मित्रांनो महाराष्ट्रमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण पुणे जिल्हा प्रत्येक ऋतूमध्ये भेट घेण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते. खास करून पावसाळ्यात पुण्याला भेटण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो. कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून मनसोक्तपणे पावसात भिजण्याचा आनंद घेऊ शकतो.
पावसाळ्यात पुण्याजवळ आपण ट्रेकिंग करत करत खळखळणारे धबधबे पाहण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकतो. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की अनेक पर्यटकांची पुण्याकडे वाटचाल सुरू होते, अशातच आज आपण पावसात फिरण्यासाठी पुण्याजवळील पर्यटन स्थळे कोणती आहेत? माहिती करून घेणार आहोत..
◆ माळशेज घाट : पुणे शहराजवळ पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी माळशेज घाट हे ठिकाण अतिशय उत्तम समजले जाते. कारण पावसाळ्यात इथे आपल्याला आकाशाला भिडलेल्या उत्तुंग डोंगर कड्यांवरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, मुसळधार पाऊस, निसर्गाला लागलेली ढगांची गर्दी आणि त्यातून वळणे घेत मधेच येणारा बोगद्यातून रस्ता अनुभवायला मिळतो. माळशेज घाट हे ठिकाण कल्याण-नगर या महामार्गावर आहे. ज्याचा काही भाग पुणे जिल्ह्यात तर मुख्य ठाणे जिल्ह्यामध्ये येतो. जर का तुम्हाला माळशेजघाटाचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल, तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणाला एक वेळेस नक्की भेट द्या.
◆ महाबळेश्वर : महाबळेश्वर हे ठिकाण पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. हे एक आकर्षक हिल स्टेशन आहे. पुण्यापासून अंदाजे 120 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रातील कित्येक पर्यटक महाबळेश्वर येथील सुट्टी घालवण्यासाठी पसंती दर्शवितात. कारण हे ठिकाण त्याच्या सुंदर लेणीसाठी आणि थंडगार निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. नवविवाहित जोडप्यांसाठी एकांतात काही वेळ करण्याकरिता एक उत्तम ठिकाण आहे. शिवाय इथे अनेक साईड सिन करण्यासाठी ठिकाण आहेत. महाबळेश्वर येथे अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कित्येक पर्यटक आवर्जून या ठिकाणांना भेट देण्यासाठी येत असतात.
◆ पवना लेक : हे पुण्याजवळील एक सुंदर आणि आकर्षक पावसाळी पर्यटन स्थळ आहे. पवना नदीवर बांधलेल्या पवना धरणातून पवना तलाव तयार होतो. तो कॅम्पिंग, फिशिंग आणि वॉटर स्पोर्ट यासारखे साहसी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे आणि हा एक कृत्रिम तलाव आहे. जो खास करून पुणे आणि मुंबई या दोन शहरातील पर्यटकांना आकर्षित करत असतो. सुट्टीमध्ये फक्त पुणे आणि मुंबई शहरातील जवळपास 4000 लोक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात, असे एका सर्व्हेनुसार सांगण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासमवेत या ठिकाणी येऊन मनसोक्त आनंद घेऊ शकता. पुणे शहरापासून पवना लेक जलाशय हे ठिकाण सुमारे 55 किलोमीटर अंतरावर आहे.
◆ पुणे धबधबा : हा पुण्यातील सर्वात सुंदर धबधब्यापैकी एक आहे. जो महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना पावसाळ्यामध्ये आकर्षित करत असतो. या धबधब्याचे दर्शन इतके सुंदर आणि आकर्षक असते की, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला निसर्गाचा खरा अर्थ कळतो. पुणे धबधबा 1600 फूट उंचीचा असून याची विभागणी तीन टप्प्यांमध्ये होते. पावसाळ्यात हा धबधबा सर्वात प्रेक्षणीय असतो. तेव्हा या धबधब्याचे पाणी कठड्यावरून खाली उतरत असते तेव्हा त्या पाण्याच्या मोठा आवाज निर्माण होत असतो. पुणे धबधबा हा पुणे शहरापासून 70 किलोमीटर तर मुंबईपासून 80 किलोमीटर इतके अंतरावर आहे.
◆ लोणावळा : पावसाळ्यात पुण्याजवळ करण्यासाठी ठिकाणांपैकी एक म्हणून लोणावळाकडे पाहिले जाते. पुणे शहरापासून अंदाजे 65 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यामध्ये लोणावळामधील निसर्गरम्य दृश्य आणि निसर्ग पाहून मन प्रसन्न होऊन जाते. जर तुम्ही लोणावळ्याला भेट देणार असाल तर पुणे फॉल्स आणि भुशी डॅम यासारख्या दोन सुंदर धबधब्याला भेट द्यायला विसरू नका. पुण्याहून साधारणत 2 तासाच्या प्रवासानंतर लोणावळ्याला पोचता येते.
तर आज पण पावसाळ्यात करण्यासाठी पुण्याजवळील 5 पर्यटन स्थळे कोणती आहेत? याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला यापैकी किंवा याव्यतिरिक्त पुण्याजवळ कोणत्या पर्यटनस्थळाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला करून नक्की कळवा..