आयकर विभागाने इनकमटॅक्स रिटर्न च्या वेबसाईट मध्ये केले ‘हे’ बदल ।। आता तुम्ही तुमचा इनकम टॅक्स रिटर्न स्वतःच फाईल करू शकणार ।। जाणून घ्या प्रक्रियेत काय बदल झाले आहेत !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

तुमचा इनकम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर विवरणपत्र कोण भरतं? तुमच्यातले काही जण असे विचारतील की हे काय आहे. आणि ज्यांना माहिती आहे त्यांचे उत्तर असेल आमचा सी ए भरतो. आणि खरं सांगू का तुमचा आयकर विवरणपत्र आता तुमचं तुम्हीच भरू शकता.

पाश्चात्य देशांमध्ये बहुतेक नागरिक स्वतःचे सगळे आर्थिक व्यवहार स्वतः करतात. आणि आता भारतातही तुमचा रिटन म्हणजे विवरणपत्र भरणे अगदी सोपे झाले आहे. इनकमटॅक्स जीओव्ही डॉट इन या बदललेल्या वेबसाईटमुळे. म्हणजे सरकारचा तसा दावा आहे की आता इन्कम टॅक्स भरणे एकदम सोपे झाले आहे.

ही वेबसाईट काही नवीन नाही. पण मग या वेबसाईट मध्ये सरकारने असे नेमके काय बदल केले आहेत? आणि त्यामुळे तुमचा विवरणपत्र भरणे खरंच सोपं झालंय का? बघुया. आज सकाळी आयकर खात्याकडून मला असा हा एक एसएमएस आलाय. आयकर विभागाच्या नवीन वेब पोर्टलवर माझं स्वागत करणारा हा मेसेज होता.

आणि त्यानंतर थोड्याच वेळात ही नवीन वेबसाईट सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहे. सरकारचा असा दावा आहे. करदात्यांसाठी ऑनलाइन विवरणपत्र भरणं आता सोपा आणि सुटसुटीत झाले आहे. आधुनिक पद्धतीने स्वतःचे स्वतः त्यांना विवरणपत्र भरता येईल. यात विवरण पत्र भरल्या भरल्या, त्याचं पानावर भरलेल्या अर्ज याची पोच तुम्हाला दिसेल.

शिवाय तुम्ही परताव्यासाठी, म्हणजे रिफंड साठी अर्ज केला असेल. तर त्याचं स्टेटस ही त्याच पानावर तुम्हाला दिसेल. गोंधळून जाऊ नका. ही नवीन वेबसाईट कसे काम करणारे हे आपण लगेच समजून घेणार आहोत. काही दिवसा आधी आयकर विभागाने एक ट्विट करून नवीन वेबसाईट ची माहिती दिली होती. त्याची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत.

वेबसाईटचा पत्ता बदललेला नाहीये. तो incometax.gov.in जुनाच आहे. पण या वेबसाईटचा चेहरामोहरा बदलला आहे. तुमचे दोन कामं आता झटपट होऊ शकतील. तुमचा अर्ज पूर्ण झाला. त्याचे प्रोसेसिंग कुठपर्यंत आलं? हे आता तुम्हाला ठळकपणे डॉशबोर्ड वरच दिसू शकेल.

आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अर्जाची ऑनलाइन छाननी, म्हणजे प्रोसेसिंग होऊन तुम्हाला रिफंड लागू होत असेल तर ती प्रक्रिया ही पूर्वी पेक्षा वेगाने पुर्ण होणार आहे. आठवून बघा तुम्हाला आधीच्या साईटवर तुमचा पूर्वी भरलेला फॉर्म आणि त्याचा स्टेटस अक्षरशः शोधावा लागत होतं. तुम्ही नव्याने आयटीआर म्हणजेच विवरणपत्र भरत असाल तर थोडे कठीण होऊन बसतं. कारण काही शब्द तुमच्यासाठी अनोळखी किंवा किचकट असू शकतात.

त्यासाठी आता नवीन साइटवर आहे फॉर्म भरण्यासाठी सोफ्टवेअर. सध्या आयटीआर वन टू आणि फोर साठे चा सॉफ्टवेअर अगदी ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. पुढे तीन, पाच आणि सात साठीच सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध होणार आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही तुमचं विवरणपत्र भरू शकता.

म्हणजे कुठली माहिती कुठे भरायची? यासाठी मदत घेऊ शकता. गेल्या वर्षीपासूनच खरं तर आपलं विवरणपत्र प्रिफिल्ड, म्हणजे काही माहिती आपल्या अर्जात आधीच भरून येते. तुम्हाला कंपनीने दिलेल्या फॉर्म सिक्सटीन मधली माहिती खास करून आधीच विवरण अर्जात भरून आलेली असते. त्यामुळे तुमचा अर्ध काम सोपं होतं. आता नवीन वेबसाइट तुम्हाला आणखी मदत करणार आहे.

तुमचं जसं फेसबुक प्रोफाईल असतं. तसं या साइटवर तुमचा एक आर्थिक प्रोफाईल असेल. आणि त्यात तुम्ही तुम्हाला बँकेकडून मिळणारे व्याज, इतर डिव्हिडंड किंवा प्रॉपर्टी विकली असेल तर त्यातून मिळालेले उत्पन्न. याची नोंद करायची आहे. आणि या नोंदी ही वेबसाईट स्वतःहून तुमच्या आर्थिक विवरणपत्रात टाकेल. जेणेकरून तुमचं विवरणपत्र बिनचूक असेल. आणि या नोंदी तुम्हाला वेगळ्या करावे लागणार नाहीत ही माहिती गुप्त असेल.

विवरणपत्र भरताना किंवा ते भरल्यानंतर ही तुमच्या काही शंका असतील तर त्याच्या निवारणासाठी नवीन कॉल सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक समस्यांचे निराकरण ऑनलाईन होऊ शकेल. त्याचबरोबर नियमितपणे लोकांना येणाऱ्या समस्या, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया समजून सांगणारे नवे व्हिडिओ, नवे लेख वेबसाईटवर अपडेट करण्यात येतील.

तसेच करदात्यांना ऑनलाईन चॅटिंग ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विवरण पत्र भरल्यानंतर जर तुम्हाला अतिरिक्त आयकर भरायचा असेल. किंवा विवरणपत्रात चूक सुधारण्यासाठी त्यात बदल करायचे असतील. किंवा आयकर विभागाच्या एखाद्या नोटिशीला उत्तर द्यायचं असेल. तर ही प्रक्रिया सुद्धा आता सोपी झाली आहे.

तुम्हाला त्यासाठी आयकर विभागाच्या कार्यालयात जायला नको. फेसलेस म्हणजे कुठल्याही व्यक्तीशी संबंध न येता ऑनलाईन मिळणाऱ्या सूचनांचे पालन करत तुम्ही उरवणीत प्रक्रिया पार पाडू शकाल. ऑनलाईन पैसे भरायचे असतील. तर नवीन इंटरफेस ची सोय सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे इंटरनेट बँकिंग, यूपीआय, गुगल पे अशा आधुनिक पद्धतीने तुम्ही पैसे भरू शकता.

आणि ऑनलाईन पद्धतीने विवरणपत्र यातले बदल ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोड्याच दिवसात आयकर विभागाचा मोबाईल ऍप ही बाजारात येणार आहे. म्हणजे आता आयकर विवरणपत्र तुम्ही मोबाईल वर सुद्धा भरू शकाल. नवीन वेबसाइटच अनावरण हे नुकतेच झाले आहे. पण त्याचा नेमका कसा उपयोग होतो, हे हळूहळू लक्षात येईल.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.