स्वस्त मेडिक्लेम विरुद्ध महाग मेडिक्लेम प्लॅन ।। प्लॅन निवडताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

मेडिक्लेम प्लान हे स्वस्त असणे किंवा महाग असणे हे ठरत ते त्या कंपनीवर. त्या मेडिक्लेम प्लानच्या वैशिष्ट्यांवर. ज्या कंपनीचा मेडिक्लेम प्लान किंवा जो प्लान हा महाग असेल त्या मेडिक्लेम प्लानचा प्रीमियम महाग असेल. निश्चितच त्या प्लान मध्ये वैशिष्ट्ये देखील तितकीच जास्त असेल. या विरुद्ध ज्या प्लानचा प्रीमियम कमी आहे त्या प्लानची वैशिष्ट्ये नक्कीच कमी असतात.

तर तुम्ही एकदा मेडिक्लेम घेण्याआधी आपण जो मेडिक्लेम विकत घ्यायचा ठरवलेला आहे त्याच्या फक्त प्रीमियम कडे लक्ष न देता त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तो मेडिक्लेम प्लान आपल्याला काय काय सुविधा पुरवतो, हे देखील पाहणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर आज विकत घेतलेला प्लान जो आपल्याला स्वस्त पडला तो पुढे जावून महाग पडू शकतो. तर आपला आजचा विषय आहे स्वस्त मेडिक्लेम प्लान विरुद्ध महाग मेडिक्लेम प्लान.

याबाबत आपण एक उदाहरण पाहुयात. दोघे मित्र असतात रमेश आणि सुरेश. रमेश एक 5 लाख रुपये कव्हर असलेला मेडिक्लेम प्लान त्याच्या कुटुंबीयांसाठी विकत घेतो 7500 रुपयांमध्ये. आणि 5 लाख रुपये कव्हर असलेला प्लान सुरेश विकत घेतो 12800 रुपयेला. आता दोन्हीही मित्रांनी जो मेडिक्लेम प्लान विकत घेतलेला आहे, त्यांच्या मेडिक्लेम प्लान मध्ये ते स्वतः, त्यांची बायको, आणि त्यांची असणारी दोन मुले. अशी फॅमिली त्यात असते.

जेव्हा रमेशला कळते की आपण जो प्लान विकत घेतलेला आहे, जो फक्त 7500 रुपयेला मिळाला. तोच प्लान सुरेशला 12800 रुपयेला मिळाला. म्हणजेच सुरेश कुठेतरी फसलेला आहे किंवा सुरेशने मूर्खपणा केलेला आहे. त्याने खूप जास्त पैसे टाकून सेम कव्हर असलेला प्लान विकत घेतलेला आहे. तो सुरेशला बोलतो की तू प्लान घेण्याआधी मला बोला असतास तर स्वस्त प्लान मिळवून दिला असता. तू फुकट यामध्ये पैसे टाकलेस. पण सुरेशने ज्यावेळेस प्लान विकत घेतला तो विचारपूर्वक घेतला होता.

जेणेकरून भविष्यामध्ये जर क्लेम आला तर त्याला तो स्वस्त प्लान महागात पडू नये म्हणून. अनेकदा अस होत की आपण सुरुवातीला मेडिक्लेम प्लान घेताना 3 ते 4 हजार किंवा 5 हजार वाचवायचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळी ॲक्च्युअल क्लेम येतो त्यावेळी आपल्याला 70 ते 80 हजार किंवा लाख मध्ये रुपये जास्त गमवावे लागतात. किंवा आपल्याला ते बिल स्वतः च्या खिशातून भराव लागत.

