रेडीरेकनर म्हणजे काय? ।। रेडीरेकनर चे दर कोण ठरवते ? ।। हे दर कशासाठी असतात? ।। रेडीरेकनर वाढल्यास काय होते? ।। नवीन फ्लॅट/ घर घेणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती ।।

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो आज आपण रेडीरेकनर म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत. जेव्हा एखादी व्यक्ती घर घेण्याचा, जमीन घेण्याचा किंवा एखाद्या व्यवसायासाठी जागा घेण्याचा विचार करते तेव्हा त्याच्यासमोर असतो तो हा रेडीरेकनर शब्द. रेडीरेकनर किती आहे हे अनेकदा विचारले जाते,

कारण रेडीरेकनर वाढला तर घराचे भाव वाढतात तर रेडीरेकनर कमी झाला तर घराचे भावही कमी होतात. त्यामुळेच रेडीरेकनर ला महत्त्व आहे. काय आहे हे रेडीरेकनर?: रेडीरेकनर हे घरांच्या, जमिनीच्या आणि व्यावसायिक वापरांसाठी च्या जागांचे दर असतात. हे दर प्रत्येक भागानुसार त्यातील राहणीमानानुसार वेगळे असतात.

रेडीरेकनर ही एक व्यापक संकल्पना आहे. त्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊ या. हे दर कोण ठरवते ?: हे दर राज्य सरकार कडून ठरविले जातात,त्यात दरवर्षी बदल केला जातो. अर्थव्यवस्था, मागणी, पुरवठा यांची स्थिती पाहून हे दर ठरवले जातात.

हे दर कशासाठी असतात?: हे दर म्हणजे त्या त्या भागातील घर,जमीन,व्यावसायिक वापरासाठी ची जागा यांचे प्रमाण दर असतात. त्यानुसार खरेदी वेळी भराव्या लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटी किंवा नोंदणीचे शुल्क आकारले जाते. पण यातही असा नियम असतो की सरकारने ठरवून दिलेल्या रेडीरेकनर दरापेक्षा कमी दरात घर,जमीन,जागा घेतली तरी सरकारीदरानुसार स्टॅम्प ड्युटी किंवा नोंदणी शुल्क आकारले जाते,

पण जर घर, जमीन,जागा यांचे दर रेडीरेकनर दरापेक्षा जास्त लावले असेल तर मात्र जास्त रकमेने शुल्क आकारले जाते. रेडीरेकनर वाढल्यास काय होते?: सरकारने रेडीरेकनरचे दर वाढवले तर घराच्या किमती वाढतात,जर रेडीरेकनरच्या घरा पेक्षा कमी किमतीत घर घेतले तर वाढीव दराने शुल्क आकारले जाते.

समजा एखाद्या भागात घराची किंमत रेडीरेकनर नुसार 50 लाख आहे पण बिल्डर ते घर 60 लाखांना विकत असेल तर त्यावर भरली जाणारी स्टॅम्प ड्युटी ही 60 लाख रुपये नुसार द्यावी लागेल. तर अशाप्रकारे रेडीरेकनर आणि जमिनीची किंमत यांचा संबंध येतो. वरील माहितीतून तुम्हाला साधारणतः रेडीरेकनर म्हणजे काय हे लक्षात आले असेल.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.