असे काही कायदे, जे आपल्या रोजच्या जीवनात महत्त्वाचे ठरतात ।। कदाचित तुम्हाला माहित देखील नसेल कि तुम्ही कायदा मोडत आहात ।। जाणून घ्या प्रत्येकासाठीची महत्वाची माहिती !

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

कायदा पाळण्याच्या बाबतीत भारतीयांचा लौकिक तितकासा चांगला नाही, असं खेदाने म्हणावसं वाटतं. सिग्नल तोडून पळणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, अशा एक ना अनेक बेकायदेशीर गोष्टी बऱ्याच जणांच्या हातून कळत किंवा नकळत घडत असतात.

पण जर तुम्हांला वाटत असेल की तुम्ही कायद्याचे पालन करणारे नागरिक आहात, तर पुन्हां एकदां विचार करा. कारण अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही करत असण्याची शक्यता आहे, ज्या बेकायदेशीर आहेत आणि त्याबद्दल तुम्हांला शिक्षा देखील होऊ शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी बेकायदेशीर आहेत, हेच बऱ्याच जणांना माहित नसतं.

आतां पाहूया असे काही कायदे, जे आपल्या रोजच्या जीवनात महत्त्वाचे ठरतात.

आपत्कालीन साखळी ओढून ट्रेन थांबविताय? 

सर्व भारतीय रेल्वे डब्यांमध्ये आपत्कालीन ब्रेक किंवा साखळी असते जी ट्रेन थांबविण्यासाठी ओढता येते. फार पूर्वी काही जणांनी ती ओढूनही पाहिली असणार.‌ पण वैध कारणाशिवाय ती खेचली, तर केवळ दंडचं नव्हे, तर रेल्वे कायद्यांतर्गत तुम्हांला एक वर्षापर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. हल्ली अशा साखळीकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाही हे जरी खरं असलं, तरी तिचा गैरवापर मात्र कायद्याने गुन्हा आहे.

राष्ट्रध्वजाचा अयोग्य वापर म्हणजे तुरुंगाची हवा

ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेत युनियन जॅक किंवा राष्ट्रीय झेंडा असलेले कपडे परिधान करणे हा गुन्हा नाही, पण भारतात मात्र नक्कीच आहे. वर्ष २००२ मध्ये भारतात ध्वज विषयक कायदा अस्तित्वात आला, त्यामुळे ध्वज सद्रुश रंग रचनेचे कपडे ध्वज संहितेचे उल्लंघन करतात, परिणामी तीन वर्षे तुरुंगवास होऊ शकतो. शिवाय राष्ट्रभावनेचा अपमान केल्यामुळे लोकक्षोभाला तोंड द्यावे लागेल ते वेगळेच!

समाजातील विशिष्ट लोकांसाठी अपमानास्पद संज्ञा

अलिकडच्या वर्षांत भारत जातिवाद आणि प्रादेशिक अस्मितांमधील भेदभाव या सामाजिक दुष्प्रवृत्तींशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक अपमानास्पद शब्दांचा वापर – जसे की ईशान्य भारतातील एखाद्याला ‘चिंकी’ म्हणणे बेकायदेशीर आहे, आणि त्याला मोठा दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे. तेव्हां आतां यापुढे उंची कमी असलेल्या माणसाला (तो तुमचा मित्र असला तरी) काय रे बुटक्या, अशी हाक गंमतीत देखील मारु नका. न जाणो, त्यासाठी सुद्धां शिक्षा होऊ शकते!

अयशस्वी आत्महत्या

प्रत्यक्ष आत्महत्येची कृती भारतात बेकायदेशीर नसली, तरी आत्महत्येचा प्रयत्न करणे आणि अयशस्वी होणे, म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९ अंतर्गत एक वर्षापर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेस सामोरे जाणे! मानसिक आरोग्य विधेयक २०१३ अनुसार हा कायदा रद्द झाला असला, आणि आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला मानसिक आजार आहे असे गृहीत धरलं जाणार असलं, तरीही तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे सिद्ध झाल्यास तुम्हांला तुरुंगात जावे लागू शकते.

पैसे सापडले आहेत? तक्रार दाखल करा

भारतीय खजिना कायद्यानुसार, जर एखाद्याला जमिनीखाली लपलेली रु. १० पेक्षा जास्त किंमतीची कोणतीही गोष्ट आढळली, तर त्याची तक्रार करणे आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती तक्रार करण्यास अयशस्वी ठरली, तर तो/ती शिक्षेस पात्र आहे. या कायद्याला व्यावसायिक खजिना शोधणार्‍यांचा तीव्र विरोध आहे कारण खजिना शोधणार्‍यांना जे काही सापडेल, त्याचा मालकी हक्क सरकारच्या स्वाधीन आहे असे कायदा सांगतो.

सार्वजनिक स्नेहाचे प्रदर्शन करताना जरा जपून

हे अविश्वसनीय वाटेल, पण सार्वजनिक स्नेहाचे प्रदर्शन तुम्हांला भारतात तीन महिन्यांपर्यंत तुरुंगात टाकू शकते! अर्थात कलम २९४ अन्वये हे जरी बेकायदेशीर असलं, तरी त्याचा लोकांना त्रास झाला, आणि त्यांनी तक्रार केली तरच. आणि हाच कायदा सार्वजनिक ठिकाणी ‘अश्लील गाणी’ गाणाऱ्यालाही कायद्याने गुन्हेगार ठरवतो! त्यामुळे, भारतात सार्वजनिक ठिकाणी ‘आयटम साॅंग’ गाणं म्हणजे शिक्षेला आमंत्रण. अर्थात जाहीर कार्यक्रमांना ह्यातून सूट मिळत असावी.

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान

तुम्ही गोव्याला गेला असाल, तर तुम्ही बिअरचा ग्लास हातात घेऊन समुद्रकिनाऱ्यावर बसण्याची कल्पना केली असेल. परंतु अलीकडील लॉकडाउनमुळे असे करणे आतां महागात पडू शकते. अलिकडच्या काही महिन्यांत, समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करणाऱ्या काही पर्यटकांना आणि स्थानिकांना पोलिसांनी अटक केली आहे आणि आता पर्यटक व्यापार कायद्यांतर्गत याला दोषी ठरवायचे की नाही यावर राज्यात वाद सुरू आहे. त्या वादात आपण सापडण्यापेक्षा समुद्रावर फक्त फिरलेलं बरं.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान

तुम्ही धूम्रपान करत असल्यास सार्वजनिक ठिकाणी तसं करण्याआधी दोनदा विचार करणे शहाणपणाचे ठरेल, कारण भारतात ते बेकायदेशीर आहे. सार्वजनिक ठिकाणी, जसं कार्यालये, बस स्टॉप, रेल्वे स्थानके, रुग्णालये, चित्रपटगृहे, सभागृहे इत्यादी कोणत्याही संमेलनाच्या ठिकाणी त्याला परवानगी नाही. कायदा मोडल्यास रु.२०० दंडाची शिक्षा होते. केरळ सारख्या राज्यात तर तुम्हांला सार्वजनिक उपद्रव कायद्यांतर्गत कोठडीत पाठवले जाऊ शकते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.