नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
आपण जेव्हां एखादं पेंटिंग बघतो जसं की एखादं निसर्गचित्र, त्या वेळी ते इतकं हुबेहूब एखाद्या फोटोग्राफ सारखं दिसतं की आपल्या तोंडून नकळत व्वा! असे उद्गार बाहेर पडतात. तुम्ही जेव्हां काईस झावाग्लिया ह्या अमेरिकन कलाकाराने केलेलं अप्रतिम भरतकाम बघाल, तेव्हां तुमच्या तोंडून देखील साधारण अशीच प्रतिक्रिया उमटेल. तिने केलेलं भरतकाम नक्की भरतकाम आहे, की पेंटिंग आहे ह्याची खात्री करून घेण्यासाठी तुम्ही ते अधिक जवळून निरखाल, आणि मग मात्र तुमची खात्री पटेल की ते हुबेहूब एखाद्या पेंटिंग सारखं दिसत आहे, परंतु पेंटिंग नाही.
काईस हिने तयार केलेली ही अविश्वसनीय भरतकामाची शैली विणकामाचे नियम पाळत नाही, त्याऐवजी ती तिला आवडेल त्या पद्धतीने विणकाम करते. सोबत दिलेल्या काही प्रतिमांमध्ये तुम्ही तिची काम करण्याची शैली किती वेगळी आहे ते पाहू शकाल. तिची काम करण्याची शैली तर वेगळी आहेच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचा अनोखा दृष्टिकोन. तिच्या अनोख्या दृष्टिकोनामुळे काईस तिच्या छायाचित्र-वास्तववादी “पेंटिंग्ज”च्या सहाय्याने कलाविश्वात स्वत:चे स्थान निर्माण करत आहे. होय, कित्येक समीक्षक तिच्या भरतकामाला पेंटिंगच म्हणतात.
जेव्हां तिने तिच्या कला कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा ती एक पारंपारिक चित्रकार होती आणि पेंटिंग्ज करत असे. तिने अनेक पेंटिंग्ज केली आणि लग्नानंतर देखील ती चित्रंच काढत असे, पण जेव्हां ती गर्भवती होती, तेव्हा तिने पेंट आणि टर्पेन्टाइनला पर्याय शोधण्यास सुरुवात केली कारण त्यांचा उग्र वास. पेंटिंग करण्याची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नव्हती आणि पेंट आणि टर्पेन्टाइनचा वास तिला सहन होत नव्हता. एक दिवस ती तिच्या आईच्या आणि आजीच्या भरतकामाच्या हस्तकलेबद्दल विचार करत राहिली जी तिने लहानपणी ऑस्ट्रेलियात पाहिली होती. काही दिवसातच तिला भरतकाम करण्याची कल्पना सुचली.
तसं पाहिलं तर २००८ पर्यंत काईसचं काम दुर्लक्षित राहिलं होतं, पण जेव्हां लिऑन्स विअर ह्या न्यूयॉर्क मधील आर्ट गॅलरीने ‘पल्स’ आर्ट फेअरमध्ये तिचे काही भरतकाम केलेले पोर्ट्रेट प्रदर्शित केले, तेव्हां मात्र सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या आणि तिचे पोर्ट्रेटस दोन तासांत विकले गेले!
तिने आपल्या कामाबद्दल नेहमीच गंभीरपणे विचार केला आहे. काईस एका साध्या पार्श्वभूमीवर तिच्या विषयाचे छायाचित्रं घेऊन ती प्रतिमा फॅब्रिकवर हस्तांतरित करते, आणि प्रत्येक रेषा, केस आणि सुरकुत्या यांना ठळकपणे चितारल्यावर भरतकाम करण्याची सुरुवात करते.
इच्छित रंग आणि सूक्ष्म पोत प्राप्त करण्यासाठी काईस वेगवेगळ्या रंगाचे धागे एकावर एक याप्रमाणे विणते. एका मोठ्या कामात लोकरीचे अंदाजे १०० रंग असतात, ते काम पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागतो आणि त्यात हजारो टाके असतात.
कलाविश्वामध्ये भरतकामाला जेवढी प्रतिष्ठा मिळायला हवी तेवढी मिळत नाही असे तिला वाटते. परंतु हे चित्र लवकरच बदलेल अशी आशा देखील तिला वाटते. सुरूवातीच्या काळात तिच्या कामाकडे थोडं साशंकतेने बघितलं जात असे, पण लवकरच तिच्या परिश्रमांना फळ आलं. अधिकाधिक काम करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा तिचा मानस आहे, त्यात ती कितपत यशस्वी होते हे येणारा काळच ठरवेल.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा