करार जर असेल तर तो रद्द होण्याकरिता त्यामध्ये काहीतरी कायदेशीर त्रुटी, काहीतरी कायदेशीर दोष असणे आवश्यक आहे. जेव्हा आपण वडिलोपार्जित बक्षीसपत्राचा विचार करतो तेव्हा त्या बक्षीसपत्राने जर बक्षीस देणाऱ्या व्यक्तीच्या हिश्यापुरतच बक्षीस दिलेले असेल

आणि बाकी सगळ्या कायदेशीर करतूदींची पूर्तता केलेली असेल तर त्याला आव्हान देऊन ते रद्द करता येणे काहीसे कठीन आहे. मात्र जर वडिलोपार्जित जमिनीच्या बक्षीसपत्रामध्ये बक्षीस देणाऱ्या व्यक्तीचा हक्क किंवा हिस्सा जेवढा आहे, त्यापेक्षा जास्त क्षेत्र किंवा जास्त जमीनी जर समाविष्ट असतील

आणि त्यामध्ये इतर काही कायदेशीर त्रूटी सुद्धा असतील तर मात्र असे बक्षीसपत्र त्या व्यक्तीचा हिस्सा सोडून इतर जे काही क्षेत्रफळ आहे किंवा इतर ज्याकाही जमिनी आहेत, त्याच्याकरीता निश्चितपणे रद्द करून घेता येईल. थोडक्यात म्हणजे कोणत्याही बक्षीसपत्र किंवा कोणताही करार जर आपल्याला रद्द करून घ्यायचा असेल तर त्या करारामध्ये काय कायदेशीर त्रूटी आहेत,

काय कायदेशीर दोष आहेत याचे विचार करणे आवश्यक आहे. आणि त्या कायदेशीर त्रूटी आणि दोषाच्या आधारावर जर आपण दावा दाखल केला तर त्यात आपल्याला यश येणाची शक्यता किती आहे, याचेसुद्धा विचार केले पाहिजे. आणि या दोन गोष्टींचा सारांसार विचार करून मगच आपण अशा एखाद्या बक्षीसपत्राला किंवा कराराला आव्हान देऊन ते रद्य करण्याची कारवाई सुरु केली पाहिजे.

पुढचा प्रश्न म्हणजे समजा मृत्यूपत्रामध्ये एकाच वारसाला सगळी मालमत्ता दिली असेल तर बाकीच्यांना त्या विरोधात दाद मागता येते का?: आता एक लक्षात घेतले पाहिजे की मृत्यूपत्र आणि त्यांनी जर एकाच वारसाला दिले असेल तर याचे आपल्याला मुख्यतः दोन अंगांनी विचार करावे लागते. सर्वप्रथम ती जी मालमत्ता आहे ती वडिलोपार्जित आहे का आणि ती स्वकष्टाची आहे का, हे त्या मृत्यूपत्रासंदर्भात दोन महत्वाचे मुद्दे आहेत.

समजा एखादी मालमत्ता वडिलोपार्जित असेल आणि त्या मृत्यूपत्रामध्ये त्या व्यक्तीने आपल्या हक्क आणि हिस्स्यापेक्षा जास्त मालमत्ता एखाद्या वारसाला दिलेली असेल तर त्या विरोधात इतर वारस निश्चितपणे दाद मागू शकतात. कारण वडिलोपार्जित मालमत्ता जर असेल तर त्यामध्ये आपल्या फक्त अविवाजित हक्क आणि हिश्श्यापुरताच त्या व्यक्तीला व्यवहार करता येतो

त्याच्या पूढे जर त्याने व्यवहार म्हणजे मृत्यूपत्र केलं तर त्यावर निश्चितपणे दाद मागता येईल. मात्र समजा एखाद्या व्यक्तीची मालमत्ता स्वकष्टार्जित आहे आणि ती त्याने मृत्यूपत्राने काही ठरविकच वारसांना दिली तर मात्र अशा परिस्थितीत बाकी वारसांना त्या मृत्यूपत्राला आव्हान देण्याची आणि त्या आव्हानाला यश येण्याची शक्यता ही काहीशी कमी आहे.

