वाटणीतील जमिनीचा सातबारा फक्त भावाच्याच नावावर असेल तर काय होईल? ।। खरेदीखतापेक्षा जास्त जमीन आपल्या ताब्यात असेल तर संपूर्ण क्षेत्राकरता आपल्याला मालकी मिळेल का?।। सातबारा वर हिस्से झाले, पण प्रत्यक्ष जमिनीवर जर हिस्से झाले नसतील, तर खरेदीखत करता येईल का?।। एखाद्या जमिनीवर जर बारा वर्ष कब्जा असेल तर त्याची मालकी आपल्याला मिळते का?।। जमिनीचा काही भाग विकला असेल आणि सातबारा फेरफार करताना मात्र संपूर्ण क्षेत्र किंवा संपूर्ण सातबाराचा जर फेरफार नोंद झाली तर काय करावं? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

पहिला प्रश्न आहे वाटणीतील जमिनीचा सातबारा समजा भावाच्याच नावावर असेल तर काय होईल? उत्तर: सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की वाटणीपत्र जर नोंदणीकृत असेल. तर असं होता कामा नये. आणि समजा नोंदणीकृत वाटप पत्रानंतर सुद्धा असाच झाला असेल. तर त्या करता आपल्याला महसूल दफ्तर या मध्ये दुरुस्ती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

पण समजा आपली वाटणी नुसती तोंडी झालेली असेल. आणि ती जमीन किंवा त्या जमिनीचा सातबारा जर भावाच्या नावावर असेल. तर तो आपल्याला परत मिळवण्याकरिता सक्षम न्यायालयामध्ये दावा दाखल करणे गरजेचे पडेल. नुसता भाऊ नाही समजा त्या भावाचं निधन झाले तर त्याच्या नंतर त्याचे वारस त्या सातबारा वरती येतील.

म्हणजे थोडक्यात काय जर आपल्या कडे वाटणी पत्राचा कोणताही कागदोपत्री पुरावा, करार किंवा दस्तावेज नसेल. आणि सातबारावर इतर व्यक्तींची नावे आलेली आहेत. ती काढून आपल्याला आपलं नाव लावून घ्यायचं असेल. तर आपल्याला त्या करता न्यायालयीन कारवाई करण्याला काहीही पर्याय नाही.

हे असं सर्वसाधारणतः तोंडी वाटपाच्या संदर्भात होतं. म्हणजे तोंडी वाटप या मध्ये ज्याप्रमाणे ठरतं. त्याप्रमाणे सातबारा होता असं नाही. किंवा काही सातबारा व्हायचे राहून जातात. जर असं झालं असेल. तर त्याचा भविष्यात आपल्याला त्रास व्हायची निश्चितपणे शक्यता आहे. म्हणून शक्यतोवर वाटप करताना ते लेखी आणि नोंदणीकृत करावं. जर आपलं वाटप तोंडी करणार असाल. तर त्या तोंडी किंवा अ नोंदणीकृत वाटपा नुसार सर्व महसूल अभिलेखा मध्ये आवश्यक ते बदल त्वरित करून घ्यावं. जेणेकरून भविष्यात आपल्याला त्रास होणार नाही.

पुढचा प्रश्न असा, समजा खरेदीखतापेक्षा जास्त जमीन आपल्या ताब्यात असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम १५५ नुसार दुरुस्ती करून, संपूर्ण क्षेत्राकरता आपलं नाव लागेल का? उत्तर: किंवा संपूर्ण क्षेत्रा करता आपल्याला मालकी मिळेल का? आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे, की असं जेव्हा होतं. म्हणजे आपण खरेदीखत करुन जेव्हा एखादी जमीन घेतो. आणि त्या जमीनीचं खरेदीखत यातलं क्षेत्रफळ. आणि प्रत्यक्षातला क्षेत्रफळ यामध्ये तफावत असते.

तेव्हा खरेदी खत या मधल्या अटी आणि शर्ती नुसार ते वाढीव क्षेत्रफळ आपल्याला मिळेल किंवा नाही. आणि मिळणार असेल तर मोफत मिळणार आहे का त्याची आपल्याला किंमत द्यावी लागेल. यावर ते सगळे अवलंबून असतं. तर आता हे जे वाढीव क्षेत्रफळ आहे. जे आपल्या ताब्यात आहे.

