कुळ कोणाला म्हणायचे? ।। बॉंबे टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट १९४८ ।। तहसीलदार यांचे कुळ कायद्याबाबत अधिकार ।। कुळाचे अधिकार व जबाबदारी ।। शेत मालकाचे अधिकार ।। कलम 32 ग ।। कोणत्या जमिनी ला कुळ लागत नाही? ।। कूळ असलेली जमीन विकणे !

शेती शैक्षणिक

Bombay Tenancy And Agriculture Land Act 1948: भारत जसा स्वतंत्र झाला तसा त्याचा सामजितकत्वाकडे (Socialism कडे) त्याचा कल वळाला. आणि सामाजिकत्व Socialism च्या धर्तीवर त्यांनी बरेचसे कायदे केले जे जमिनीला धरून होते. या कायद्यामध्ये आपण बघणार आहोत टेनन्सी (Tenancy) आणि ऍग्रीकल्चर लँड (Agriculture Land).

कुळ कायदा इतिहास व पार्श्वभूमी बॉम्बे स्टेट 1939 मध्ये कुळाला जमीन विकत घेण्याचा अधिकार नव्हता पण त्याचे हक्क चांगल्याप्रकारे संरक्षित करण्यात आलेले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो कसेल त्याची जमीन याच धर्तीवर 1948 ला हा कायदा पास करण्यात आला. तसेच त्याकाळी वेगवेगळी संस्थाने होती जसे निजाम वगैरे त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळे कायदे होते.

मराठवाडा हा निजामांच्या अधिपत्याखाली होता म्हणून हैदराबाद तेंडेन्सी अंड ॲग्रीकल्चर ॲक्ट मराठवाड्यासाठी. डिमड परचेसर ही संकल्पना हैदराबाद ते टेनशी कायद्यात नव्हते. विदर्भ हा सेंट्रल प्रोव्हिडन्स च्या अंतर्गत होता तिथे विदर्भासाठी वेगळा कायदा होता.

कुळ कोणाला म्हणायचे?: कुळ कायद्यानुसार कलम 2 /18 ज्याने जमीन लीज म्हणजे करार पद्धतीने घेतली आहे शेत मालकाकडून त्याला कुळ म्हणता येते. सातबारावर ज्याची नोंद संरक्षित कुळ असे करण्यात येते जो कायदेशीर पद्धतीने शेत मालकाच्या मर्जीने ज्याची जमीन कसतो त्याला कुळ म्हणतात.

बेकायदेशीर पद्धतीने जमीन ताब्यात घेतल्यास तो कुळ होत नाही. डिमड टेनंट (Deemed Tenant) चार/अ कायदेशीरपणे जमीन कसणारा. पर्मनंट टेनंट (Permanent Tenant) अशी कुठेच व्याख्या नाही पण वडिलोपार्जित कुळाने जमीन कसणाऱ्या परमनंट टेंनट म्हणतात.

कुदळणी करणे मशागत करणे (To Cultivate 2(5) to till the land): म्हणजे एखादी गवत पडीक जमीन असेल त्यात कुदळणी मशागत होत नसेल तर त्याला कुळ म्हणता येणार नाही. एखादा व्यक्ती कुळ आहे की नाही हे कसे ठरवणार तर ते अँडरसन मॅन्युअल मध्ये कायद्याने ठरवता येते.

कुळाचा स्वतंत्र फेरफार केलेला असावा. मालकाला त्याची नोटीस बजावलेली असावी आणि मालकाचा त्यावरती काहीही अक्षेप नसावा तरच तो फेरफार मंजूर होतो. तलाठी ला सुमोटो म्हणजेच स्वतःला अधिकार आहे कि गावामध्ये जमिनीचा मालक आणि जमीन कसणारा ह्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत तर तो कुळाच्या विनंतीनंतर कुळाचे नाव लावण्याची प्रक्रिया करू शकतो. ही सर्व प्रक्रिया कायदेशीरपणे पूर्ण झालेली असेल आणि पीक पाणी मध्ये त्याची नोंद असेल तर हा कुळ असल्याचा खूप मोठा पुरावा आहे.

तहसीलदार यांचे कलम 17 नुसार कुळ कायद्याबाबत अधिकार: एखादा व्यक्ती शेतकरी आहे की नाही हे ठरविण्याचे अधिकार, कुळ कोणाला म्हणायचे हे ठरविण्याचे अधिकार, दिवाणी न्यायालयात न जाता तहसीलदार ठरवू शकतात की कोण शेतकरी आणि कोण कुळ. एका कुटुंबामधील व्यक्ती कुळ असू शकत नाही हे तपासण्याचा अधिकार आहे रित एक ची नोंद म्हणजे म्हणजे कुळ होत नाही.

सिलिंग शेत्र मूळ सिलिंग कायदा व या कायद्यातील सिलिंग मध्ये थोडा बदल आहे तो असा. बागायत म्हणजे त्याला बारामाही पाणी असते त्याला बागायत म्हणतात व त्याला शासकीय योजनेतून बारमाही पाणी उपलब्ध होते किंवा एखादी योजना दिशा असं स्वतःला ते बारा महिने पाणी आणण्यासाठी त्याला बागायती म्हणतात निम बागायत म्हणजे सहा महिने किंवा तीन महिने पाणी उपलब्ध असते तर आणि बागायत म्हणतात जिरायती म्हणजेच कोरडवाहू जी संपूर्ण निसर्गावर अवलंबून असते पाण्यासाठी.

जलोभी जमीन आणि इलुव्हियल लँड (Alluvial and Eluvial Land): जर नैसर्गिक रित्या एखाद्या नदीचा गाळ एका जागेहून दुसर्‍या जागी कडे वाहत गेला तर त्या जागी जमीन कमी होते व ज्या जागेवर तो गाळ वाहून गेला त्या जागेवर जमीन अधिक होते अशी गाळाची मृदा ही बागायती धरली जाते जर पुराचे पाणी त्यात येत असेल.

अशी घटना जर कोणी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली तर ते सर्व अधिकाऱ्यांना सांगून त्या जमिनीची परत नकाशात तयार करून त्याची मोजणी करून एक (केजेपी) कमी जास्त पत्रक तयार करण्यास सांगतात या पत्रकानुसार सर्वे होऊन सातबारा मध्ये बदल करण्यात येतात व वेगळा नकाशा देखील येतो.

खंड किती असावा व कसा भरावा: शेत साऱ्याच्या पाचपट किंवा वीस पट एकराच्या जी कमी असेल ती अधिकतम खंडाची मर्यादा आहे शेत साऱ्याच्या दुप्पट ही किमान मर्यादा आहे यामध्येच खंडा आकारता येतो. खंड आकरण्याच्या पद्धती ७ अ मध्ये पीक पाणी असते त्यात रीत लिहिलेली असते. ७/१२ मधील ७ अ जो जमीन कसणारा असतो त्याचे नाव यात नमूद असते. एकूण सहा प्रकारच्या रीत आहेत: एक) स्वतः जमीन कसणारा, दोन)भाडोत्री मजूर, तीन) रोख खंड, चार) पीक वाटा, पाच) ठराविक धान्य फिक्स क्रॉप, सहा) धान्य व पैसा दोन्ही.

कुळाचे अधिकार व जबाबदारी कलम 16: कुळासाठी घर केले तर काही झाले तरी त्याला काढता येणार नाही फक्त गर हे कुळाने स्वतःच्या खर्चातून बांधलेले पाहिजे. कलम 17 राहते घर विकत घेता येऊ शकते. कलम 19 फळ झाड लावले असतील आणि कुळाचा ताबा जर गेला तर त्याला त्याची किंमत द्यावी लागते.

