पूर्वी रीचार्जवर बक्कळ कॅशबॅक देणारे Paytm आता ग्राहकांकडून रीचार्जसाठी अतिरिक्त पैसे घेत आहे.

अर्थकारण लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आजच्या काळात 100 चा मोबाइल रीचार्ज करण्यासाठी एखाद्या दुकानदाराने अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास आपण सरळ-सरळ paytm उघडून रीचार्ज करतो. पण Paytm च अतिरिक्त पैसे घेत असल्यास काय करावे? तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे?

PayTm वरून प्रीपेड नंबर रिचार्ज करण्यासाठी आता अतिरिक्त पैशांची आकारणी होत आहे. तुम्हाला ही बातमी मिळाली असेल की पेटीएम वरुन रिचार्ज केल्यावर आता यूजर्सला 1 रुपये ते 6 रुपयांपर्यंत सेवा शुल्क भरावे लागेल. सेवा शुल्क म्हणून किती पैसे द्यावे लागतील हे रिचार्जच्या रकमेवर अवलंबून असेल. PhonePe गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून मोबाईल रिचार्जसाठी अधिकची रक्कम चार्ज करत आहे. 50 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज करण्यासाठी, वापरकर्त्यांना 1 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल, तर 100 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज करण्यासाठी, 2 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

आज घडीला, 2019 मधील पेटीएमचे एक ट्विट व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये कंपनीने म्हटले आहे की ती कोणत्याही ग्राहकाकडून कधीही कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. लोक हे ट्विट वेगाने शेअर करत आहेत. आता पेटीएमने आपल्या आश्वासनावर U turn घेतला आहे.

असो, Paytm, फोन पे, गुगल पे सारख्या लोकप्रिय कंपन्या आता रीचार्ज साठी अतिरिक्त 1 ते 6 रुपयांची मागणी करत असले तरी अनेक असे मार्ग आहेत ज्याद्वारे आपण कोणतीही अतिरिक्त रक्कम न देता रीचार्ज करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया ते पर्याय.

प्रत्येक सर्विस प्रोव्हायडरचे आपापले Apps : 

कुठेही दूर जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त आपल्या सिमकार्ड कंपनीचे अॅप डाउनलोड करावे लागेल. Google Play किंवा App Store वरून अॅप डाउनलोड करा. तुमच्या मोबाईल नंबरने लॉगिन करा आणि तुमचे टेन्शन संपले असे समजा. अॅपच्या होम पेजवर सर्व माहिती स्पष्ट दिसेल. जसे की किती डेटा शिल्लक आहे आणि तो किती काळ वैध आहे.

अॅपवर तुम्हाला रिचार्ज करण्याचे सर्व पर्याय दिसतील. नवीनतम प्लॅनपासून ते वैधता आणि नवीन ऑफरपर्यंत, तुम्हाला येथून सर्व माहिती मिळेल. डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट आणि UPI, म्हणजे रिचार्ज करण्याचे सर्व मार्ग Airtel, VI, Jio, BSNL या कंपन्यांच्या App वर उपलब्ध आहेत.आजकाल मिस्ड कॉल अलर्ट आणि कस्टमर केअरशी बोलण्याची सुविधाही अॅपवर उपलब्ध आहे.

विविध कंपन्यांचे रीचार्ज पोर्टल : 

तुम्हाला अॅपच्या फांद्यात पडायचे नसल्यास थेट कंपनीच्या वेबसाइटवरूनही रिचार्ज करू शकता. प्रक्रिया देखील अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त मोबाईल नंबर टाकावा लागेल. तुमच्या गरजेनुसार ऑफर तयार होतील. तुम्हाला दीर्घ वैधता किंवा डेटा पॅक ज्याची आवश्यकता आहे त्याची निवड करा आणि कोणतीही एक पेमेंट पद्धत (डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट आणि UPI) निवडून चिंतामुक्त व्हा.

बँकांचे App : 

बँक अॅप्स आता फक्त शिल्लक तपासण्यासाठी आणि पैसे हस्तांतरित करण्यासाठी नाहीत. या अॅप्समध्ये बरेच फीचर पॅक आहेत. तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक आहात त्या बँकेचे अॅप डाउनलोड करा. आपल्या पैकी बहुतांश लोक ते वापरत देखील असतील. फक्त त्या अॅपमध्ये डोकावून पहा. तुम्हाला मोबाईल रिचार्जचे सर्व पर्याय मिळतील. पुढील प्रक्रिया जवळजवळ आम्ही वर नमूद केल्याप्रमाणेच आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.