एक लक्षात घेतलं पाहिजे की, ताबा, मालकी आणि महसुली अभिलेख या तिन्ही गोष्टी पूर्णतः भिन्न आहेत. एखादी जमीन किंवा एखादं क्षेत्र आपल्या ताब्यात आहे. म्हणजे त्यावर आपली मालकी असेलच असेही नाही. सहाजिकच एखाद्या महसूल दप्तरात आपलं नाव आहे. म्हणजे ती जमीन आपल्या मालकीची आहे असं सुद्धा सिद्ध होऊ शकत नाही. थोडक्यात काय तर जेव्हा खरेदी पेक्षा जास्त क्षेत्रावर आपलं नाव असतं.

किंवा खरेदी पेक्षा जास्त क्षेत्रावर आपला ताबा असतो. आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्याची जर मालकी हवी असेल. तर त्याच्या करता कोणता ना कोणता टायटल डॉक्युमेंट असणे हे अत्यंत आवश्यक आहे. मग ते खरेदी खत असेल किंवा मुळ खरेदी खतातच अट आणि शर्त असेल. ज्‍या योगे आपल्याला वाढीव क्षेत्र ताब्यात ठेवायची परवानगी किंवा अधिकार मिळालेले असतील. असं जर काही असेल. तर त्या वाढीव क्षेत्राची मालकी आपल्याला मिळू शकेल.

पण असं कुठेच काही लिहिलं नसेल. खरेदी खत यामध्ये अशी कोणतीही तरतूद नसेल. तर त्या वाढीव क्षेत्राची जरी ते आपल्या ताब्यात असलं. तरी सुद्धा त्याची मालकी आपल्याला मिळणं हे काहीसं कठीण आहे. त्या संदर्भात समजा मुळ जमीन मालकांनी किंवा भोगवटदाराने जर वाद निर्माण केला. तर त्याची मालकी आपल्याला मिळेलच असं नाही. असा वाद जर निर्माण झाला. तर अंतीमतः प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार त्या वादाचा निकाल लागेल.

पण सर्वसाधारणपणे एक लक्षात ठेवलं पाहिजे की जोवर आपण अधिकृत रित्या, कायदेशीर रित्या एखादी जागा किंवा एखादं क्षेत्र खरेदी करत नाही. तोवर केवळ आपल्या ताब्यात ते क्षेत्र आहे. म्हणून त्याची मालकी आपल्याला मिळत नाही. त्याच्या करता स्वतंत्र टायटल डॉक्युमेंट असणे अत्यंत गरजेचं असतं.

पुढचा प्रश्न आहे, सातबारा वर हिस्से झाले, पण प्रत्यक्ष जमिनीवर जर हिस्से झाले नसतील, तर खरेदीखत करता येईल का? उत्तर: आता इथे परत तोच प्रश्न येतो. की महसुली अभिलेख झाले आहे. पण पोझिशन किंवा ताबा या संदर्भात वाद उद्भवू शकतो. आता जेव्हा एखाद्या जमिनीचा सातबारा स्वतंत्र असतो. आणि त्या सातबारा च्या अनुषंगाने किंवा सातबारा वरील क्षेत्राच्या अनुषंगाने खरेदीखत करण्यात येत.

तेव्हा त्या क्षेत्राची किंवा सातबारा ची मालकी हस्तांतरित होते. मात्र जर त्याच्या तांब्याच्या अनुषंगाने वाद उद्भवले. किंवा त्याच्या चतुर्सिमा च्या अनुषंगाने वार उद्भवले. तर मात्र त्यांच्या निराकारनाकरता आपल्याला सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये जाण्यावाचून काहीही पर्याय उरणार नाही. म्हणून हे असे प्रकार टाळण्याकरता, जेव्हा आपण स्वतंत्र करतो. आपापले हिस्से स्वतंत्र करतो किंवा वाटप करतो.

तेव्हा सातबारा महसुली अभिलेख त्याचबरोबर प्रत्यक्ष हिस्से सुद्धा वेगळे करून घेणं, आपल्या आणि आपण ज्याला कुणाला जमीन विकणार असून त्यांच्या फायद्याचा ठरतो. सातबारा वेगळे, त्यानुसार जमिनीचा तुकडा वेगळा आणि त्याचा ताबा स्वतंत्र असं जर असेल तर त्याच्या खरेदी-विक्रीच्या अनुषंगाने वाद उद्भवण्याची शक्यता ही कमी होते. जे आपल्या आणि आपल्या खरेदीदाराच्या भविष्यातील फायद्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतं.

