Cibil स्कोर वाढवण्यासाठी करा या गोष्टी. मिळेल झटपट बँक कर्ज.

अर्थकारण

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

घर घ्यायचे असेल, एखादी मालमत्ता घ्यायची असेल किंवा चार चाकी गाडी घ्यायची असेल, आपण काय करतो तर कॅश न देता बँकेमधून कर्ज घ्यायला प्राधान्य देतो. कारण एकाच वेळेस एवढी मोठी रक्कम कॅशमध्ये देणं आपल्याला शक्य होत नसतं. परंतु अनेक बँका कर्ज देताना त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर नक्की तपासतात. त्याद्वारे त्या व्यक्तीची संपूर्ण आर्थिक स्थिती जी आहे ती समजून घेण्यास त्या बँकेला मदत होते आणि त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुद्धा निश्चित केली जाते. परंतु बहुतेकांना कर्ज घेईपर्यंत क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर याचा अर्थ माहिती नसतो. ज्यांना माहिती असतो, त्यांना हा नेमका सुधरवायचा कसा? याची पूर्ण माहिती नसते. म्हणूनच आज इथे आपण सविस्तर मध्ये बघणार आहोत की, cibil score किंवा क्रेडिट स्कोर याचा अर्थ काय आहे? बँकेच्या कर्जाचा आणि याचा काय संबंध आहे? हे सुद्धा समजून घेऊयात. आणि जर का एखाद्या सिबिल स्कोर कमी असेल आणि त्यातून सुधरवायचा असेल तर नेमका कसा सुधारता येऊ शकतो? याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत.

CIBIL Score म्हणजे काय? :  CIBIL, म्हणजे “क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड” ही कंपनी भारतातील प्रत्येक व्यक्तीचा अनेक कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची सर्व नोंद ठेवते. cibil कडे आपलीच सगळेच कुंडली असते. क्रेडिट कार्डचे आपल्या लोन्स ची किती वेळा लोन घेतलं ? किती वेळा मध्ये फेडलं ? हप्ता किती होता ?कोणता हप्ता हा वेळेवर ते गेला? कोणता हप्ता आपण चुकवला? थकबाकी नेमकी किती आहे ?
हे सर्व सर्व कुंडली त्यांच्याजवळ असते. मग ही सर्व माहिती त्याच्या जवळ कोण देतं, तर सर्व नोंदणीकृत बँका, आणि आर्थिक संस्था ही आपली माहिती नियमितपणे सिबिल कडे जमा करत असतात. Cibil या सर्व माहिती वरती आधारित त्या त्या व्यक्तीचा रिपोर्ट तयार करते. आणि ह्या क्रेडिट स्कोर ला अधिकृत आर्थिक विश्वासार्हता असेसुद्धा म्हटले जात. आता बघा याच्या वरती बँक तुम्हाला देण्यात येणारं कर्ज जे आहे तुम्ही नियमितपणे ठेवू शकाल किंवा नाही फेडू शकणार याचा एकंदरीत अंदाज बांधते.

जर एखादी व्यक्ती घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळच्या वेळी जर का भरत असेल तर त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर चांगला मानला जातो आणि जर का एखादी व्यक्ती हप्ते नियमितपणे भरत नसेल किंवा त्याचा तारखेचा हप्ता चुकवत असेल आणि नंतर दंडाची रक्कम भरून तो हप्ता क्लियर करत असेल तर त्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोर हा चांगला राहत नाही हे सुद्धा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आता हा क्रेडिट स्कोर 3 अंकांचा असतो. हा क्रेडिट स्कोर 300 ते 900 या दरम्यान असतो.

