उद्योगव्यवसाय म्हटला की त्याला तीन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. 1) पैशांचे भांडवल 2) वेळेचे भांडवल (3) मनुष्यबळाचे भांडवल. अनेक जणांकडे पैशांचे भांडवल उपलब्ध नसते. पण त्यामुळे काळजी करू नये कारण वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. पण त्याची जाणीव अनेकजणांना नसते. हे भांडवल किती प्रमाणात उपलब्ध असते ते बघुया.
प्रत्येक माणूस दिवसा कमीत कमी आठ तास तरी काम करू शकतो. माणूस साधारणपणे महिन्यात 25 दिवस काम करतो. म्हणजे तो एका महिन्यात सर्वसाधारणपणे 200 तास काम करतो. रविवार, इतर सुट्या व रजांचा विचार केला तर एक माणूस एका वर्षात साधारणपणे 10 मिहिने किंवा 2000 तास काम करतो.
तासाला कमीत कमी 10 रुपये या दराने त्याचे मुल्य काढायचे ठरवले तर, प्रत्येक माणसास दिवसासाठी 80 रुपये, महिन्यासाठी 20000 रुपये व एक वर्षासाठी 2 लाख रुपये किमतीचा वेळ उपलब्ध असतो. मनुष्यबळाचा विचार केला तर पूर्ण वेळ माणुस नोकरीवर ठेवायचा झाला, तर त्याला कमीत कमी महिना 5000 रुपये पगार द्यावा लागतो.
म्हणजे वर्षाला कमीत कमी 60000 रुपये पगार द्यावा लागतो. वेळच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाचा एकत्रित विचार केला तर प्रत्येक माणसाकडे कमीत कमी 2 लाख 60 हजार रुपये भांडवल आपोआप उपलब्ध हे असतेच अर्थात या भांडवलाचा उपयोग कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
मित्रांनो अनेक वेळा तरुण मंडळी विचारतात की सर आम्हाला धंदा करायचा आहे पण भांडवल नाहीये. तर आपण आज चर्चा करणार आहोत शून्य भांडवलातील धंदे. जगामध्ये असे अनेक धंदे आहेत की ज्याला भांडवल लागत नाही शून्य भांडवलातून उद्योग असा उभा राहतो. त्यातले अनेक व्यवसाय मी तुम्हाला सांगणार आहोत.
पहिला उद्योग आहे पुस्तक लेखन किंवा लेखन प्रक्रिया: मग याच्या मध्ये तुम्ही काय करू शकता? तुम्हाला लिखाणाची आवड आहे लिहिण्याची तुम्हाला कला जाणताना मग तुम्ही एखाद्या वृत्तपत्रासाठी लिहू शकता, एखाद्या मासिकासाठी लिहू शकता, किंवा तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट साठी लिहू शकता.
ब्लॉग लिहिण्यासाठी पैसे मिळतात तुम्ही ऑनलाइन लिहू शकता किंवा इकडे लिहू शकता आणि जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की तुम्ही तुमचं खूपच चांगलं लिखाण आहे तुम्ही स्वतःचं पुस्तक काढू शकता मग हे तुम्ही पुस्तक काढलं तर तेसुद्धा कसा छापायचं कसं विकायचं ही पण तुम्हाला प्रक्रिया माहिती मिळेल.
जर तुम्हाला ऑनलाईन इ-बुक काढायचा असेल किंवा तुम्हाला फेसबुक साठी लिहायचा असेल किंवा ऑनलाइन वरती काही लिखाण काम करायचं असेल तर या संदर्भातसगळी प्रक्रिया माहिती तुम्हाला मिळेल आणि म्हणून पहिला उद्योग जो आम्ही तुम्हाला सांगतोय तो हा आहे की तुम्ही लिखाणामध्ये अग्रेसर होऊ शकता लिखाण करण्यासाठी तुम्हाला एक पेन आणि कागद एवढच लागेल बाकी भांडवल तुमच्या डोक्यात आहे
आणि बरोबर तुम्ही विषय निवडा आणि योग्य माध्यमातून योग्य लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही मालामाल होण्याचे जास्त चान्सेस आहेत. करोडो रुपये लोक केवळ लिखाण करून कमावतात. तुम्ही सुद्धा करू शकता इथे फक्त तुमची क्रिएटिविटी तुमची गुणवत्ता तुमचे भांडवल आणि कल्पकता हेच तुमचं भांडवल आहे तुम्ही त्यातून चांगले पैसेकमवू शकता.
तर मित्रांनो शून्य भांडवलामध्ये सुरू करता येणारा दुसरा उद्योग मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि तो उद्योग आहे कन्सल्टन्सी किंवा ब्रोक्रेज: आपल्याला लक्षात असेल की ज्यावेळी धीरूभाई अंबानी एडनबर्ग मधून परत आले त्यावेळी धंदा सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून धीरूभाई अंबानी ने पहिला उद्योग सुरू केला तो म्हणजे कापडाचं ब्रॉक्रेजे करणं किंवा कापडाची कन्सल्टन्सी.
म्हणजे कोणाला कापड पाहिजे, कुठे मिळते याचा ताळमेळ आपला याच्यातून धीरूभाईंना पैसे मिळायला लागले आणि मग पुढचा प्रवास तुम्हाला माहिती आहे धीरूभाई अंबानी कुठे गेले. तसं आज कम्प्युटर वरती, इंटरनेट वरती, रियल इस्टेट ची माहिती देणाऱ्या अनेक वेबसाईट आहेत कोणाला काय पाहिजे याची माहिती तुम्ही घ्या. ज्याला जे पाहिजे ते मिळवून देण्यासाठी तुम्ही मदत करा सहाय्यक म्हणून काम करा कन्सल्टंट व्हा त्याच्यात तुम्हाला चांगला पैसा मिळतो.
अगदी एखादा पेशंट तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेऊन भरती केला हॉस्पिटल सुद्धा तुम्हाला काही फुल न फुलाची पाकळी देत असतो. प्रत्येक व्यवहारामध्ये तुम्हाला केवळ ओळख नावाचं भांडवल वापरून तो धंदा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही मदत केली तर तिथून तुम्हाला चांगला पैसा मिळत असतो आणि म्हणून या ब्रोक्रेज मध्ये किंवा कन्सल्टन्सी मध्ये तुम्हाला स्वतःचा रुपया लावायची गरज नाही.
फक्त स्वतःचं डोकं लावायचे आहे आणि कुठे मिळतं कोणाला पाहिजे काय पाहिजे कसं पाहिजे याचा जर तुम्हाला अभ्यास असेल तर तुम्ही नक्की यातून चांगले पैसे कमवू शकता. रियल इस्टेटच आहे, फ्लॅट विक्रीच आहे, गाड्या भाड्याने देणे आहे, सायकली भाड्याने देणे आहे असे भाड्याने देणे घेणे या अनेक अशा वस्तू बाजारात आहेत की ज्याची लोकांना गरज आहे. अगदी क्विकर सारखी वेबसाईट किंवा नाईंटी नाईन एकर सारखी वेबसाईट अशा अनेक वेबसाईट्स आहेत
की ज्यांनी तुमच्यासाठी घरी बसून एक रुपया न गुंतवता लाखो रुपये कमावण्याचे रस्ते ओपन केलेले आहेत फक्त बसा इंटरनेट वरती नवीन नवीन कल्पना काय आहेत त्याचा शोध घ्या त्याच्यामध्ये उडी घ्या आणि छान पैकी चांगले पैसे कमवा. तुम्हाला भांडवल लावायची गरज नाही तुम्ही फक्त इंटरनेट आणि तुमची कल्पनाशक्ती हे दोन्ही सोबत ठेवा जगातली हजारो धंदे तुमच्यासमोर दरवाजे उघडून उभे आहेत. तुम्ही त्यातून चांगले पैसे कमवू शकतात.
तर मित्रांनो 0 भांडवलामध्ये उभे राहणारे उद्योग आपण सांगत होतो तुम्हाला तर त्यातला तिसरा उद्योग जो तुम्हाला सांगतोये तो अत्यंत म्हणजे ज्याच शिक्षण नाहीये अशिक्षित माणूस आहे आणि काम करण्याची अजिबात त्याला लाज वाटण्याची गरज नाही असा एक स्टार्टिंग चा प्रयोग म्हणून त्या तरुण पोरांनी कार वॉशिंग गाड्या धुन्याचा उद्योग: ते सुरु करू शकतात. अगदी तुम्ही बघा मुंबई-पुण्यामध्ये मोठमोठ्या सिटी मध्ये हा सगळा उद्योग युपी बिहार चे लोक आणि नेपाळचा लोकांच्या ताब्यामध्ये आहे.
