नेहमी दुःखी असणारे लोक हे ‘या’ ३ चुकांकडे लक्ष देत नाही आणि स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतात ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

आपले मन नेहमी आपल्या बरोबर ज्या घटना घडतात त्यांच्यामागे कारणे शोधायचा प्रयत्न करत असते. कधी कधी तर काही फालतू कारणे शोधून काढते. उदाहरण पहायचं झालं तर, एखाद्या वेळेस तुमचा मित्र तुम्हाला फोन करून बोलतो की थोडे बाहेर जायचे आहे माझ्या बरोबर येतोस का ? तेव्हा आपण बोलून जातो की नाही यार मला खूप काम आहे.

पण खरे कारण हे असते की तुम्ही घरी टीव्ही वर आपल्या आवडीचा चित्रपट बघत असता. त्याच दिवशी संध्याकाळी घरात चालता चालता तुमचा पाय मुरगळतो, आणि पायात चमक भरते. आता तुमचे मन कारणे शोधायला लागते. हे असे का झाले असेल? मग तुमचं मन म्हणत की तुम्ही सकाळी तुमच्या मित्राला बाहेर जाण्यासाठी खोटं बोलला म्हणूनच हे असे झाले. पण तस पाहायला गेलं तर त्या खोट बोलण्याचा आणि पाय मुरगळण्याचा काहीही संबंध नाही.

तुमचा पाय मुरागळला तो तुमच्या निष्काळजीपणा मुळे. तुम्ही चालताना नीट लक्ष दिले नाही म्हणून ते घडल. दुसर उदाहरण पहायचं झालं तर, एक दिवस तुम्ही तुमच्या मित्राचा विचार करत बसलेले असतात, ज्याच्याबरोबर बरेच दिवस तुमचे बोलणे झालेले नसते. आणि अचानक त्याचा फोन येतो आणि तुमचे मन कारणे शोधायला लागते, तुम्ही त्याला म्हणता तुझ आणि माझ नाते हे ह्या जन्मातले नसून मागच्या जन्मातले आहे.

मी तुझाच विचार करत होतो आणि लगेच तुझा फोन आला. आता वास्तवता काय आहे की, दिवसभरात तुम्ही दोनशे लोकांचा विचार करता आणि त्यापैकी फक्त एकाचाच फोन तुम्हाला येतो आणि लगेचच त्याच्या बरोबर तुम्ही पूनर्जन्मातले नाते जोडून रिकामे होता. अशी अनेक उदाहरणे आहे, जसे की मांजर आडवी गेली तर काम होत नाही. घरातून निघताना कोण शिंकले की अशुभ असते. शनिवारी नखे कापायची नाहीत. अशी अनेक गोष्टीत आपण फालतू कारणे शोधत असतो. त्यामुळे यात आपण काही मुद्दे पाहणार आहोत.

1. प्रत्येक गोष्टीत फालतू कारणे शोधत बसू नका : कारण अशी कारणे शोधत बसाल तर तुम्ही निर्णय किंवा जवाबदारी घेवू शकणार नाही. आणि त्यामुळे तुमची प्रगती होवू शकणार नाही. याचा अर्थ असा नाही की जर तुम्हाला एखादे अपयश आले तर त्याचे चिंतन करू नका, किंवा ते का आले ह्याचे अवलोकन करू नका. चिंतन, अवलोकन जरूर करा. मन मनाला फालतू कारणे शोधायची जी सवय लागली आहे ती बंद करा.

2. खरे मित्र जोडा, त्याला व्यावसायिक दृष्टिकोन देऊ नका: असे म्हणतात की 21वे शतक नेटवर्किंगचे आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस आज त्याची नेटवर्क वाढवायच्या मागे आहे. पण नेहमी एक लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही कोणत्या नात्याला व्यावसायिक दृष्टिकोन देता तेव्हा तुम्ही एक मित्र गमावत असता.

कधीही कोणाला भेटल्यावर असा विचार करू नका की मी याच्यासाठी काय करू की जेणेकरून गा देखील माझ्यासाठी काहीतरी करेल. मी काय असे केले तर ह्याचा मला भविष्यात फायदा होईल. फक्त एका मित्राप्रमाने विचार करा. मि ह्याच्यासाठी काय करू शकतो? इतकचं विचार करा. समोरचा माझ्यासाठी काय करेल? तो काय करू शकतो? हा विचार करू नका.

जेव्हा तुमच्याकडे विद्या असते आणि तुमचा दृष्टिकोन नेहमी देण्याचा असत. आणि जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टी अपेक्षा न करता दुसऱ्याला देता. तेव्हा तुमच्याकडे त्या 10 पटी ने जास्त प्रमाणात येतात हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे कुठेही वागताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेव नका.

3. दृष्टी बदला, सृष्टी बदलेल: जेव्हा पण आपण एखाद्या समस्येकडे किंवा दु:खा कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो, तेव्हा ती समस्या सोडवणे सोपे जाते. किंवा वास्तवात ती समस्या नव्हतीच असे आपल्याला कळते. एकदा एका गृहस्थांना त्यांच्या मित्रासोबत फिल्म पाहायला जायचे असते पण त्यांचे खूप महत्वाचे काम असते.

त्या दिवशी त्यांच्या डोक्यात पण हा शब्द फिरायला लागला. मला फिल्म पाहायला जायचे आहे पण मला महत्वाचे काम आहे. मग त्यांनी काय केले तर “पण” हा शब्दाच्या जागी “आणि” हा शब्द टाकला. आता झाले काय तर त्यांचे मन दोन्ही कामे कशी करता येतील यावर विचार करायला लागले, आणि निरनिराळया कल्पना त्यांना सुचल्या.

आणि त्यांची दोन्ही कामे झाली सुद्धा. कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी आपल्याच हातात असतो. आणि ही आपल्यासाठी खूप जमेची बाब आहे. जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात एखादे संकट येते. तेव्हा असे म्हणू नका की माझ्या समोर एक संकट आहे. असे म्हणा की माझ्यासमोर एक “आव्हान” आहे आणि मला ते पार करायचे आहे.

असे केल्याने कोणतीही समस्या टेन्शन न घेता पार होते. कारण कितीही मोठी समस्या असली की तीला सोडवण्याचे सामर्थ्य आपल्यात असतेच. जगात जितके देखील यशस्वी व्यक्ती आहे ते त्यांच्या समस्येला आव्हान म्हणून पाहतात आणि तसा विचार करतात. आणि अयशस्वी लोक त्या समस्येला घेवून रडगाणे गात बसतात, दुसऱ्यांना जबाबदार धरतात.

त्यांचे म्हणणे असते की ते नेहमी बरोबर असतात आणि दुसऱ्यांमुळे ही समस्या निर्माण झाली. ह्या तीन सवयी आपल्याला आयुष्यात प्रगती करून देत नाही, यशस्वी होवून देत नाहीत. म्हणून या सवयी जर तुमच्यात असतील तर त्या सोडून द्या आणि खूप मोठे व्हा, कष्ट करा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.