पती निधनानंतर अश्रू गाळण्याऐवजी बनल्या अनेकांची प्रेरणा ।। उबरच्या पहिल्या महिला टॅक्सी ड्रायवर गुलेश चौहान यांच्याबद्दल जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आयुष्य निवांत चाललेलं असतं. पण अचानक एखादं संकट येतं आणि आयुष्याची बसवलेली घडी अगदी विस्कटून जाते. अशा वेळी आधार देणारे शब्द पुरेसे होत नाहीत. शब्दांचा पोकळ आधार अशावेळी कुचकामी ठरतो. सगळे मार्ग बंद असतात. अशावेळी कोणीतरी येऊन हात देऊन उभं करण्याची वाट पाहण्याऐवजी स्वत:चा आधार स्वत:लाच बनावं लागतं.

सिनेमात दाखवलेल्या संघर्षाच्या गोष्टींपेक्षा प्रत्यक्ष आयुष्यात समोर येणारा संघर्ष अधिक टोकदार आणि कडवा असतो. या वाटेवर शेवटपर्यंत जे टिकून राहतात ते समाजासाठीही नवी प्रेरणा बनतात. आज आम्ही आणली आहे अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची गोष्ट जी संकटांवर जिद्द आणि परिश्रमाच्या आधारे मात करु शकली आहे. ही गोष्ट आहे उबरच्या पहिल्या महिला टॅक्सी ड्रायवर गुलेश चौहान यांची.

Delhiwale: Post-ride confessions | Latest News Delhi - Hindustan Times

एक स्त्री जिद्दीवर उतरली तर काय करु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुलेश चौहान. पारंपरिक राजपूत कुटुंबात गुलेश यांचा जन्म झाला. स्त्रीने कसं असावं , कसं वागावं या शिकवणूकित त्या मोठ्या झाल्या. इतर मुलींप्रमाणेच वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचं घरातल्यांनी लग्न लाऊन दिलं.

लग्न, नातं, कुटुंब हे सगळं समजण्याच्या आतच त्यांच्यावर मातृत्वाची जबाबदारीही पडली. पारंपरिक वातावरण असलेल्या घरात गुलेशही चेह-यावर भला मोठा घुंघट घेऊन वावरत असे. पण पुढे असं काही घडलं की गुलेश यांचं जीवनच बदलून गेलं. अचानक एका अपघातात गुलेश यांच्या पतीचं निधन झालं. सगळ्याच अर्थानी पतीवर अवलंबून असणा-या भुलेश यांच्यावर हा सगळ्यात मोठा आघात होता.

माहेरची परिस्थिती फारशी चांगली नाही. पतीच्या निधनानंतर सासरच्यांनीही जबाबदारी टाळलेली. अशावेळी दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांतही गुलेश यांना सतावू लागली. समोर पोटच्या मुलाचं भविष्यही होतं. अशा वेळी गुलेश यांना त्यांच्या आईने उदरनिर्वाहासाठी काही तरी हात पाय हालवण्याचं सुचवलं. नीट शिक्षण नाही, निम्मं आयुष्य घुंघटमध्ये घालवलं अशा वेळी अचानक उठून बाहेर जाणं हे गुलेश यांच्यासाठी मोठ्या आव्हानासारखंच होतं.

पण या आव्हानाला परिस्थितीमुळे पार करावच लागणार होतं. गुलेश यांनी मेस सुरु केली. मेससोबत बस्तान बसतंय असं वाटत असतानाच त्यांना दुस-या आघाताला सामोरं जावं लागलं. दुचाकीवरुन जात असताना गुलेश यांचा अपघात झाला. घडी बसेल असं वाटण्यापुर्वीच त्यांना डाव पुन्हा उलटला होता. या अपघाताने अंगभर जखमा दिल्याच. पण मणक्याला मार बसल्याने कित्येक महिने अंथरुणाला खिळून रहावं लागलं.

Greater Noida : First female driver of Uber honored Gulesh Chauhan

थोडं बरं झाल्यानंतर त्यांनी चार चाकी शिकून घेतली. एकेदिवशी मुलाने ड्रायव्हर म्हणून काम करण्याचं सुचवलं. यावर त्या ब-याच नाराज झाल्या. पण मुलाने त्यांना हिंमत दिली. आईनेही दृष्टीकोन बदलण्यास भाग पाडलं. अपघातानंतर गाडीचं स्टेअरिंग घेताना हात थरथरत होते. पण त्यातून धीर एकवटत त्यांनी उबर सर्व्हिस सुरु केली.

पहिल्याच दिवशी फक्त दोन ड्युटी केल्या. अनेकदा रस्ता चुकल्या, वेळ लागला. पण या अनुभवाने त्यांना आणखी मजबूत केलं. आज त्या अनेक महिला ड्रायव्हरसाठी प्रेरणा बनल्या आहेत. पडत्या काळात आर्थिक उदरनिर्वाहाचं साधन बनलेल्या उबरला त्या मोठ्या भावाप्रमाणे मानतात.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा