नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
प्रसिद्ध बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केके यांचे 31 मे रोजी रात्री कोलकाता येथे एक संगीत समरोहा-दरम्यान निधन झाले. या बातमीने केके च्या लाखो चाहत्यांना अस्वस्थ केले आहे. आता या आपल्या आवडत्या गायकाचे कोणतेही नवीन गाणे आपल्याला ऐकता येणार नाही. मात्र, कलाकार कधीच मरत नाही हेही सत्य आहे. आपल्या कामातून ते नेहमीच लोकांच्या हृदयात राहतात. केके सुद्धा त्यांच्या गाण्यांनी आणि हृदयाला भिडणाऱ्या आवाजाने कायमचे अमर झाले आहेत. त्यांनी गायलेल्या गाण्यांशी प्रत्येक पिढी रिलेट करू शकते.
1996 पासून आजपर्यंत त्यांनी प्रत्येक पिढीसाठी एकापेक्षा एक चांगली गाणी गायली आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी केकेच्या गाण्यांची एक लिस्ट घेऊन आलो आहोत जी प्रत्येक पिढीच्या लोकांना आपलीशी वाटेल.
1996 मध्ये पहिल्यांदा ए.आर. रहमानने संधी दिली होती, त्याच वर्षी ‘माचीस’ चित्रपटातील ‘छोड आये हम वो गलियां’ हा केकेने आपल्या आवाजाने हिट केला.
1997 ते 2012 पर्यंत केकेने एकापेक्षा एक हिट गाणी दिली. यादरम्यान त्यांनी गायलेली गाणी आजवर लोकांच्या जिभेवर आहेत. यामध्ये ‘तडप तडप’ ते ‘सच कह रहा है दिवाना’ सारख्या उत्तम गाण्यांचा समावेश आहे. 1999 मध्ये त्यांचा स्वतःचा ‘पल’ अल्बम रिलीज झाला होता. याशिवाय त्यांची ‘प्यार के पल’ आणि ‘यारों दोस्ती’ सारखी गाणी प्रचंड गाजली.
प्रेमामध्ये अपयशी ठरलेल्या लोकांसाठी केके यांचे हे गाणे तर जणू अमृत. आपल्यापैकी एकही असा व्यक्ति नसेल ज्याने ब्रेकप झाल्यानंतर केके चे हे गाणे रिपीट मोड व्हीआर ऐकले नसेल.
केके यांनी जगाचा निरोप घेतला असेल, पण त्यांच्या मनमोहक आवाजाने ते कायम आपल्या हृदयात राहतील, जेव्हाही त्यांची गाणी ऐकू तेव्हा त्यांच्या अस्तित्वाची भावना जिवंत राहील.
केके यांनी त्यांच्या कारकिर्दीत 500 हून अधिक हिंदी गाणी आणि 200 हून अधिक तेलुगू, बंगाली, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
त्यांचा अकाळी मृत्यू हा बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रासाठी कधीही न भरून निघणारी जखम आहे, त्यांचे हे पुढील गाणे पाहून तुम्हीही या वाक्याशी सहमत व्हाल.
सूचना : सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.