कलम 20 नैसर्गिक झाड असतील तर दोन/ तीन कुळ आणि 1/3 मालक. कलम 32 जमीन विकत घेण्याचा अधिकार असतो टीलर डे ला जर कुळ असेल तर तो मालक झाला आहे. कुळाने प्रत्येक हंगामात जमीन ही कसलीच पाहिजे व त्यातून उत्पन्न घेतले पाहिजे व करारानुसार वेळेत मालकाला खंडही दिला पाहिजे. शेतसारा भरणे ही कोणाची जबाबदारी असते शेत सारा भरून त्याच्या पावत्या जपून ठेवणे कुळाची जबाबदारी असते.

कलम 32 ग: सुमोटो नुसार तहसीलदार मालक आणि कुळ यांना नोटीस बजावतो. कलम 32 एच या मूल्यांकनानुसार वीस ते दोनशे पट जमिनीची किंमत ठरविण्यात येते. कलम 32 पि नुसार कुळाने ही किंमत जर फेटाळली तर ही खरेदी निष्क्रिय होते. कुळाकडे असलेली स्वतःची जमीन आणि आणि व कायदा खाली आलेली जमीन या कायद्याच्या सिलिंग पेक्षा जास्त नको जर जास्त असेल तर मूळ जमीन मालकाला परत देण्यात येते. अन् दोघांची जमीन जर सिलिंग च्या वर असेल तर सिलिंग वरची दोघांची जमीनही सरकारजमा होते.

शेत मालकाचे अधिकार : कलम 31 मध्ये जर शेत मालक स्वतः बोनाफाईट शेतकरी असेल तर तो जमीन त्याला राखण्याचा अधिकार आहे म्हणजे जर त्याचा उदरनिर्वाह सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहे अण त्याला शेतीशिवाय पर्याय नाही. पहिले कलम 31 ची कारवाई होते आणि मग कलाम ३२ ची कारवाई होते जर सरळ कलम 32 ची कारवाई झाली तर ते बेकायदेशीर ठरवता येते.

३२ अ शेतमालक ही विधवा अज्ञान अपंग असेल तर जमीन कुळला घेण्याचा अधिकार नसतो. शेतमालक विधवा असेल तर कलम 31 किंवा 32 कारवाई होत नाही. कलम 32 फ खाली जर विधवा मयत झाली असेल तर तिच्या वारसाला घेऊन कलम 32 ग ची कारवाई करता येते. जर मयत विधवा चा वारसांना बोनाफाईड शेती पाहिजे असेल तर त्यांनी एका वर्षात अर्ज करायला हवा (कुळ नष्ट करण्यासाठी).

जर वारसांनी एका वर्षात असे केले नाही तर कलम 20/ 10 कुळाने लेखी अर्ज करायचा खंड करांना जमीन विकत देणेबाबत. शेतमालक जर सज्ञान नसेल तर कलम 31 नुसार कुळ नष्ट करता येते पण जेव्हा तो सज्ञान होईल तेव्हा. पण जर हे एका वर्षात केले नाही तर कुळ पुढच्या वर्षी जमीन विकत घेण्यासाठी अर्ज करू शकतो.

कोणत्या जमिनी ला कुळ लागत नाही?: जी जमीन शासनाच्या मालकीची आहे. जी जमीन औद्योगिक किंवा रहिवासी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. जी जमीन इतर मालकीचे आहे परंतु शासनाने खंड ठरवून भाडेतत्त्वावर घेतली आहे. एकाच घरातील लोक सखे नातेवाईक कुळ लावू शकत नाही. कलम 43 क नुसार कॉर्पोरेशन हद्दीतील जमीन कोणाला विकत घेता येत नाही पण टीलर डे च्या आधी कॉर्पोरेशन अस्तित्वात पाहिजे. कलम ४३, १ अ नुसार सैनिकी सेवेच्या व्यक्तीच्या जमिनीला कुळ लागत नाही.

कूळ असलेली जमीन विकणे: कलम 64 नुसार जर कुळ असेल आणि मूळ मालकाला ती जमीन विकायची असेल तर ट्रिब्युनल कडे अर्ज करावा. कलम ३२ एच नुसार किंमत ठरवण्यात येते मूलांकानाच्या २० ते २०० पट हि रक्कम असू शकते व यात कुळाला प्राधान्य दिले जाते. कलम 32 ओ टिलर डे नंतर उदयास आलेले कुळांनी एका वर्षात जमीन खरेदी करण्याची तयारी दाखवावी. जर वर्षभरात खरेदीची तयारी नाही दाखवली तर ते अधिकार नष्ट होतात.

