वारस नोंदी कश्या कराव्यात? कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर त्वरित करा ह्या गोष्टी ।। जमीन मालकीहक्काबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती !

घरातील खातेदार व्यक्ती म्हणजे अशी प्रमुख व्यक्ती ज्या व्यक्तीच्या नावा वरती सर्व प्रॉपर्टी व शेत जमीन असते, अश्या व्यक्तीचा ज्यावेळेस मृत्यू होतो तिच्या मृत्यूनंतर तिच्या वारसांना वारसा नोंद करणे हे फार गरजेचे असते. आणि या कामात दिरंगाई झाली आणि आपले भाऊबंद किंवा नातेवाईक वाईट वृत्तीचे असतील तर त्यांच्याकडून धोका होण्याची शक्यता असते.

म्हणून वारस नोंद वेळेवर होणे गरजेचे आहे आणि या बद्दलची संपूर्ण माहिती पाहुया. वारस नोंद बद्दल ची संपूर्ण माहिती. सर्वात प्रथम वारस नोंदी साठी ज्यावेळेस अर्ज केला जातो त्यावेळेस त्याची नोंद नमुना 6 क या रजिस्टर मध्ये सर्वात प्रथम केली जाते. यानंतर कोणाचे नाव वारस म्हणून जमिनीस लावायचे याबाबत एक वारस ठराव मंजूर केला जातो.

आणि हा वारसा ठराव मंजूर झाल्यानंतर फेरफार नोंदवहीत याची नोंद केली जाते आणि त्यानंतर वारसा बाबत जर कोणाला तक्रार असेल त्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी असतो त्यासाठी नोटीस पाठवली पाठवली जाते आणि जर कोणास तक्रार नसेल तर मंडळाधिकारी किंवा तहसीलदार साहेबांन द्वारे स्थानिक रिपोर्टच्या आधारावर सातबारासाठी नाव लागण्याची परवानगी दिली जाते.

वारसाच्या नोंदी साठी काही आवश्यक बाबी आहेत त्या म्हणजे ज्यावेळेस खातेदाराचा मृत्यू होतो त्यानंतर तीन महिन्यांच्या आत वारस नोंदणी अर्ज देणे अपेक्षित असते. अर्ज देते वेळी मयत खातेदाराचा किती तारखेला मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र होते व मयत खातेदारास एकूण किती जण वारस आहे याची माहिती अर्जासोबत द्यावी लागते.

त्याचप्रमाणे मयत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे 8 अ चे उतारे त्याचप्रमाणे शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती एक प्रतिज्ञापत्र भरून घ्यावे लागते आणि ते पण सादर करावे लागते ज्या प्रतिज्ञापत्र मध्ये वारसा च्या मतलब मयत व्यक्तीच्या बरोबर वारसाचे काय नाते आहे त्याचप्रमाणे त्या वारसांचा पत्ता आहे तो पत्ता त्यामध्ये नमूद केला जातो.

आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मयत व्यक्ती ही कुठल्या धर्माची आहे जसे हिंदू धर्माचे असेल तर हिंदू आणि मुस्लिम धर्माची असेल तर मुस्लीम वारसा कायद्याप्रमाणे वारसा हक्क जो आहे त्याची अंमलबजावणी केली जाते. वारसाच्या नोंदी ची संपूर्ण प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया नुसार सर्वात प्रथम ज्यावेळी खातेदार म्हणजेच प्रमुख व्यक्ती ज्याच्या नावा वरती सर्व जमीन मालमत्ता आहे तिचा मृत्यू होतो.

तर सर्वात प्रथम तिचा मृत्यू चा दाखला ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही येता तेथून सर्वात प्रथम मृत्यूचा दाखला घ्यांचा आहे आणि त्यानंतर वारस नोंदी साठी चा अर्ज तीन महिन्याच्या आत द्यायचा आहे. वारस नोंदी साठी जो अर्ज दिला जातो त्या बरोबर प्रतिज्ञापत्र, त्यानंतर 8अ चे उतारे ज्यामध्ये संपूर्ण मालमत्ता कुठे कुठे आणि कोणती कोणती आहे त्या बाबी नमूद असतात. ही सर्व माहिती त्या बरोबर जोडायचे आहे सर्वप्रथम 6 क या रजिस्टरमध्ये त्याची नोंदणी केली जाते.

त्यानंतर सर्व वारसांना बोलावले जाते व गावातील सरपंच, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिकांनी विचार करून ठराव घेतला जातो. त्यानंतर सर्व चौकशी करून वारस रजिस्टरमध्ये ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाते त्यानंतर सर्वांना नोटीस दिली जाते आणि नोटीस दिल्यानंतर किमान 15 दिवसानंतर या फेरफार नोंदीबाबत कायदेशीर रित्या आदेश काढला जातो. त्या नंतर वारसांची नोंद प्रमाणित केली जाते किंवा जर त्यामध्ये काही समस्या वाटले किंवा त्रुटी वाटल्या तर ते नोंद रद्दही केली जाऊ शकते.

वारसांची नावे सातबारा वर लावण्यासाठी स्थानिक चौकशी करूनच तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी निर्णय देतात असा निर्णय नोंदवहीत रकाना सात मध्ये लिहिलेला असतो. वारस नोंदीतील काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे फार महत्वाचे आहे.

जसे व्यक्तीने जर स्वकष्ट करून जमीन मिळवलेली असेल तर त्या जमिनीबाबत प्रथम हक्क त्या व्यक्तीच्या मुले मुली विधवा बायको आणि आई यांना मिळतो स्वकष्टाने मिळवलेल्या जमीनीत मयत व्यक्तिच्या वडिलांना कोणताही हक्क मिळत नाही. दुसरी गोष्ट वडीलांच्या अगोदर मुलगा जर मयत झाला असेल तर त्याच्या मुला-मुलींना मिळून एक वाटा मिळतो. याप्रमाणे जर मयत व्यक्तीचे दुसरे किंवा तिसरे लग्न झालेले असेल तर त्या व्यक्तीच्या पत्नीला वारसा हक्क मिळत नाही परंतु त्यांना झालेल्या मुलामुलींना मालमत्तेमध्ये हिस्सा मिळतो..

2 thoughts on “वारस नोंदी कश्या कराव्यात? कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर त्वरित करा ह्या गोष्टी ।। जमीन मालकीहक्काबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती !”

  1. suhas sudhakar yadav

    Meri pitaji jamin h par useme mere bade bhai ka name h our masra meri ma ka nam nahi h may kya karti aap Salah de

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *