तुम्ही कधी विचार केला आहे का बहुतेकवेळा भाडेकरार हा 11 महिन्यांचा का केला जातो? चला टीआर मग जाणून घेऊया.

कायदा

तुम्ही भाड्याने मालमत्ता घेतली असेल किंवा तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर तुम्ही घरमालकाशी भाडे करार केला असेल. या दरम्यान तुमच्या लक्षात आले असेल की बहुतेक भाडे करार केवळ 11 महिन्यांच्या कालावधीसाठी असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भाडे करार 12 महिन्यांऐवजी 11 महिन्यांसाठी का असतात? चला तर आजच्या या लेखाद्वारे जाणून घेऊया ही रंजक माहिती. माहिती आवडल्यास आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

भाडेकरार म्हणजे काय? : सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की भाडेकरार म्हणजे काय? तो केंव्हा केला जातो? तर, भाडेकरार म्हणजेच रेंट अग्रिमेंट हा मालमत्तेचा मालक (घरमालक) आणि भाडेकरू यांच्यातील लेखी करार आहे. करारामध्ये काही अटी आणि शर्तींचा समावेश असतो ज्याच्या आधारावर घरमालक भाडेकरूला जागा सोडण्यासाठी सांगू शकतो.

उदाहरणार्थ, मालमत्तेचे तपशील (पत्ता, प्रकार आणि आकार), मासिक भाडे, सुरक्षा ठेव, ज्या उद्देशासाठी मालमत्ता वापरली जाऊ शकते (निवासी किंवा व्यावसायिक) आणि कराराची मुदत. एकदा करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, हा करार घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही बंधनकारक असतो. तसेच, या भाडेकरारामध्ये त्या अटींचाही समावेश असतो ज्याअंतर्गत घरमालक भाडेकरूला जागा सोडण्यासाठी सांगू शकतो.

भाडेकरार बहुतेक वेळा 11 महिन्यांचा का असतो? : बहुतेक भाडे करार हे 11 महिन्यांसाठी केलेले असतात. मुद्रांक शुल्क आणि इतर शुल्क हे त्यामागचे कारण आहे. वास्तविक, नोंदणी कायदा, 1908 नुसार, भाडेपट्टीचा कालावधी 12 महीने किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, भाडेपट्टी कराराची नोंदणी करणे अनिवार्य आहे. जर कराराची नोंदणी करवायची असेल तर त्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागेल.

उदाहरणार्थ, तुम्ही मुंबईमध्ये एक फ्लॅट ५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतल्यास, तुम्हाला वर्षभराच्या भाड्याच्या सरासरी २% मुद्रांक शुल्क भरावे लागेल. जर सिक्युरिटी डिपॉझिट देखील करारामध्ये समाविष्ट असेल, तर 100 रुपये फ्लॅट फी देखील जोडली जाईल.  5 वर्षांपेक्षा जास्त परंतु 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या भाडेकरारासाठी 3% मुद्रांक शुल्क असेल. आणि जर भाडेकरार हा 10 वर्षांपेक्षा जास्त परंतु 20 वर्षांपेक्षा कमी असेल, तर 6%  मुद्रांक शुल्क भरावे लागतील.

फक्त ही सर्व फी भरणे टाळण्यासाठी, अनेक घरमालक आणि भाडेकरू परस्पर संमतीने करारनामा नोंदवत नाहीत. तुम्हाला भाडेपट्टा करार करायचा असल्यास, भाडेकरू आणि घरमालक खर्च सामायिक करण्यास सहमती देऊ शकतात.

भाडे करार करताना घरमालकाने घ्यावयाची काळजी : घरमालकाने भाडेकरूची निवास त्याची पार्श्वभूमी तो भाडे देण्यास सक्षम आहे का हे तपासले पाहिजे. जर २-३ महिन्यानंतर भाडेकरूने भाडे थकवले तर, घरमालकास घर रिकामे करून घेण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागू शकतो.

घरमालकाला भाडेकरूची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे आवश्यक आहे. भाडे करार करताना भाडेकरूने घ्यावयाची काळजी : भाडेकरूने भाड्याने घेत असलेल्या घराचा काही वाद आहे का किंवा त्यावर न्यायालयाने स्टे आणला आहे का हे तपासले पाहिजे अन्यथा फसवणूक होऊ शकते.

भाडेकरूने हेही तपासले पाहिजे की ज्या व्यक्तीकडून घर भाड्याने घेत आहे, तोच खरा घराचा मालक आहे का? नसेल तर त्याला त्या जगेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मुखत्यार पत्राद्वारे (पॉवर ऑफ अटॉर्णे) त्या व्यक्तीला दिला असावा. जर हे तपासले नाही तर घराचा मूळ मालक विना नोटीस घर सोडण्यास भाग पाडू शकतो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.