काही महत्त्वाची कलमे: कलम 84: कलम 43 अंतर्गत जमीन विकणे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी अन्यथा कलम 84 ची कारवाई सुरू होते पण ते विशिष्ट कालमर्यादेत सुरू झाल्या पाहिजे साधारणतः ह्याकरता ३ वर्षे कालावधी असतो. कलम 63 नुसार शेतकरी नसेल तर शेत जमीन घेता येत नाही.

कलम 36 नुसार बिगर शेती कामासाठी जमीन पूर्वपरवानगीने घेता येते. कलम 63 अ औद्योगिक टाऊनशिप कारणासाठी शेत जमीन घेतली असेल अन ती 10 हेक्टरपेक्षा कमी असेल तर सरळ वापर सुरू करावा व जो सरकारी कर आहे त्याचे अनुषंगाने ती भरावी. पण जर दहा एकर पेक्षा जास्त असेल तर डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री ची परवानगी घ्यावी.

कलम 44 अ कारखाना कामासाठी जर शेत जमीन घेतली असेल औद्योगिक कारणासाठी तर सरळ वापर सुरू करा व जे काही औद्योगिक कर आहेत ते भरावे व तलाठी यांना एक महिन्याच्या आत कळवावे. कलम 65 नुसार पडीक जमीन कलेक्टरला ताब्यात घेता येते आणि ताब्यात घेतलेली जमीन तो कोणालाही लीजवर ती देऊ शकतो.

परंतु मूळ मालकाने जर अर्ज केला की मी आता ही जमीन पडीत ठेवणार नाही तर ती मूळ मालकाला पुन्हा द्यावी लागते. कलम 88 ब एखादी ट्रस्ट असते जसे शाळा महाविद्यालय गोशाळा यांना कलम 32 मधील कारवाईपासून सूट आहे पण त्या ट्रस्ट ह्या नोंदणीकृत असाव्या आणि त्यांच्या उद्दिष्टनुसार त्या त्यांचे काम पार पाडत असाव्यात.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी

5 thoughts on “कुळ कोणाला म्हणायचे? ।। बॉंबे टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट १९४८ ।। तहसीलदार यांचे कुळ कायद्याबाबत अधिकार ।। कुळाचे अधिकार व जबाबदारी ।। शेत मालकाचे अधिकार ।। कलम 32 ग ।। कोणत्या जमिनी ला कुळ लागत नाही? ।। कूळ असलेली जमीन विकणे !

  1. या कायद्यानुसार मुळ मालकाच्या पिढीत अंतर पडले तर कुळ काढता येते का?

  2. मी आशोक रामभाऊ शिदे आपलेला विनती करतो कि गाव रजपे ता करजत जि रायगड येथिल सरवे नंबर ६४ ४३ ऊपलध नाही असे लेखी तलाटी याणी दिले आहे तरी आमची इजी कायम कुळ होती व विधवा व तिन लहान मुले वय ५ ७ व मुलगी ९ व अजी विधवा आशी जमिन हडप केली व आमचे हकक डावलेले गेले मणुन फेरफार मिळत नाही तरी काही तरी उपाय सुचवाल मी आपणास विनती करतो आपला विशवासु आशोक रामभाऊ शिदे फोन ९३२२९४०७०२

  3. माझे वडील हायात असल्या पासुन जमीन कसत आहे.व.ती जमीन वडींना फसवुन ईतर ईसमाने खरेदी खत करुन घेतले.परंतु मी ताबा सोङला नाही.व गेले 40 वर्षा पासुन मीच जमीन कसत आहे.व तहसील..व प्रान्त..कलेक्टर.व आयुक्त..हे सर्व महसुल विभागाचे निकाल लागले.आहेत.तर मला कुळ लावता येईल का ते कसे लावावे.

Comments are closed.