स्पर्धा परीक्षा म्हटलं की MPSC आणि UPSC लगेच आपल्या डोक्यात येत. त्यातीलच MPSC परीक्षा देणारे तर बरेच जण आहेत. MPSC मध्ये असलेल्या PSI या जागेसाठी प्रयत्न करतात. यामध्ये जास्तीत जास्त ते लोक असतात ज्यांना वर्दी बद्दल आकर्षण असत आणि म्हणूनच ते 100 टक्के मेहनत करतात. आपण आज या PSI च्या पोस्ट बद्दल माहिती जाणून घेऊ, याची निवड, वेतन, काम, बदली, पदोन्नती या सगळ्या बद्दल माहिती घेऊ. हे पद राज्य सेवा आयोगातर्फे भरल्या जात, जे की दुय्यम सेवा गटामध्ये येत आणि राजपत्रित असतं.
PSI होण्यासाठी जी पात्रता लागते त्यात शारीरिक, शैक्षणिक आणि वयोमर्यादा या तीन गोष्टी येतात. कमीत कमी कोणत्याही विषयातील किंवा शाखेतील पदवीधर शिक्षण असलेले विद्यार्थी तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी या पदासाठी अर्ज करु शकतात. यासाठी कोणतीही गुणांची अट नाही. वयोमर्यादा ही OPEN साठी 19-31 वर्ष, मागासवर्गीय आणि अनाथांसाठी 34 वर्ष, SC/ST/खेळाडू आणि Ex serviceman साठी 36 वर्ष असे आहे. तर दिव्यांक व्यक्तींना यासाठी अर्ज करता येत नाही.
शारीरिक मध्ये पुरुषांसाठी कमीत कमी उंची 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी उंची कमीत कमी 157 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. पुरुषांसाठी इथे आणखी एक पात्रता लागते ती म्हणजे छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवून 84 सेंटीमीटर असायला पाहिजे. या परीक्षेचे चार टप्पे असतात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मैदानी चाचणी, आणि मुलाखत.
हे चारही टप्पे पार केलेल्या व्यक्तीस महाराष्ट्र पोलिस अकॅडमी नाशिक इथे ट्रेनिंग साठी पाठवलं जात. पूर्व परीक्षा ही सामान्य क्षमता चाचणी या विषयाची असते, ज्यात 100 गुण असतात, आणि 100 प्रश्न असतात व एक तासाचा वेळ असतो. ह्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. तसेच हा पेपर मराठी आणि इंग्रजी या दोन माध्यमातून होते. तसेच यालानळ प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 निगेटिव्ह गुण असतात. मुख्य परीकक्षेत दोन पेपर असतात, मराठी इंग्रजी आणि सामान्य क्षमता चाचणी आणि पदासाठी आवश्यक ज्ञान.
पहिला पेपर हा मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयाचा असतो या पेपरमध्ये प्रत्येकी 50, 30 आणि 20 प्रश्न असतात आणि प्रत्येकी 100, 60, 40 गुण असतात तर दुसरा पेपर हा सामन्य क्षमता चाचणी आणि पदासाठी आवश्यक ज्ञान याचा असतो ज्यात 100 प्रश्न आणि 200 गुण असतात. त्यानंतर शारीरिक चाचणी होते यामध्ये पुरुषांसाठी गोळाफेक, पूल अप्स, आणि धावणे आणि लांब उडी या चाचण्या असतात.
तर महिलांसाठी फक्त गोळाफेक, धावणे आणि चालणे ह्या चाचण्या असतात. शारीरिक चाचणी ही 100 मार्क ची असते ज्या पैकी पास होण्यासाठी फक्त 50 मार्क्स ची आवश्यकता असते. शारीरिक चाचणी उत्तीर्ण करणाऱ्याना मुलाखतीसाठी बोलावले जाते, ही मुलाखत 40 गुणांची असते. या सर्व परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले तर तुम्ही PSI बनू शकता. या व्यतिरिक्त आणखी दोन प्रकारे तुम्ही PSI बनू शकता. 1.जर तुम्ही पोलीस हवालदार असाल तर नोकरीच्या काही वर्षातच डिपार्टमेंटल PSI ची परीक्षा देऊन तुम्ही PSI बनू शकता.
2.जर तुम्ही ASI असाल तर बढती मिळाल्यावर PSI बनता येत. निवड झाल्यानंतर ट्रेनिंग साठी नाशिक ला पाठवलं जात, MPSC मधून निवड झालेल्या व्यक्तीची ट्रेनिंग 12 महिन्याचं असत तर डिपार्टमेंटल निवड झालेल्या व्यक्तीचं ट्रेनिंग 9 महिन्याचं असत. अर्थातच हे दोन्ही ट्रेनिंग खडतर असतात यामध्ये कायद्याचे ज्ञान तुम्हाला दिले जाते. अनेक प्रात्यक्षिक करून दाखवली जातात. हे सर्व झाल्यावर पदभार दिला जातो, पुरुषांसाठी गडचिरोली मध्ये काही काळ सेवा देणे बंधनकारक आहे.
PSI झाल्यावर जवळपास 55000 हजार च्या आसपास पगार मिळतो. दर तीन वर्षाने कार्यालय बदली आणि दर सहा वर्षांनी जिल्हा बदली होत असते. PSI च्या बढती मध्ये सर्व प्रथम API मग PI आणि शेवटी DySP पर्यंत बढती मिळते. PSI च्या कामकाज काय असत हे आता आपण पाहू :- 1.कायदा सुव्यवस्था 2.गुन्ह्याची चौकशी करणे 3.पुरावे गोळा करणे 4.गस्त घालणे 5.न्यायालयाशी पत्रव्यवहार करणे 6.वाहतुक नियंत्रण करणे 7.प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे.
8.वरिष्ठांनि दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे 9.PSI हे वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. 10.आणि VIP सुरक्षा पुरवणे आपल्या पैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की PSI होऊन काय मिळणार तर पहिली गोष्ट म्हणजे PSI होऊन तुम्ही लोकसेवा करू शकता थेट समाजापर्यंत पोहचू शकता, दुसरं म्हणजे सरकार तुम्हाला चांगलं वेतन देत, वर्दी तर असतेच त्यामुळे दरारा देखील असतो, आणि मान सम्मान देखील मिळतो. पण यामध्ये काही रिस्क देखील आहेत त्या अशा की.
1.प्रोफेशनल लाईफ आणि फॅमिली लाईफ सांभाळणे खूप अवघड होतं 2.तुम्ही जर इमानदार असाल तर त्याचा मोबदला म्हणजे तुमची बदली केली जाते. 3.ही अतिशय संवेदनशील पोस्ट आहे त्यामुळे नेहमी आव्हानासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. 4.जोखीम घेण्याची तयारी असवि लागते कारण या कामात जीवावर खेळावं लागते 5.आणि राजकीय दबाव सांभाळण्याची तयारी असावी लागते. ही तयारी असेल तर तुम्ही नक्की PSI होऊ शकता.