शेतमालाला दिली जाणारी किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणजे काय? हमीभाव कोण ठरवते? आणि हमीभाव कसा ठरवला जातो? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

अर्थकारण शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, शेतमालाला जी किमान आधारभूत किंमत दिली जाते त्याला हमीभाव असे म्हणतात. हा हमीभाव कसा ठरवला जातो? हमीभाव कोण ठरवते? आणि हमीभाव कसा ठरवला जातो? या साठी जे सूत्र आहे हे नेमके काय आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

हमीभाव म्हणजे काय?: MSP म्हणजेच minimum support price यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात आणि बोलीभाषेत हमीभाव म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हमीभाव ही एक प्रणाली आहे. त्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला एका ठराविक किंमतीत खरेदी करण्याची हमी देत असत,

गॅरंटी देत असतं या प्रणाली अंतर्गत सध्या ज्या शेतमालाची खरेदी सरकार करतो यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, शेंगदाणा, मुग, सोयाबीन आणि कापूस या पिकांचा यात समावेश आहे. तर या शेतमालाचा हमीभाव खरेदीचे दर सरकार जाहीर करतो आणि मग सरकारी खरेदी केंद्रांवर या शेतमालाची खरेदी केली जाते.

यामागचा उद्देश हा असतो की बाजारात जरी शेतमालाच्या किंमतीत घसरण झाली तर तेव्हाही केंद्रसरकार ठरवलेल्या हमी भावाने शेतकऱ्यांकडून शेतमालखरेदी केला जाईल आणि मग शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.

हमीभाव कोण ठरवतं?: कमिशन फोर अग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइजेस(CACP) च्या आकडेवारीवरुन भारत सरकारच्या कृषी मंत्रालय हमीभाव ठरवतं. एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव एकसमान असतो म्हणजे एक क्विंटल गहू महाराष्ट्रात ज्या दराने सरकार खरेदी करतो त्याच दरात पंजाबमधील खरेदी केला जातो.

हमी भाव कसा ठरवतात?: शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणारे की महत्त्वाची घोषणा 2018 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली. म्हणजे काय तर एकंदरीत उत्पादन खर्च अधिक त्या खर्चाच्या 50 टक्के नफा हेच हमीभाव सरकार देईल असं जाहीर करण्यात आलं

म्हणजे एक हजार रुपये उत्पादन खर्च येणार असेल तर दीड हजार रुपये हमीभाव सरकार देणार असा याचा अर्थ होतो. उत्पादन खर्च ठरवत असताना सरकारकडून वेगवेगळे घटक ग्राह्य धरले जातात आणि त्यानुसार उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकार आहे हे निश्चित करण्यात आलेले आहेत. उत्पादनखर्च ठरविण्यासाठी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने काही सूत्र निश्चित केली आहेत.

1)उत्पादन खर्च ठरविण्याचे ए-2 हे पहिले सूत्र आहे. ए-2 या सूत्रानुसार बियांणे, खत, रासायनिक औषध, मजूर सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च पकडला जातो. 2)उत्पादन खर्च ठरविण्यासाठी दुसरे सूत्र आहे ए-2+एफ एल( फॅमिली लेबर) या सूत्रात शेतकरी आणि त्यांच्या घरातील व्यक्तींच्या श्रमाचे मूल्यही मोजले जाते. म्हणजे घरातील व्यक्ती शेतात काम करत असतील तर त्यांचा समाजासाठी खर्च करताना विचार केला जातो.

3)हे तिसर सूत्र आहे सी-2. अर्थात comprehensive म्हणजेच व्यापक या सूत्रानुसार बियाणे,खते,रासायनिक औषध, मजूर, सिंचन, इंधन,कुटुंब याची यासोबतच गुंतवणुकीवरील व्याज आणि शेत जमिनीचे भाडं निश्चित करून त्याआधारे उत्पादनखर्च ठरविला जातो

आणि ठरवताना सी-2 चा आधार घेतला तर कृषी उत्पादनाला अधिक भाव मिळतो. मात्र मित्रांनो आपल्या देशामध्ये केंद्र सरकार आज घडीला जो हमीभाव जाहीर करत ते ए-2+एफ एल या सूत्रानुसार दिला जातो. तर अशाप्रकारे मित्रांनो हमीभाव ठरवला जातो.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा

व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.