जर तुमचा क्रेडिट स्कोर 900 च्या आसपास असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेचे कर्ज अगदी सहजपणे मिळू शकतात. अर्थात इतकेच कर्ज मिळणार आहे जितकी तुमची परतफेड करण्याची क्षमता असते. तसेच साडेसातशे पेक्षा जास्त असेल तर तो चांगला मानला जातो आणि जर का तुमच्या तीनशेच्या आसपास असेल तर तो तितका चांगला सिबिल स्कोर मानला जात नाही. सीबील स्कोअर कमी असेल तर बँकेकडून आपणास कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते. टीआर सीबील स्कोअर जास्त असेल तर कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही. साडेसातशे च्या आसपास जर का तुमचा सिबिल स्कोर असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड सुद्धा अगदी सहज मिळून जातात आणि साडे-पाचशे च्या पुढचे स्कोर मेन्टेन करणं हे फार गरजेच आहे.

जर कोणाला पर्सनल लोन घ्यायचं असेल तर तुमचा मिनिमम सिबिल स्कोर हा सातशे असंण हे फार उत्तम आहे जेणेकरून तुम्हाला ते पर्सनल लोन मिळवण्यासाठी जास्त घासाघीस आणि पायपीट करावी लागत नाही. आता बघा आज नाहीतर उद्या प्रत्येकाला लोन हे घ्यायचं आहे. कोणाला घर घ्यायचंय कोणाला गाडी घ्यायची किंवा कोणाला घर असेल तर दुसरे घर घ्यायची आहे किंवा मालमत्ता करायची असेल तर अशा वेळेस आपण काय करणार आहोत अर्थातच कॅश मध्ये हे सर्व न करता आपण बँकेकडून लोन घेणं प्रेफर करणार आहोत. त्याच्यासाठी तुमचा cibil score जो आहे तो चांगला असणे गरजेचे आहे. मग जर हा सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे असे जर का आपण म्हणत असेल तर हा स्कोर एका दिवसात चांगला होऊ शकेल का? तर नक्कीच “नाही”

तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या फायनान्शिअल सवयीमध्ये थोडेफार बदल जर का तुम्ही केली तर लवकरात लवकर आणि चांगला फरक पडू शकतो. जेणेकरून तुम्हाला कर्ज मिळण जे आहे ते सोपे होऊ शकेल. आता जर का तुम्हाला हा सिबिल स्कोर सुधरवायचा असेल तर कोणत्या 10 गोष्टी तुम्ही करायला हव्यात आणि नाही करायला हव्यात ते जणू घेऊया.

1. तुमच्या क्रेडिट कार्ड वर जी काही थकबाकी शिल्लक आहे ती लवकरात लवकर भरून टाकावी. आणि तुम्ही EMI कधी चुकवला नाही पाहिजे. हे सर्वप्रथम आणि पहिली सर्वात महत्वाची गोष्ट.

2.  तुमची क्रेडिट लिमिट ही नेहमी जास्तीत जास्त ठेवा. तुमच्या क्रेडिट लिमिटच्या 4 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रक्कम तुम्ही खर्च नाही करायला पाहिजे. म्हणजे जर का तुमच्या क्रेडिट लिमिट एक लाख रुपये असेल तर तुम्ही तीस हजाराच्या आसपास ची रक्कम खर्च करा .

3. तुमचं कर्ज एलिजिबिलिटी नेमकी किती आहे? हे तुम्ही चेक करायला हवं आणि अशाच बँकेकडे apply करा जिथे कर्ज मंजूर होण्याची चान्सेस जास्त आहेत. क्रेडिट कार्डसाठी apply करताना अगदी शॉर्ट gap ठेवू नका, म्हणजे आज का बँकेचे क्रेडिट कार्ड अप्लाय केलं लगेच उद्या दुसरा बँकेचे क्रेडिट कार्ड अप्लाय केलं असं करू नका. एक मर्यादित टाईम लिमिट ठेवून तुम्ही क्रेडिट कार्ड साठी अप्लाई नक्कीच करू शकता.

4. तुमचे क्रेडिट रिपोर्ट नेहमी तपासून बघितले पाहिजे. कारण भरपूर वेळा चुका देखील होऊ शकतात. रिपोर्ट मध्ये काही चूक असेल तर संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देण्यासाठी जास्त वेळ घालू नका. कारण या गोष्टीचा तुम्ही कर्ज घेताना तुम्हाला त्रास होऊ शकतो.

