एखाद्या दिवाणी दाव्यात प्रतिवादीचा मृत्यू झाल्यास काय होते? तो दावा तिथेच संपतो का? जाणून घ्या सविस्तर माहिती.

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

कोणत्याही दाव्यात वादी आणि प्रतिवादी हे दोन पक्ष असतात. वादी हा दावा दाखल करणारा व्यक्ती असतो आणि प्रतिवादी म्हणजे ज्याच्या विरूद्ध हा दावा दाखल केला आहे तो व्यक्ती असतो. कधी कधी असे घडते की ज्याच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे तो मरण पावतो. म्हणजेच दाव्यातील प्रतिवादीचा मृत्यू होतो. तर अश्या प्रकरणांमध्ये पुढे काय होते? दावा तिथेच संपतो का? पुढे दावा सिद्ध न करता आपण दाव्यात केलेली मागणी मान्य होते का? अश्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.

सर्वच प्रकरणांमध्ये कारवाईचे कारण कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूने संपते असे नाही. उदाहरणार्थ, जर पती-पत्नीमध्ये घटस्फोट खटला चालू असेल आणि प्रतिवादी मरण पावला, तर कारवाईचे कारण संपुष्टात येते. त्यामुळे हा खटला इथेच संपुष्टात येतो. परंतु अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे प्रतिवादीच्या मृत्यूनंतरही वादाचे कारण संपुष्टात येत नाही. मग अश्या प्रकरणांमध्ये पुढे नक्की काय करावे लागेल?

समजा वादीने प्रतिवादीकडून एखाद्या मालमत्तेच्या खरेदी संदर्भात एखादा करार केला होता आणि त्यावर वाद आहे, प्रतिवादीच्या मृत्यूनंतरही वादाचे हे कारण संपत नाही. कारण प्रतिवादीच्या मृत्यूनंतरही वादीचे नुकसान भरून निघतेच असे नाही. म्हणजेच प्रतिवादीच्या मृत्यूनंतरही वादीला त्याचे येणे असलेले पैसे किंवा जमीन मिळालेली नाही.

या संदर्भात, सिव्हिल प्रोसीजर कोड, 1908 च्या आदेश 22 मध्ये तपशीलवार तरतुदी देण्यात आल्या आहेत. प्रतिवादीचा मृत्यू झाल्यास प्रथम कोणत्याही परिस्थितीत वादाचे कारण पाहिले जाते. कारण मृत्यूनंतरही वाद कायम राहिल्यास, न्यायालय प्रतिवादीच्या वारसांना प्रकरणाचा पक्षकार बनवते. कोणतीही मालमत्ता घ्यायची असेल किंवा पैसे वसूल करायचे असतील तर अशी वसुली प्रतिवादीच्या मालमत्तेचा लिलाव करून करता येते. प्रतिवादीच्या वारसांना मृत प्रतिवादीच्या वतीने खटल्यात हजर राहणे बंधनकारक आहे.

अश्या प्रकारे प्रतिवादीचे वारस रेकॉर्डवर घेतात : 

कोणत्याही परिस्थितीत, प्रतिवादीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसांना पक्षकार केले जाते. प्रतिवादीचा मृत्यू झाल्यास वारसांना पक्षकार बनविण्याची प्रक्रिया ऑर्डर 22 मध्ये दिली आहे. येथे असे स्पष्टपणे नमूद केले आहे की वादीला प्रतिवादीचे वारस रेकॉर्डवर घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागेल. त्या अर्जात प्रतिवादी मरण पावला आहे आणि प्रतिवादीच्या वारसांना दाव्यात पक्षकार बनवण्यात यावे, असे नमूद करावे लागेल. असा अर्ज सादर करण्याची कालमर्यादा विहित करण्यात आली आहे. असा अर्ज ९० दिवसांच्या आत सादर करावा लागेल. असा अर्ज ९० दिवसांत सादर न केल्यास, त्या मृत प्रतिवादीच्या विरूद्धचा दावा संपुष्टात येतो.

जर वादीला प्रतिवादीच्या मृत्यूची माहिती मिळाली नसेल, तर त्याला लिमिटेशन अॅक्टच्या कलम 5 अन्वये सूट मिळू शकते. पुढे वादीला या कलमाच्या आधारे विलंब माफीचा अर्ज देखील सोबत जोडणे बंधनकारक असते. या अर्जामध्ये वारस रेकॉर्डवर घेण्यास झालेल्या विलंबास सविस्तर आणि योग्य कारण द्यावे लागते.

त्यामुळे प्रतिवादीच्या मृत्यूची माहिती वादीला मिळताच, त्याच प्रकारे त्याच्या वारसांची माहिती काढून त्यांना खटल्यांमध्ये पक्षकार बनवण्यासाठी वादीने कोर्टापुढे अर्ज करणे जरूरी आहे. जर वादीला प्रतिवादीच्या वारसांबद्दल स्पष्टपणे माहिती नसेल, तर त्याने न्यायालयात फक्त एक उत्तराधिकारी नमूद करावा. नंतर त्या उत्तराधिकारीची जबाबदारी आहे की न्यायालयाला प्रतिवादीच्या इतर वारसाबाबत देखील कळवावे . प्रतिवादीच्या सर्व कायदेशीर वारसांना दाव्यात पक्षकार बनवले जाऊ शकते किंवा सर्वांच्या वतीने कोणा एकाही व्यक्तिला पक्षकार बनवले जाऊ शकते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.