पोक्सो कायदा म्हणजे काय?

कायदा

आज आपण पोक्सो कायदा म्हणजे काय? पोक्सो कायद्यातील बालकाची व्याख्या तसेच पोक्सो कायदा का तयार करण्यात आला? पोक्सो कायद्यातील महत्वाच्या तरतूदी आणि पोक्सो कायद्यात शिक्षा काय आहे? या गोष्टी जाणून घेणार आहोत..
आपण अनेक वेळा पाहतो की, लहान मुला-मुलीवर लैंगिक अत्याचार केले जातात त्यांच्यावर अन्याय केला जातो.

या अन्याय अत्याचाराला प्रतिबंधित करण्यासाठी तसेच असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा होण्यासाठी 4 नोव्हेंबर 2012 रोजी पोक्सो को कायदा तयार करण्यात आला. हा कायदा लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ, आणि प्रोर्नोग्राफी सारख्या गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला..

पोक्सो कायदा म्हणजे बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम होय. तसेच कलम 2(ड) नुसार 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती म्हणून परिभाषित करते आणि 18 वर्षाखालील सर्व मुलांना कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण देते. परंतु काही वेळा जेव्हा मुलं सीमारेषेवरील असल्याचे दिसते, तेव्हा मुलांच्या वयाची मूल्यांकन करणे कठीण जाते.

तेव्हा वय निर्धारित करण्यासाठी कोणतीही त्रुटी न्यायासाठी हानिकारक असते. या प्रकारच्या गोंधळात न्यायालय बाल न्याय कायदा 2015 च्या कलम 94 मदत घेत असते. पोक्सो कायदा का तयार करण्यात आला?

1) मुलांवर होणारे लैंगिक हल्ले :-
समाजामध्ये काही माथेफिरु असे आहेत की, त्यांना कोणत्याही प्रकारचे भान नसते. संधी मिळताच असे माथेफिरु लहान मुली मुलांवर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात अशा गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला.

2) मुलांवर होणारा लैंगिक छळ :-
पोलीस स्टेशनमध्ये सर्वात जास्त लैंगिक छळाची गुन्हे नोंदवल्याची दिसते लैंगिक छळ अतिशय क्रूर स्वरुपाचे निर्देशनात येत आहे. म्हणून अशा नराधमाला कठोर शिक्षा देण्यासाठी पोक्सो कायदा तयार करण्यात आलेला आहे.

3) प्रोर्नोग्राफि :-
प्रोर्नोग्राफिसाठी लहान मुलांचा वापर केला जात होता. लहान मुलांचे कळत नकळत अश्लील व्हिडिओ काढले जात होते आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केली जात होती, अशा गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. तसेच प्रोर्नोग्राफिसाठी करताना जर एखादी व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी नसेल. परंतु ती गटात सामील असेल तर त्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो व त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते.

4) बालकांचा विनयभंग :
अनेकदा मुलगा असो व मुलगी त्यांच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात असेल किंवा वाईट नजरेने पाहिले जात असेल तर तो बालक संबंधित व्यक्तीच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करू शकतो.

पोक्सो कायद्यातील महत्त्वाच्या तरतूदी ;
पोक्सो कायद्यांतर्गत एखाद्या व्यक्तीने तक्रार दाखल केली असेल तर त्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. तसेच एखाद्या ठिकाणाहून तक्रार आली असेल तर एक महिला पोलीस अधिकारी किंवा पुरुष पोलीस अधिकारी साध्या कपड्यांमध्ये संबंधित व्यक्तीला भेट देतात.

पीडित व्यक्तीची खाजगी बाब इतरांना समजेल असा न्यूनगंड मनात बाळगू नये. आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार सहन करू नये, त्याला वाचा फोडली पाहिजे नाहीतर ती व्यक्ती सातत्याने तसाच अन्याय करण्याची शक्यता आहे. आरोपी आणि फिर्यादी हे समोरासमोर येऊ नये याची खबरदारी घेतली जाते. जो बालक किंवा बालीकेवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देणे हा कायद्याचा उद्देश आहे

पोक्सो कायद्यात शिक्षा काय सांगितले आहे?
पोक्सो कायद्यानुसार पीडीत व्यक्ती किंवा जिच्यावर अन्याय अत्याचार झाला आहे, अशी व्यक्ती जर बारा वर्षापेक्षा कमी वयाची असेल. तर आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल तसेच पीडित व्यक्तीचे वय 16 वर्ष असेल तर त्या आरोपीला 10 ते 20 वर्षापर्यंत करावासाची शिक्षा होऊ शकते.