5. वेगवेगळ्या कालावधीचे लोन घेण्याचा पर्याय निवडा. म्हणजे सगळेच्या सगळे लोन (हे लोन घेतला, मी दोन वर्षात फेडेन, हे घेतला ते दोन वर्षात फेडेन, ते घेतलं एका वर्षात फेडेन) असं कृपया करू नका. जर का तुम्हाला सध्याचे घेतलेलं लोन फेडणे शक्य होत नसेल, तर नव्याने लोन कृपया घेऊ नका.

6. अगदी सुरुवातीपासून म्हणजे जे तुमचं पहिलं कर्ज असेल तेव्हा पासून चे त्या कर्ज फेडिचे रेकॉर्ड तुम्ही मेंटेन करा आणि सर्वात चांगली रीपेमेंट हिस्टरी जी आहे ते रेकॉर्ड तयार करून तुम्ही तुमचं हे कर्जाचं अकाउंट बंद करा.

7. जर का तुम्हाला माहिती आहे कि येणाऱ्या काळामध्ये तुमचे काही खर्च वाढणार आहेत तर अगोदर क्रेडिट लिमिट वाढवून घ्या आणि तुमची क्रेडिट लिमिट ओलांडून खर्च करू नका.

8. तुमचे dues पूर्ण भरा, आणि महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे credit cards तेव्हाच घ्या जेव्हा तुमची गरज असेल आणि तुमच्या समोर कोणताच पर्याय उपलब्ध नसेल.

9.  “हायर इंटरेस्ट रेट” जिथे आहे त्याला पहिल्यांदा target करा. म्हणजे तुमच्या ज्या हप्त्याचा सर्वाधिक व्याजदर असेल, सर्वप्रथम ते फेडण्याला तुम्ही प्राधान्य द्या. आता भरपूर वेळा होत अस कि खूप सारे लोन एकत्रितपणे घेतले जाते ( credit card loan किंवा personal loan किंवा गाडीसाठी लोन घेतलं जातं) हे सर्व आपण वेगवेगळे हप्ते भरून फेडत असतो. म्हणजेच 3 वेगवेगळे EMI आहेत. त्यापेक्षा काय करू शकता तुम्ही, एकच मोठे लोन घ्या. हे 3 लोन तुम्ही क्लिअर करा आणि त्या एकाच लोनचा हप्ता तुम्ही फेडत राहणं हेच जास्त सोप व आणि परवडणारे आहे आणि त्याचा फायदा होऊ शकतो.

10. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा टोटल EMI किती असावा याविषयीची माहिती असणं. तुमचा टोटल EMI हा तुमच्या पगाराच्या 30 टक्क्यांच्या आसपास असायला पाहिजे.जर का त्याच्याहून जास्त म्हणजे 40-50 %. तर तुम्ही तुमची पगार EMI भरण्यात सांपवाल, आशयाने तुमची आर्थिक दृष्ट्या दमछाक होते आणि तुमचे आर्थिक स्वास्थ बिगडत जाते. समजा, तुम्हाला एक लाख रुपये पगार आहे तर तुमचे सगळे EMI मिळून ही रक्कम तीस हजाराच्या आत मधेच व्हायला पाहिजे. 31 हजार पर्यंत झालं तर ठीक आहे. पण जर का ते 40000, 50000 EMI होत असेल तर तुम्ही बाकीच्या ज्या तुमच्या investment चे प्लान्स आहेत, ते तुम्ही करू शकणार नाही हे समजून घ्या.

ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित पाळल्या तर नक्कीच तुमचा cibil score चांगला राहील. वाढायला मदत होईल आणि या सर्वांचा फायदा हाच होईल की तुम्हाला हव त्यावेळेस आणि हव्या तितक्या रकमेचे कर्ज बँकेकडून मिळेल.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.