मग अस होवू नये यासाठी मेडिक्लेम प्लान घेण्याआधी सुरेश प्रमाणे तो प्लान पूर्णपणे चेक करून घेणे अत्यंत गरज आहे. आपल्या उदाहरणातील रमेश आणि सुरेश पुढे एकदा त्यांचा अपघात होतो. दोघांनाही एकाच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले जाते. 10 दिवस ट्रीटमेंट चालते दोघांचं बिल जवळपास सेम येत म्हणजेच 325000 रुपये च्या दरम्यान येत. ज्यावेळी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेण्याची वेळ येते, त्यावेळी सुरेशला फक्त 5000 रुपये भरून डिस्चार्ज मिळतो कारण बाकी सर्व खर्च त्याच्या मेडिक्लेम प्लान मध्ये कव्हर झालेला असतो.

मात्र रमेशला त्याच ठिकाणी 95000 रुपये भरावे लागतात. यावेळी रमेशला कळते आपण सुरुवातीला प्रीमियम वाचविण्यासाठी स्वस्तातला मेडिक्लेम घेतला किंवा कमी प्रीमियमचा प्लान घेतला. मात्र आता ॲक्च्युअल क्लेम आला तेव्हा ते आपल्याला महागात गेलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला स्वस्त हे पुढे जावून महाग पडू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

मेडिक्लेम प्लान घेण्याआधी त्या प्लानचा पुरेपूर अभ्यास माहिती घेणं अत्यावश्यक आहे. त्या प्लान मध्ये काय आहे, कोणत्या गोष्टी हव्या आहेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला तो प्लान देत आहे, हे सर्व पाहूनच प्लान विकत घ्या. जेणेकरून तुम्हाला स्वस्त महाग पडणार नाही. काही असे मुद्दे कि जे तुम्हाला मेडिक्लेम प्लान विकत घेताना पडताळून पहायचे आहेत. की आपण घेतलेला प्लान तुम्हाला त्या गोष्टी पुरवतो आहे किंवा नाही. आणि किती प्रमाणात त्या सुविधा उपलब्ध आहे.

1.सर्वप्रथम पहायचं आहे की तुम्ही जो मेडिक्लेम प्लान घेण्याचा ठरवत आहात. त्या प्लान मध्ये तुम्हाला रूम रेंट कॅपींग तर नाहीना. रूम रेंट ॲक्च्युअल असणारा प्लानच तुम्हाला घ्यायचा आहे. ज्या मेडिक्लेम प्लान मध्ये रूम रेंट कॅपींग असते तो मेडिक्लेम प्लान स्वस्त मिळतो.

याउलट ज्या प्लान मध्ये रूम रेंट वर कोणतेही कॅपींग नसते, ॲक्च्युअल रूम रेंट तुम्हाला पे केला जातो तो मेडिक्लेम प्लान तुम्हाला महाग मिळेल. त्या मेडिक्लेम प्लानचा प्रीमियम महाग असेल. उदाहरण पहायचं झालं तर, A ह्या मेडिक्लेम प्लान मध्ये रूम रेंट वर कॅपींग आहे 0.5% ऑफ सम अशुअर. तर क्लेमचा सम अशुअर आहे 5 लाख रुपये. म्हणजे 2500 रुपये तुम्हाला रूम रेंट पर डे मिळेल.

एखाद्या व्यक्तीने अशी पॉलिसी घेलती आणि त्याला हॉस्पिटलाइज होण्याची वेळ आली. आणि त्या हॉस्पिटलच रूम पर डे रेंट आहे 6000 रुपये. पण त्याच्या पॉलिसी मध्ये 2500 रुपयेची कॅपींग असल्यामुळें त्याला वरचे 3500 रुपये पर डे स्वतः च्या खिशातून भरावे लागतात. त्यामुळे शक्यतो रूम रेंट वर कॅपींग असलेले पॉलिसी घेणे टाळा. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जास्त पेमेंट द्यावं लागलं तरी चालेल पण ॲक्च्युअल रूम रेंट तुम्हाला जी पॉलिसी देत आहे तीच पॉलिसी तुम्ही घ्या.

