जमिनीवर किंवा सातबारावर जर बहिणींची नाव लागले असतील तर ती कमी कशी करावी? ।। अज्ञान वारसांची वाटणी पत्रावर सही असेल तर ते वैध आहे का? ।। एखाद्या पॉवर ऑफ एटर्णीद्वारे एखाद्या मालमत्ते संदर्भात काही अधिकार असतील, त्या मालमत्ते संदर्भात ज्याच्याकडे पॉवर ऑफ एटर्णी आहे तो मृत्युपत्र करू शकतो का? ।। मृत व्यक्तीच्या नावाने ऍफेडेव्हिट करता येईल का? या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार, पहिला प्रश्न आहे, जमिनीवर किंवा सातबारावर जर बहिणींची नाव लागले असतील तर कमी करता येतात का आणि कमी कशी करावी? उत्तर: तर सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीची मालमत्ता असते आणि त्या व्यक्तीचा जेव्हा विल किंवा मृत्युपत्र वैगेरे काही नसताना निधन होतं, तेव्हा साहजिकपणे त्या व्यक्तीच्या सगळ्या वारसांचे नावे त्या जमिनीवर किंवा सातबारावर लागतात.

मध्यंतरी हिंदू वारसा कायदा मध्ये जी दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीनुसार, मुलांप्रमाणेच मुलींनासुद्धा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये समान वारसा हक्क आता मिळायला लागलेला आहे. सहाजिकच जेव्हा एखाद्या भोगवटदराच निधन होतो तेव्हा, त्याचे वारस म्हणून त्याच्या मुलांची आणि मुलींची नावे जमिनीवर किंवा सातबारा वर लावण्यात येतात. जेव्हा कोणत्याही व्यक्तीला वारसाहक्काने एखाद्या जमिनीमध्ये किंवा मालमत्ते मध्ये हक्क प्राप्त होतो तेव्हा,

त्याच्याकडून तो हक्क जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्या करता कायदेशीरदृष्ट्या वैध आणि नोंदणकृत करार करणे हे अत्यंत गरजेचे आहे. हे जे करार आहेत हे विनामोबदला सुद्धा असू शकतात, किंवा मोबदल्यासह सुद्धा असू शकतात. विशेषतः जर बहिणींचा हक्क किंवा हिस्सा आपल्याला घेऊन त्यांची नाव कमी करायचे असतील तर, त्याच्या करता हक्कसोडपत्र बक्षीस पत्र किंवा त्यांचा हक्क जर आपण विकत घेणार असू खरेदीखत यासारखे कोणतेही करार करता येऊ शकतात.

ह्यापैकी बक्षीसपत्र जे आहे ते शंभर टक्के विनामोबदला असू शकतो. हक्कसोडपत्र जे आहे ते विना मोबदला किंवा मोबदल्यात सह अशा दोन्ही प्रकारे असू शकतो, आणि खरेदी खत हे सुद्धा 100% वेळेला मोबदल्यात सह च असणे आवश्यक आहे. थोडक्यात काय जेव्हा कोणत्याही मालमत्तेमध्ये एकापेक्षा जास्त वारस किंवा सहहिस्सेदार असतात,

आणि त्याच्या पैकी काही लोकांची नावं आपल्याला कमी करायचे असतील तर निश्चितपणे त्यांचा हक्क, हिस्सा किंवा क्षेत्रफळ नोंदणीकृत कराराद्वारे आपल्याकडे घेणं हा एकमेव कायदेशीर आणि फुलप्रूफ उपाय आहे. हा उपाय सोडता तोंडी वर्दी, प्रतिज्ञापत्र. सत्य प्रतिज्ञापत्र, वर्दी नोटीस, नो ऑब्जेक्शन अशा कोणत्याही पळवाटा आपण वापरू नयेत.

कारण जर आपण रीतसर नोंदणीकृत करार न करता अशा काही पळवाटांचा वापर केला आणि भविष्यात जर त्याला आव्हान मिळालं तर आपल्याला किंवा आपण जे हक्क संपादित केलेले आहेत त्याला कायदेशीर कटकटीना समोर जावं लागण्याची दाट शक्यता आहे. हे टाळण्याकरता जे काही आपल्याला करायचं असेल ते कायद्याच्या चौकटीत आणि रीतसर पणे करावं जेणेकरून भविष्यात आपल्याला किंवा आपल्या वारसांना कोणताही त्रास होणार नाही.

पुढचा प्रश्न आहे, अज्ञान वारसांची वाटणी पत्रावर सही असेल तर ते वैध आहे का? उत्तर: आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की, कोणताही करार करण्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे करारात सामील व्यक्ती ही कायद्याने सज्ञान असणे. जी व्यक्ती कायद्याने अजून सज्ञान झालेले नाही, ती व्यक्ती स्वतःच्या सहिने कोणताही करार करू शकत नाही. कारण तसे अधिकार कायद्याने अज्ञान व्यक्तीला दिलेला नाही.

हे वाटणीपूर्त मर्यादित आहे अस नाही. वाटणीपत्र असेल, खरेदीपत्र असेल, बक्षिसपत्र असेल, हक्कसोड पत्र असेल. थोडक्यात काय कोणताही करार जर करायचा तर त्या करारात सामील व्यक्ती सद्यान असण हे कायद्याने बंधनकारक आहे. जर अज्ञान व्यक्तितर्फे आपल्याला करार करायचा असेल तर, त्या आज्ञान व्यक्तीची जमीन विकायची असेल किंवा त्याचा हक्क किंवा हिस्सा दुसऱ्याला सोडायचा असेल तर, असा करार किंवा वाटणीपत्र त्याच्या अज्ञान पालनकर्त्या द्वारे करता येऊ शकतो.