फक्त दोन ते तीन तास सकाळी सकाळी काम करतात आणि हजारो रुपये हे लोक घेऊन जातात. तर आपल्याला फक्त एकच काम करायचे कोणत्या कोणत्या सोसायटीमध्ये अशा गाड्या धुण्याची आवश्यकता आहे ते शोधा आणि कोण कोण माणसं हे गाड्या धुवू शकतात ही माणसं शोधा, जर पर्याय नसेलच कोण माणूस मिळालाच नाही तर स्टार्टिंग म्हणून सुरुवातीचा प्रयोग म्हणून फक्त काही दिवस तुम्ही त्या गाड्या धूवा, कॉन्ट्रॅक्ट घ्या, त्या गाड्या लोकांच्या धुवायचे कॉन्ट्रॅक्ट घ्या
आणि त्या चांगला माणसांकडून धूऊन घ्या. अगदी तुम्हाला सांगतो गाड्या तर सगळेच लोक धूऊ शकतात पण जर तुम्ही एक एअर प्रेशर ची मशीन तुम्ही सोबत घेतली 1 सात हजार रुपयेला युरेका फोर्ब्स ची मशीन मिळते. पोर्टेबल मशीन मिळते, ती जर तुम्ही घेतली तर गाडी जशी बाहेरून धुतली जाते तशी आठवड्यातून एकदा तुम्ही आतून पण क्लीन करून दिली तर सहज तुम्हाला दीडशे-दोनशे रुपये एका क्लीनिंगचे मिळतात
आणि असे जर तुम्ही महिन्याला तीनशे-चारशे गाड्या जर क्लीन करून दिल्या तर नक्की तुमचा व्यवसाय हा लाखो रुपयांमध्ये जातो, जाऊ शकतो. फक्त गरज आहे तुम्ही तशा सोसायटी शोधायचा तुमची विशेषता पाहिजे तिथे एक्सेस मिळवा ते कॉन्ट्रॅक्ट त्या लोकांना द्या आणि त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या. जसे सिक्युरिटी एजन्सी चा धंदा असतो तसे जे एजन्सी म्हणजे सिक्युरिटी पुरवतात त्यालाच पूरक असा हा उद्योग आहे.
जिथे तुमच्या मित्रांच्या स्कीम असतील जिथे तुमचे मित्र वॉचमन म्हणून काम करतील अशा सगळ्या सोसायटी तुम्ही तुमच्या आपत्या खाली घ्या तुमच्या कंट्रोलमध्ये घ्या तिथे हा तुम्ही उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. आता तुम्ही असे म्हणतात की सर असा हा खालच्या दर्जाचा उद्योग तुम्ही आम्हाला सांगताय? अरे मित्रांनो तुमच्याकडे भांडवल नाहीये म्हणून तर तुम्हाला उद्योग सांगतोय.
पहिले तुम्ही भांडवल उभ करायच आहे आणि ते भांडवल उभ करत असताना मिळेल तो धंदा, पडेल ते काम, पडेल ते कष्ट आणि मिळेल ते दाम हे आपण घेतला पाहिजे आणि असं शून्यातून मग रुपया रुपया जमा करत मग स्वतः पहिले गाडी धुवायची, मग गाडी धुवायला मुले ठेवायची,
मग मशिनरी लावायचा आणि लक्षात ठेवा हे करता करता एक दिवस असा येईल की तुम्ही ज्या गाड्या धुतल्या तुम्ही ज्या गाड्या पुसल्या त्याच गाड्या विकत घेता.लोकसुद्धा पाहतील आणि म्हणून सुरुवातीला लाज बाळगू नका तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर लोक तुमचं कौतुक करणार आहे फक्त सुरुवातीला तुम्ही लाजू नका.
विमा प्रतिनिधी: भारतात वेगाने वाढणाऱ्या वव्यवसायांमध्ये विमा व्यवसाय येतो. आरोग्य विमा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनला आहे. तुम्ही आपल्या शेजारील लोकांना विमा घेण्यासाठी सल्लागार म्हणून मदत करू शकता. LIC सारख्या कंपनी तुम्हाला प्रत्येक विमा चे कमिशन देते त्याद्वारे देखील तुम्ही आपले उत्पन्न वाढवू शकता.
ट्रेनर: आजकाल जसे आपण बघतो मुलांच्या शिक्षणापासून सर्व प्रकारचे क्लासेस हे ऑनलाईन घेतले जातात आणि हे अत्यंत आवश्यक बनले आहे कि जितक्या प्रमाणात शिकण्यासाठी लोक उपलब्ध आहेत तितक्या प्रमाणात ट्रेनर्स उपलब्ध असणे. तुम्ही जर कुठल्या विषयात उत्कृष्ट असाल तर तुम्ही देखील त्या विषयानुरूप ट्रेंनिंग देऊ शकता.
यासाठी कुठलेही भांडवल लागणार नाही. गरज पडल्यास १ महिना फ्री शिकवा तुमच्या स्किल्स मुले लोक आपोआप तुमच्याकडे वळले जातात. मित्रांनो तुम्हाला देखील असे उद्योग माहित असतील जे शून्य भांडवलात करता येऊ शकतात तर ते कमेंट मध्ये नक्की टाका !
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.