भारतातील 140 कोटी जनतेपैकी 8 कोटीच्या आसपास फक्त टॅक्स भरणारे लोक आहेत. ही माहिती आहे 2019-20 ची संसदेमध्ये मांडली गेली होती. तसं पाहिलं तर टॅक्स सगळेजणच देत असतात. परंतु या ठिकाणी सांगितलेला आकडा इन्कम टॅक्सच्या संदर्भातला आहे. आता जर तुम्ही पगारदार असाल आणि जर तुम्ही पाच-पंधरा लाख रुपये प्रति वर्ष कमवत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला हे माहिती असणे गरजेच आहे की तुम्हाला नेमका किती टॅक्स द्यावा लागणार आहे.
यासोबतच टॅक्स कसा वाचवायचा आहे? हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. आपण माहिती घेणार आहोत की, तुम्ही कायदेशीर रित्या tax कसा वाचू शकता? याचे 10 मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. यासोबतच प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय?आता नवीन आर्थिक वर्षाच एक महिना संपलेला आहे आणि हा महिना संपता संपता मागच्या वेळेस सांगितलेल्या गोष्टी परत एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जन्माला आलेलो आहोत तर दोन गोष्टी या अटळ आहेत.
सर्व प्रथम म्हणजे काय जन्माला आलोय तर मृत्यू हा होणारच आहे आणि क्रमांक दोन तुम्हाला tax भरावा लागणार आहे. मग तो प्रत्यक्ष असू शकतो किंवा अप्रत्यक्ष असू शकतो. ऑप्शन नाही तुम्ही काहीही करा तुम्हाला tax भरावाच लागणार आहे.
आता प्रत्यक्ष कर म्हणजे काय? जो तुम्हाला स्वतः भरावा लागतो जो तुम्ही दुसऱ्या वरती ढकलू शकत नाही. अगदी तुमची कोणाबरोबर किती जवळकी जरी असली तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकत नाही.
यालाच कायदेशीर भाषेत इन्कम टॅक्स म्हणतात.मात्र, अप्रत्यक्ष कर म्हणजे जो tax तुम्ही दुसऱ्यावर ढकलू शकता.
सरकार कोणतेही असो ते सरकार सतत तुमची काळजी घेत असतं आणि ते त्याच्या प्रोविजनस करत असतं. ज्यामुळे तुमच्या हक्काचे पैसे जे आहेत ते tax मध्ये जाणार नाहीये. आता इनकम टॅक्स प्लेन काय आहे हे समजून घेऊया. शून्यापासून ते अडीच लाख रुपयांपर्यंत दर का तुमची कमाई असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही.
तसेच तुमची कमाई अडीच ते पाच लाखांच्या दरम्यान असेल तर तुम्हाला पाच टक्के द्यावा लागेल. तुमची कमाई साडेसात लाखांपासून दहा लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला 15 टक्के आता tax भरावा लागतो. आपल्यालाही tax रूपाने जाणारे पैसे द्यायचे जर का वाचवायचे असतील तर सर्वप्रथम काय तुम्हाला होम लोन मध्ये डिडक्शन घेता येतं. याठिकाणी जर का तुम्ही तुमचं डोकं लावून होम लोन घेतलं तर तुमचा tax चांगला वाचू शकतो आणि 80 C नुसार तुमच्या मुद्दलावर ते दीड लाखांपर्यंत सूट भेटू शकते आणि व्याजवरती सेक्शन 24 नुसार दोन लाखांचा कर बचत होऊ शकते.
तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपये वाचवू शकता. यासाठी EPF, PPF, ELSS, NSC मध्ये गुंतवणूक करावी लागेल. तसेच, तुम्ही दोन मुलांसाठी ट्यूशन फी म्हणून 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर आयकर सूट घेऊ शकता. आता तुम्ही 1.5 लाख रुपयांचे उत्पन्नही वजा करा. आता 8.5 लाख कराच्या कक्षेत येतात.तसेच तुम्ही सुकन्या समृद्धि अकाउंट. या सुद्धा तुम्ही दीड लाखापर्यंत वार्षिक गुंतवणूक करून आणि टॅक्समध्ये चांगलीच सेविंग करू शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य सुद्धा सुरक्षित करू शकता आणि समृद्ध सुद्धा करू शकता. याचबरोबर, लाइफ इन्शुरन्स पॉलिसी.
लाइफ इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला त्यावर टॅक्स द्यावा लागणार नाही. आयकर कलम 80D अंतर्गत मेडिकल पॉलिसी घेऊन तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. या आरोग्य विम्यात तुमची, तुमची पत्नी आणि मुलांची नावे असावीत. तुम्ही आरोग्य विम्याच्या प्रीमियमसाठी 25,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकता, ज्यामध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा तपासणीच्या खर्चाचा समावेश आहे.
एज्युकेशन साठी तुम्हाला जे काही स्कॉलरशिप मिळते याच्यावर ती देखील सेक्शन 10,16 नुसार तुम्हाला टॅक्समध्ये सूट भेटेल. तर काही स्कॉलरशिप गव्हर्मेंट किंवा कोणत्याही प्रायव्हेट कंपनीने दिलेली असेल तरी तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळणार आहे आणि याच्यामध्ये किती रक्कम तुम्हाला स्कॉलरशिपच्या रूपाने भेटावे याचं कोणतंही बंधन नाही.
पुढील पर्याय म्हणजे वेडिंग गिफ्ट होय. कारण हे खूप पॉप्युलर आपल्या इथे. त्याची वेडिंग गिफ्ट आहे हे नोन टॅक्साबल मानलं जातं. तसेच यामध्ये कॅश किंवा चेकसुद्धा गिफ्ट रूपाने त्याच्यामध्ये उपयोग करून घेता येऊ शकतो. तसेच पुढील पर्याय याशिवाय, जर तुमचे पालक ज्येष्ठ नागरिक असतील, तर तुम्ही त्यांच्या नावावर आरोग्य विमा खरेदी करून 50,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त वजावट मिळवू शकता.
तसेच तुम्ही संस्थांना देणगी देऊन किंवा देणगी देऊन 25,000 रुपयांपर्यंतचा कर लाभ घेऊ शकता. जेव्हा तुम्ही देणगी किंवा देणगीची मुद्रांकित पावती सबमिट कराल तेव्हाच हे वैध असेल. प्राप्तिकराच्या कलम 80G अंतर्गत, तुम्ही देणगी किंवा देणगी म्हणून दिलेल्या रकमेवर 25,000 रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकता.
तसेच आयकर नियम स्पष्टपणे सांगतात की 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावरील कर 12,500 रुपये आहे. या प्रकरणात, आयकर कलम 87A अंतर्गत 12500 रुपयांची सूट उपलब्ध आहे. म्हणजेच आता तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. 5 लाख स्लॅबवर शून्य कर भरावा लागेल