पुढचा प्रश्न आहे, एखाद्या जमिनीवर जर बारा वर्ष कब्जा असेल. तर त्याची मालकी आपल्याला मिळते का? उत्तर: बारा वर्षे जमिनीवर कब्जा असेल, तर त्याची ऍडव्हान्स पझेशन किंवा प्रतिकृत ताबा या तत्वानुसार मालकी आपोआप मिळते. असा एक खूप मोठा गैरसमज आपल्याकडे प्रचलित आहे. याचं कारण असं की ऍडवर्स पझेशन किंवा प्रतिकूल ताबा, या तत्वातील सगळ्या घटकांची जोवर आपण पूर्तता करत नाही. तोवर आपल्याला ती मालकी मिळू शकत नाही.

आता ऍडव्हान्स पझेशन किंवा प्रतिकूल ताबा हा एक मोठा स्वतंत्र विषय आहे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे ती नुसता ताबा आहे म्हणून आपल्याला मालकी मिळेलच असे नाही. ऍडव्हान्स पोझिशन म्हणजे प्रतिकुल ताब्याच्या सगळ्या अटी पूर्ण करणारा असेल. तरच आपल्याला त्याची मालकी मिळू शकेल. अन्यथा अशी मालकी केवळ ताबा आहे, या कारणाने मिळणार नाही.

पुढचा प्रश्न आहे, समजा आपण जमिनीचा काही भाग विकला असेल आणि सातबारा फेरफार करताना मात्र संपूर्ण क्षेत्र किंवा संपूर्ण सातबाराचा जर फेरफार नोंद झाली तर काय करावं? उत्तर: आता काय होतं ज्या प्रमाणे खरेदी खत होतं, त्याप्रमाणे महसूल अभिलेखा मध्ये बदल होणे हे आवश्यक असते. पण काही वेळा नजर चुकीने किंवा इतर दोषाने त्यामध्ये काही त्रुटी राहून जातात किंवा खरेदीखत आणि त्या अनुषंगाने केलेला फेरफार किंवा बदललेले महसुली अभिलेख यामध्ये तफावत दिसून येते.

असं जर झालं तर त्या महसूल अभिलेख या मध्ये जी चूक झालेली आहे. त्याच्या दुरुस्ती करता आपण त्वरित संबंधित महसूल अधिकाऱ्याकडे अर्ज किंवा जे काही आवश्यक कार्यवाही आहे ती केली पाहिजे. समजा फेरफार टाकण्याची आपल्याला नोटीस आली असेल. आणि त्याच्यात जर ते क्षेत्र चुकलं असेल. आणि ते आपल्या जर लक्षात आलं. तर मंडळाधिकारी स्तरावर आपल्याला ती दुरुस्ती करून घेता येईल.

मात्र फेरफार मंजूर झाला त्यानुसार सातबारा सुद्धा जर फिरला आणि त्याच्यानंतर जर आपल्या लक्षात आलं. तर मात्र तो फेरफार आपल्याला एचडीओ कडे म्हणजे प्रांत कार्यालय कडे आव्हानीत करून ती चूक दुरुस्ती करून घ्यावी लागेल. एक मात्र नक्की की जेव्हा महसुली अभिलेख आणि नोंदणीकृत करार यांच्यामध्ये तफावत असते आणि त्या तफावत त्यामुळे महसूल अभिलेख या मध्ये ज्या चुका होतात.

त्या दुरुस्त करून मिळण्याची शक्यता ही निश्चितपणे अधिक असते. त्यामुळे असा जर काही झालं तर फार घाबरून जायचं काही कारण नाही. कारण एका अर्थाने ती तांत्रिक चूक झालेली आहे. आणि ती आपल्याला दुरुस्त करून घेता येऊ शकते. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “वाटणीतील जमिनीचा सातबारा फक्त भावाच्याच नावावर असेल तर काय होईल? ।। खरेदीखतापेक्षा जास्त जमीन आपल्या ताब्यात असेल तर संपूर्ण क्षेत्राकरता आपल्याला मालकी मिळेल का?।। सातबारा वर हिस्से झाले, पण प्रत्यक्ष जमिनीवर जर हिस्से झाले नसतील, तर खरेदीखत करता येईल का?।। एखाद्या जमिनीवर जर बारा वर्ष कब्जा असेल तर त्याची मालकी आपल्याला मिळते का?।। जमिनीचा काही भाग विकला असेल आणि सातबारा फेरफार करताना मात्र संपूर्ण क्षेत्र किंवा संपूर्ण सातबाराचा जर फेरफार नोंद झाली तर काय करावं? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

  1. दोन भावांची वाटणी मधील एकाची खरेदी मी घेतली आणि दुसरी एकाणे घेतली
    10 वर्ष खरेदी मी अगोदर घेतली
    मला रस्ता नाही
    मला उपाय सुचवा

Comments are closed.