2.आयसीयू फीज, डॉक्टर फीज, आणि इतर मेडिकल टेस्ट, जी पॉलिसी तुम्हाला डॉक्टर फी, आयसीयू फी, आणि मेडिकल टेस्ट, या सर्वांचा खर्च ॲक्च्युअल रीएम्बर्स करते. ती पॉलिसी तुम्हाला काहीशी महाग मिळेल. पण ती पॉलिसी तुम्ही घेणं हे कधीही फायद्यात ठरेल. तुम्हाला सुरुवातीला प्रीमियम जास्त भरावा लागेल पण नंतर ॲक्च्युअल क्लेम येईल. त्यावेळी तुमचे खूप काही पैसे वाचतात. तर ज्या पॉलिसी मध्ये देखील गोष्टींवर कॅपिंग असेल ती पॉलिसी तुम्हाला स्वस्त मिळेल.

3.प्रि अँड पोस्ट हॉस्पिटलाइज एक्सपेंसेस, अनेक पॉलिसी मध्ये सध्या 90 दिवस प्रि आणि पोस्ट मध्ये 120 दिवस देखील कव्हर केले जातात. त्यामुळे प्रि आणि पोस्टचा कालावधी जितका जास्त असेल तितकाच तो आपल्याला फायदेशीर ठरतो. त्यामुळे पॉलिसी घेताना या गोष्टी देखील पडताळून पाहणे गरजेचे आहे.

पण आपल्याला दिसेल की ज्या पॉलिसी स्वस्त आहे त्या पॉलिसी मध्ये प्रि चा कालावधी हा 30 दिवस आणि पोस्टचा कालावधी हा 45 ते 60 दिवस असतो. या गोष्टीमुळे पॉलिसीचा प्रीमियम हा कमी असतो. त्यामुळे सुरुवातीला वाचवलेले पैसे प्रीमियम साठी पुढे जावून तुम्हाला महाग पडेल.

4.डे केअर प्रोसेस, तस पाहायला गेलं तर प्रत्येक पॉलिसी तुम्हाला ही सुविधा उपलब्ध ठेवते. पण तुम्ही जर नीट पहाल तर जी पॉलिसी स्वस्त आहे त्या पॉलिसी मध्ये डे केअर चे नंबर रेस्ट्रीक्टेड, नियमित असतात. म्हणजेच 200 ते 400 पर्यंत फक्त डे केअर ते पॉलिसी कव्हर करतात.

पण अशा देखील काही पॉलिसी आहे त्या पॉलिसी तुम्हाला ऑल डे केअर प्रोसेस समाविष्ट करतात. मग ज्या पॉलिसी मध्ये ऑल डे केअर प्रोसेस समाविष्ट आहे त्या पॉलिसीचा प्रीमियम तुम्हाला जास्तच आढळेल. पण ते नक्कीच आपल्या हिताचं आहे. पण ज्या पॉलिसी मध्ये डे केअर प्रोसेस वर रेस्ट्रिक्शन आहे त्याचा प्रीमियम तुम्हाला कमी दिसेल.

5.अँब्युलन्स, दोन प्रकारच्या अँब्युलन्स वर भर दिला जातो एकत्र रोड अँब्युलन्स नाहीतर एअर अँब्युलन्स. जी पॉलिसी तुम्हाला एअर अँब्युलन्स फॅसिलिटी प्रोवाईड करते आहे. जी तो खर्च कव्हर करते आहे. त्या पॉलिसीचा प्रीमियम तुम्हाला जास्त मिळेल. तर ज्या पॉलिसी मध्ये एअर अँब्युलन्स कव्हर नाही त्या पॉलिसीचा प्रीमियम तुम्हाला कमी मिळणार. रोड अँब्युलन्स वर देखील अनेक पॉलिसी मध्ये रिस्ट्रिक्शन असतात, कॅपींग असतात. काही पॉलिसी मध्ये तुम्हाला पर हॉस्पिटल एडमिशन 1 ते 3 हजार पर्यंत जास्तीत जास्त कव्हर दिल जातो. तर अशा पॉलिसीचा प्रीमियम हा थोडा कमी असतो.

