अभ्यासात मन लागत नसेल तर नक्कीच वाचा ।। अभ्यास करू वाटत नसेल तर काय करावे जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

अभ्यास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कित्येकदा हे समजत नाही की अभ्यास कसा करावा. की त्यामुळे आपल्याला लक्षात राहील, आपले कॉन्संट्रेशन वाढेल. अभ्यास कोणत्याही विषयाचा करायचा असो पहिल्यांदा विषय तुम्हाला आवडतो की नाही हे लक्षात आले पाहिजे.

अभ्यासात मन का लागत नाही? आणि त्यामागे काय कारण आहे जे जर आपल्या लक्षात आले तर आपण नक्कीच आपले कॉन्संट्रेशन वाढवू शकतो. ती कारणे कोणकोणती आहे हे आपण पाहुयात. 1. जो अभ्यास मी करतोय तो मला आवडत नाही.
2. करत असलेल्या अभ्यासाचं महत्त्व माझ्या लक्षात येत नाही.

3. हा अभ्यास पूर्ण झाला, अर्धवट राहिला, त्यात चुका झाल्या तर त्याचे काय परिणाम होतील हे मला समजत नाही. 4. मला हा अभ्यास चांगल्या रीतीने करायचा आहे, पण तो नेमका कसा करावा याचं मार्गदर्शन करणार सोबत कोणी नाही. काही वेळा मुल अभ्यास करण्यासाठी टाळाटाळ करतात. आणि त्यांची कारणे पुढील प्रमाणे. आणि त्यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आत्मविश्वास कमी असणे.

आणि नको त्या गोष्टींची डोक्यात होणारी गर्दी अथवा गोंधळ हा अभ्यासात अडथळा निर्माण करतो. बऱ्याच वेळा घरी मित्र-मैत्रिणी बरोबर झालेली वादावादी, भांडण, समज गैरसमज, मान अपमान यासर्व गोष्टी वर्गात शिक्षक, प्राध्यापक शिकवत असताना किंवा अभ्यासाला बसल्यावर आठवू लागतात.

ते टाळण्याकरीता अशा नकारात्मक गोष्टींचा वेळेत निचरा व्हायला हवा. या गोष्टी तुमच्या डोक्यात यायलाच नको. त्यानंतर जेव्हा केव्हा अशा घटना घडल्यानंतर तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगा, त्याने तुमचं मन हलकं होईल. म्हणजे तुमच्या डोक्यात सारखे तेच तेच विचार येणार नाहीत. मन लागण्यासाठी सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे एकाग्रता (concentration) आणि सवयी म्हणजे प्रॅक्टिस.

यासाठी रोज न चुकता एकाग्रतेचा अभ्यास करा. जास्त काही नाही फक्त रोज 10 मिनिटे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. दिवसातून 15 ते 20 मिनिटे प्राणायाम करा. यामुळे श्वासावर नियंत्रित येईल, मन शांत व्हायला मदत होईल. अध्यात्म हा आपला सबाव आहे त्यामुळे या सबी आपल्याला अभ्यासाचं नाही तर रोजच्या जीवनात ही अतिशय फायदेशीर ठरतात. अभ्यास करण्यापूर्वी तुमच्या अभ्यासाचे नियोजन करा.

म्हणजे तुम्हाला किती वेळ अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाचा, कोणत्या मुद्द्यावर अभ्यास करायचा आहे हे निश्चित ठरवून घ्या, लिहून घ्या. पण नियोजन करताना त्यात अडकून नका राहू. लक्षात ठेवा की तुम्हाला हे करायचं आहे आणि तुम्ही ते करणारच आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही अभ्यास करताय याचे उत्तर असूद्या.

आणि जेव्हा तुम्हाला स्वतः ला वाटेल की मी अभ्यास करतोय त्यावेळी आपले ध्येय आठवा. तुमचे उद्याचे भविष्य हे तुम्ही आज करत असलेला अभ्यास बदलणार आहे हे कधीच विसरू नका. आपण पाहुयात की एकाग्रता (concentration) आपल्या अभ्यासात कसे वाढवायचे. अभ्यासाला बसण्यासाठी सकाळची वेळ उत्तम मानली जाते. आपल्या दिवसभरातील कुठल्या वेळी तुम्हाला अभ्यास करणे उत्तम ठरत म्हणजेच प्राईम टाईम हे लक्षात घेवून अभ्यास करावा.

मात्र हे लक्षात घ्या की तुमची इच्छा शक्ती असली तर भर गर्दीच्या, गोंधळाच्या ठिकाणी देखील आपल्याला मन एकाग्र करता येत. ते कस हे आपण पाहुयात,  1. अभ्यास सुरू करण्याआधी थोडावेळ शांत बसा, जो अभ्यास करायचा आहे त्यासंबंधी विचार करा, खोलवर श्वास घ्या.

2. ज्या गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या आहेत, त्या अपेक्षित गोष्टी बाबत मनाला सूचना करा. त्या सूचना स्वतः ला समजेल अशा सकारात्मक असल्या पाहिजे. उदरणार्थ् मी जो अभ्यास करतोय तो मला नक्कीच नीट समजतोय. आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न मी मनापासून करतोय असा सकारात्मक विचार आपल्या मनात आला पाहिजे.

3. जे लिहितोय, वाचतोय त्याची मनात उजळणी करा. हाती घेतलेला अभ्यास कशा प्रकारे पूर्ण करता येईल, किंवा पूर्ण करणार आहोत हे लक्षात ठेवा. किंवा त्याचा आराखडा बनवा. की आज मला हे करायचं आहे, आज मला एवढं वाचायचं आहे. 4. इतका वेळ मी अभ्यासासाठी दिलेला आहे. हे मनाशी निश्चित करा. म्हणजे मला एक तास अभ्यास करायचा आहे आणि मी तो नक्कीच पूर्ण करणार.

5. अभ्यासाला बसताना आपल्याला ज्याच्या सारखं व्ह्यायाच म्हणजेच एखाद्या आदर्श व्यक्तीला पाहिलं ना किं, मला यासारखं काहीतरी करून दाखवायचं आहे. त्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवा. त्यामुळे नक्कीच तुम्ही लाईफ मध्ये सक्सेसफुल होणार. अभ्यासाचा आनंद घ्या, मनातून अभ्यास करा, स्वखुशीने अभ्यास करा, नावीन्याने अभ्यास करा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बहाणे देणे बंद करा. कारण आजचा अभ्यास तुमचं उद्याच भविष्य निर्माण करणार आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.