मात्र असा करार किंवा असा व्यवहार करण्याकरता सक्षम दिवाणी न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे. जो वर अज्ञान व्यक्तीच्या मालकीची किंवा हिस्स्याची जमीन विकायला सक्षम दिवाणी न्यायालय परवानगी देत नाही, तोवर कोणताही अज्ञान पालनकर्ता कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या जमिनी संदर्भात करार करून त्या जमिनीतले अज्ञान व्यक्तीचे हक्क नाहीसे करू शकत नाही.

म्हणूनच वाटणीपत्र किंवा इतर कोणतेही करार हे अज्ञान व्यक्ती स्वतः करू शकत नाही आणि अज्ञान व्यक्ती जर अज्ञान पालनकर्ता अर्थात गर्डियनद्वारे असे करार करू इच्छितो असेल तर त्याच्याकरिता कोर्टाची पूर्वपरवानगी ही बंधनकारक आहे.

पुढचा प्रश्न आहे, समजा एखाद्या पॉवर ऑफ एटर्णीद्वारे एखाद्या मालमत्ते संदर्भात काही अधिकार असतील, त्या मालमत्ते संदर्भात ज्याच्याकडे पॉवर ऑफ एटर्णी आहे तो मृत्युपत्र करू शकतो का? उत्तर: सगळ्यात पहिला एक लक्षात घेतलं पाहिजे की, मृत्युपत्र जर करायचा असेल तर ज्या मालमत्ते संदर्भात आपल्याला मृत्युपत्र करायचे आहे त्या मालमत्तांमध्ये आपल्याला काहीही हक्क किंवा अधिकार असणे हे अत्यंत आवश्यक आहे.

आणि पॉवर ऑफ अॅटरणे किंवा कुलमुखत्यार याद्वारे कोणत्याही मालमत्तेचे हक्क किंवा मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होत नाहीत. कुलमुखत्यार पत्र किंवा पॉवर ऑफ ऍटर्नी म्हणजे नक्की काय, एखाद्या व्यक्तीने त्या व्यक्ती तर्फे काही काम करायला दुसऱ्याला दिलेले अधिकार आणि त्या अधिकाराकरता जो दस्त किंवा करार करण्यात येतो ते म्हणजे कुलमुखत्यारपत्र किंवा पॉवर ऑफ ऍटर्नी.

आता पॉवर ऑफ ऍटर्नी ज्यांनी दिलेली आहे तो ती केव्हाही रद्द करू शकतो त्याचं बरोबर ज्यांनी पॉवर ऑफ ऍटर्नी दिलेली आहे त्या व्यक्तीच जर निधन झालं तर त्याच्या निधना सोबतच ती पॉवर ऑफ ऍटर्नी सुद्धा आपोआप रद्द ठरते. म्हणूनच पॉवर ऑफ ऍटर्नीच्या आधारे आपल्याकडे जे काही अधिकार आलेले आहेत

त्या संदर्भात आपल्याला मृत्यूपत्र करता येणं हे जवळपास अशक्य आहे. म्हणून जो वर आपल्याकडे काही ठोस अधिकार नाहीत तोवर मालमत्तेचे मृत्युपत्र करू नये. असे मृत्युपत्र जरी आपण केलं तरी त्या मालमत्तेमध्ये जर आपल्याला अधिकार नसतील तर, त्या मालमत्ताकरिता ते मृत्युपत्र अवैध ठरण्याची दाट शक्यता आहे.

पुढचा प्रश्न आहे, मृत व्यक्तीच्या नावाने सत्य प्रतिज्ञापत्र करता येईल का? उत्तर: जेव्हा कोणत्याही व्यक्तीचे निधन होते तेव्हा साहजिकच त्या व्यक्तीच्या नावाने सत्य प्रतिज्ञापत्र करणे हे जवळपास अशक्य आहे. सत्य प्रतिज्ञापत्र किंवा ऍफेडेव्हिट म्हणजे नक्की काय, तर जेव्हा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट खरी असण्याच किंवा एखादा कागदपत्र व त्यातील माहिती खरी असल्याचं शपतेवर लिहून देतो त्याला आपण ऍफेडेव्हिट किंवा सत्यप्रतिज्ञापत्र म्हणतो.

आणि हे सत्यप्रतिज्ञापत्र कोणताही व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती करीता लिहून घेऊ शकत नाही. म्हणजे ज्या व्यक्तीचं निधन झालं त्या व्यक्तीच्या संदर्भात ऍफेडेव्हिट किंवा कोणतेही करार व्यवहार इत्यादी काहीही करता येणार नाही. ज्या व्यक्तीचे निधन झालेला आहे त्या व्यक्तीच्या वारसांना मयत व्यक्तीच्या नावाने काही करायचा असेल तर त्यांना आधी वारसा हक्क नुसार आपल्या हक्क प्रस्थापित करायला लागतील.

गरज पडली तर हेअर्शिप किंवा सक्सेशन सर्टिफिकेट मिळवावं लागेल आणि हे एकदा त्यांच्या नावावर ती मालमत्ता झाली तर आणि तरच त्या वारसांना त्या मालमत्ते संदर्भात काहीतरी करता येईल. जोवर हे वर्तुळ आहे सर्कल पूर्ण होत नाही तोवर मृत व्यक्तीच्या नावाने ऍफेडेव्हिट किंवा इतर कोणत्याही गोष्टी दुसरी कोणतीही व्यक्ती करू शकत नाही.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.