6.एक्सीडेंटल बेनिफिट आणि पिटीडी(permanently total disability), अनेक कंपन्या एक्सीडेंटल आणि पिटीडी हा इनबिल्ट फिचर म्हणून ऑफर करतात. मग ज्या कंपन्यांच्या पॉलिसी मध्ये एक्सीडेंटल आणि पिटीडी हा इनबिल्ट फिचर आहे त्या पॉलिसीचा प्रीमियम तुम्हाला थोडा जास्त आढळेल.

आणि ज्या पॉलिसी मध्ये एक्सीडेंटल आणि पिटीडी बेनिफिट नसेल त्या पॉलिसीचा प्रीमियम तुम्हाला कमी मिळेल. सध्या अनेक कंपन्या एक्सीडेंटल बेनिफिट आणि पिटीडी हा ऑप्शनल ऍडॉब म्हणून देतात. त्यावेळी तुम्ही जर तो ऍडॉन घ्याल तर प्रीमियम थोडासा वाढेल.

7.आयुष ट्रीटमेंट, ज्या पॉलिसी मध्ये आयुष ट्रीटमेंट कव्हर असत त्या पॉलिसीचा प्रीमियम थोडा जास्त असेल. तर ज्यामध्ये तो कव्हर नाही त्या पॉलिसीचा प्रीमियम तुम्हाला कमी मिळेल.

8.हेल्थ चेकअप, अनेक कंपन्या तुम्हाला दरवर्षी हेल्थ चेकअप चे व्हाउचर देतात. तर काही कंपनी मध्ये तुम्हाला हेल्थ चेकअप चे व्हाउचर हे 3ते 4 वर्षानंतर दिले जाते, ह्या कंपनीचा प्रीमियम कमी असतो. तर जी कंपनी तुम्हाला दरवर्षी हेल्थ चेकअप चे व्हाउचर देत आहे त्या कंपनीच्या पॉलिसीचा प्रीमियम थोडासा जास्त असतो.

9.हॉस्पिटल कॅश बेनिफिट, अनेक कंपन्या तुम्हाला हॉस्पिटल कॅश बेनिफिट ऑफर करतात. म्हणजेच ज्यावेळी तुम्ही ऍडमिट होता किंवा तुमच्या घरातील व्यक्ती ऍडमिट होते तुम्हाला तिथे थांबावं लागत त्यामुळे तुमचा जॉब लॉस होतो. अशा वेळी तुम्ही हॉस्पिटल कॅश बेनिफिट हा पॉलिसी मधून क्लेम करू शकता. मग जी पॉलिसी तुम्हाला हॉस्पिटल कॅश बेनिफिट देते तिचा प्रीमियम तूम्हाला जस्त मिळेल.

10.ऑटोमॅटिक रेस्टोरेशन, अनेक पॉलिसी तुम्हाला 100% किंवा अनलिमिटेड तुम्हाला ऑटोमॅटिक रेस्टोरेशन देते. पण यामध्ये मुख्य मुद्दा आहे की तुम्हाला प्रत्येक कंपनी ऑटोमॅटिक रेस्टोरेशन देत आहे, पण तो ऑटोमॅटिक रेस्टोरेशन तुम्ही प्रत्येक क्लेम साठी वापरू शकतात का?

म्हणजेच एखाद्या वर्षा मध्ये एखादा आजार 2 वेळेस झाला तर दुसऱ्यांदा त्या आजारासाठी तो ऑटोमॅटिक रेस्टोरेशन वापरू शकतो का? अनेक कंपन्यांच्या पॉलिसी मध्ये तुम्हाला दिसेल की ऑटोमॅटिक रेस्टोरेशन ऑल क्लेम साठी दिले जाते. मग अशा पॉलिसीचा प्रीमियम तुम्हाला जास्त लागणार आहे. तर ज्या कंपन्या तुम्हाला रिपीटेड क्लेम अलाउड करत नाही त्या कंपनीचा प्रीमियम हा कमी असतो.