कारण जेव्हा आपण स्वकष्टार्जित मालमत्तेचा विचार करतो तेव्हा त्या स्वकष्टार्जित मालमत्तेचा काय करायचे, कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची हे सगळे अधिकार त्या स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकाला असते. अशा मालकाने एकाच वारसाला का दिली, बाकीच्यांना का नाही दिली असा आपण आरोप करणे आणि त्याच्यावर वाद करणे हे तितकसं योग्य होणार नाही. कारण त्या आरोपाला आणि त्या वादाला तितकसं यश येण्याची शक्यता ही फार कमी आहे.

थोडक्यात म्हणजे जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल आणि त्यात वारसांना डावलले असेल तर त्याला आव्हान देऊन यश येण्याची शक्यता हि बर्‍यापैकी असते. मात्र जर स्वकष्टार्जित मालमत्तेचा मृत्यूपत्र असेल आणि त्यात काही वारसांना डावलेले असेल तर अशा परिस्थितीत ज्या वारसांना डावलेले आहे त्यांनी त्या मृत्यूपत्राला आव्हान देऊन त्याला यश येण्याची शक्यता ही काहीशी कमी असते.

पुढचा प्रश्न म्हणजे स्वकष्टार्जित जमीन जर असेल तर ती आपल्या मुलांच्या नावी कशी करावी?: आता याला दोन – तीन पर्याय आहेत . ज्या व्यकतीची स्वकष्टाची जमीन आहे, ती जर त्याला आपल्या मुलाच्या नावावर करायची असेल तर त्यात मुख्यतः दोन प्रकार आहेत. एक म्हणजे आपल्या हयातीत करायची आहे का आणि दुसरा म्हणजे ती आपल्या निधनानंतर करायची आहे का.

पहिला जर विचार केला जर एखाद्या व्यक्तीला आपल्या हयातीतच करायची असेल तर त्याच्याकरीता नोंदणीकृत करार हा निश्चितपणे आवश्यक आहे. आता हा करार करताना जर विना मोबदला असेल तर त्याच्या करीता आपण बक्षीसपत्र करू शकतो. जर आपण मोबदला घेणार असाल तर त्याच्याकरता साठेकरार किंवा खरेदीखत करून देऊ शकतो.

आणि जर आपल्याला आपल्या निधनानंतर ती मालमत्ता मुलाला मिळावी असे जर वाटत असेल तर त्या करीता हयात असताना आपण त्या दृष्टीने एक मृत्यूपत्र तयार करून ठेऊ शकतो आणि त्या मृत्यूपत्रामध्ये ज्या मुलाच्या नावावरती जमीन करायची आहे, त्याचा नामउल्लेख करून ही जमीन ह्या मुलाला द्यावी

असा जर आपण सप्ष्ट उल्लेख केला तर त्या व्यक्तीच्या निधनानंतर ती जमीन त्या मृत्यूपत्रानुसार त्या मुलाला निश्चितपणे मिळेल. थोडक्यात काय तर एखाद्या व्यक्तीला आपल्या हयातीत आपली जमीन मुलाला द्यायची असेल तर त्यासाठी बक्षीसपत्र किंवा खरेदीखत आणि जर निधनानंतर द्याची असेल तर त्या अनुषंगाने तसे मृत्यूपत्र करून आपली मालमत्ता आपल्या मुलाच्या नावावर करता येऊ शकते.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

3 thoughts on “वर्ग २ जमिनीचे मृत्यूपत्र करता येते का?।। वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीसपत्र केलं असेल तर ते रद्द करता येते का?।। मृत्यूपत्रामध्ये एकाच वारसाला सगळी मालमत्ता दिली असेल तर बाकीच्यांना त्या विरोधात दाद मागता येते का?।। स्वकष्टार्जित जमीन असेल तर ती आपल्या मुलांच्या नावे कशी करावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

  1. वडीलोपार्जित जमीनीचे स्पेशल मुत्युपत्र रद्द हु शकत का कारण लाहान्या भावाने मोठ्या भाऊच हाक्कसोड केल आहे बळजबरीने नावपण कमी केल आहे

    1. वर्ग 2 जमिनीचे मृत्युपत्र करता येते का व यांचा शासन राज्य पत्र तयार आहे का

      1. वर्ग दोन च्या जमिनी चे मृत्युपत्र करता येते का व त्याचे राज्यपत्र आहे का

Comments are closed.