11.नो क्लमे बोनस(एनसीबी), ज्या पॉलिसीचा प्रीमियम कमी असेल आपण नीट पडताळून पहिलं तर ती कंपनी तुम्हाला एनसीबी हा तितक्या प्रमाणत देत नाही. म्हणजेच दरवर्षी तुम्हाला 10% एनसीबी दिला जाईल आणि तो जास्तीत जास्त 50% पर्यंत असेल. पण ज्या कंपन्यांचा प्रीमियम जास्त असतो त्या पॉलिसी मध्ये तुम्हाला एनसीबी देखील जास्त दिला जातो. तर एनसीबी दरवर्षी 50% ते जास्तीत जास्त 100% दिला जातो.

12.वेटींग पिरियड, वेटींग पिरियड 3 प्रकारचे असतात, इनिशीयल वेटींग पिरियड, जो प्रत्येक कंपन्यांचा पॉलिसी साठी सेम असतो. दुसरा आहे तो पीईडी म्हणजेच प्री एक्स्टिनिंग डिसीज वेटींग पिरियड. तिसरा येतो स्पेसिफिक डिसीज वेटींग पिरियड. ज्या कंपन्या तुम्हाला स्पेसिफिक डिसीज आणि पीईडी चा वेटींग पिरियड कमी देतात त्या कंपन्यांचा प्रीमियम थोडा जास्त आढळतो.

तर ज्या कंपन्या पीईडी आणि स्पेसिफिक डिसीज साठी जास्त वेटींग पिरियड देतात त्या कंपन्यांचा प्रीमियम तुम्हाला थोडा कमी आढळेल. पण याखेरीज अनेक असे काही फिचर आहेत जे तुम्हाला एडिशनल दिले जातात. आणि त्यामुळे त्या पॉलिसीचा प्रीमियम वाढतो. त्यामुळे तुम्ही बघा मेटर्निटी कव्हर ज्या पॉलिसी मधे मेटर्निटी कव्हर आहे त्या पॉलिसीचा प्रीमियम नेहमीच हाय असतो, त्या पॉलिसीपेक्षा ज्या तुम्हाला मेटर्निटी कव्हर देत नाही.

त्यानंतर काही पॉलिसी तुम्हाला ग्लोबल कव्हर प्रोवाईड करतात. काही पॉलिसी तुम्हाला सर्जरी कव्हर प्रोवाईड करतात. मग अशा पॉलिसीचा प्रीमियम हा जास्त असतो. तर काही कंपन्या अशा आहेत की ज्या तुम्हाला कन्सुमेबल बेनिफिट देखील प्रोवाईड करतात.

म्हणजे ॲक्च्युअल हॉस्पिटल वेळी जो काय कन्सुमेबल खर्च झाला असेल तो तुम्हाला रिंबस केला जातो. मग अशा पॉलिसी ज्या तुम्हाला कन्सुमेबल बेनिफिट देत आहेत त्या पॉलिसीचा प्रीमियम तुम्हाला जास्त मिळणार. आणि ज्या पॉलिसी कन्सुमेबल बेनिफिट देत नाही त्यांचा प्रीमियम तुम्हाला कमी मिळणार.

आता आपल्या लक्षात आले असेल की सम अश्युअर समान असताना देखील प्रीमियम मध्ये तफावत का आहे. तर मग ज्यावेळी तुम्ही मेडिक्लेम प्लान घेत असताल, किंवा तुमच्याकडे असणारा मेडिक्लेम प्लान तुम्ही रिन्यू करत आहात तर हे सगळे मुद्दे तपासून बघा. की तुमच्या पॉलिसीचा प्रीमियम कमी आहे का जास्त. आणि कोणकोणते बेनिफिट तुम्हाला मिळत आहे.

-रणजित पवार (विमा सल्लागार) ९०२९३००३७५

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.